मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ५२:४सुमारे इ.स.पू. ५९०

    म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्यांनी त्यांच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.

  2. यिर्मयाह ५२:५सुमारे इ.स.पू. ५९०

    सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता.

  3. यिर्मयाह ५२:६सुमारे इ.स.पू. ५८८

    चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.

  4. यिर्मयाह ५२:७सुमारे इ.स.पू. ५८८

    तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सर्व सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही ते रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून ते अराबाह च्या दिशेने पळून गेले.

  5. यिर्मयाह ५२:८सुमारे इ.स.पू. ५८८

    परंतु बाबिलोनच्या सैनिकांनी सिद्कीयाह राजाचा पाठलाग केला आणि त्याला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते,

  6. यिर्मयाह ५२:९सुमारे इ.स.पू. ५८८

    आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.

  7. यिर्मयाह ५२:१०सुमारे इ.स.पू. ५८८

    बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला.

  8. यिर्मयाह ५२:११सुमारे इ.स.पू. ५८८

    मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबिलोन राजाकडे बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. व बाबेलला नेऊन मरेपर्यंत तुरुंगात टाकले.

  9. यिर्मयाह ५२:१२सुमारे इ.स.पू. ५८८

    बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.

  10. यिर्मयाह ५२:१३सुमारे इ.स.पू. ५८८

    त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत त्याने जाळून भस्म केली.

  11. यिर्मयाह ५२:१४सुमारे इ.स.पू. ५८८

    रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटे पाडून टाकली.

  12. यिर्मयाह ५२:१५सुमारे इ.स.पू. ५८८

    नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने काही अगदी गरीब लोक, शहराच्या विध्वंसातून वाचलेले लोक, आणि जे बाबेलच्या राजाला शरण गेले होते त्यांना व बाकीचे कारागीर यांना बंदिवासात नेले.

  13. यिर्मयाह ५२:१६सुमारे इ.स.पू. ५८८

    परंतु नबुजरदानने देशातील जे लोक अत्यंत गरीब होते त्यांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले.

  14. यिर्मयाह ५२:१७सुमारे इ.स.पू. ५८८

    बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि सर्व कास्य ते बाबेलास घेऊन गेले.

  15. यिर्मयाह ५२:१८सुमारे इ.स.पू. ५८८

    त्यांनी भांडी, फावडे, चिमटे, शिंपडण्याची भांडी आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली.

  16. यिर्मयाह ५२:१९सुमारे इ.स.पू. ५८८

    रक्षक दलाच्या अधिकार्‍याने गंगाळे, अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी, वाट्या, दीपस्तंभे, आणि पेयार्पणासाठी वापरण्यात येणारी ताटे व पात्रे काढून घेतले—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते.

  17. यिर्मयाह ५२:२०सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी व त्याखालील बारा बैल आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते.

  18. यिर्मयाह ५२:२१सुमारे इ.स.पू. ५८८

    प्रत्येक खांब अठरा हात उंच आणि बारा त्याचा हाताचा घेर होता; प्रत्येक चार बोटांइतके जाड आणि पोकळ होते.

  19. यिर्मयाह ५२:२२सुमारे इ.स.पू. ५८८

    एका खांबावर कास्याचा कळस होता जो पाच हात उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. डाळिंबांसह दुसरा खांबही तसाच होता.

  20. यिर्मयाह ५२:२३सुमारे इ.स.पू. ५८८

    खांबाच्या चारही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती; राहिलेल्या भागावरच्या जाळीच्या नक्षीकामात एकूण शंभर डाळिंबे कोरली होती.

  21. यिर्मयाह ५२:२४सुमारे इ.स.पू. ५८८

    रक्षक दलाच्या अधिकार्‍याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपाल यांना बंदिवान म्हणून नेले.

  22. यिर्मयाह ५२:२५सुमारे इ.स.पू. ५८८

    जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि सात राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने काढून नेले.

  23. यिर्मयाह ५२:२६सुमारे इ.स.पू. ५८८

    रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले.

  24. यिर्मयाह ५२:२७सुमारे इ.स.पू. ५८८

    हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.

  25. यिर्मयाह ५२:२८सुमारे इ.स.पू. ६००

    बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने बंदिवासात नेलेल्या लोकांची संख्या अशी: सातव्या वर्षी, 3,023 यहूदी;