मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ५१:१८सुमारे इ.स.पू. ५९५

    त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत; जेव्हा त्यांचा न्याय होईल, तेव्हा त्यांचा नाश होईल.

  2. यिर्मयाह ५१:१९सुमारे इ.स.पू. ५९५

    परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.

  3. यिर्मयाह ५१:२०सुमारे इ.स.पू. ५९५

    “तू माझ्या युद्धाचा सोटा आहेस. माझे युध्दशस्त्र— तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना डळमळीत करेन, तुझ्याद्वारे मी राज्ये नष्ट करेन,

  4. यिर्मयाह ५१:२१सुमारे इ.स.पू. ५९५

    तुझ्याद्वारे मी घोडा आणि घोडेस्वाराचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी रथ आणि सारथी यांचा संपूर्ण नाश करेन,

  5. यिर्मयाह ५१:२२सुमारे इ.स.पू. ५९५

    तुझ्याद्वारे मी पुरुष व स्त्रीचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी वृद्धाचा व तरुणाचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी तरुण व तरुणींचा संपूर्ण नाश करेन,

  6. यिर्मयाह ५१:२३सुमारे इ.स.पू. ५९५

    तुझ्याद्वारे मी मेंढपाळांचा आणि कळपांचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी शेतकर्‍यांचा आणि बैलांचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी राज्यपालांचा आणि अधिपतींचा संपूर्ण नाश करेन.

  7. यिर्मयाह ५१:२४सुमारे इ.स.पू. ५९५

    “बाबिलोन व बाबिलोनचे लोक यांनी सीयोनाशी जे दुष्कृत्य केले, त्याबद्दल मी तुझ्या डोळ्यादेखत त्यांची परतफेड करेन.” असे याहवेह जाहीर करतात.

  8. यिर्मयाह ५१:२५सुमारे इ.स.पू. ५९५

    “हे संहारक पर्वता, तू जो संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस करतो, मी तुझ्याविरुद्ध आहे,” याहवेह जाहीर करतात, “मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन, तुला कडेलोट करेन, आणि तुला भस्म झालेला डोंगर करेन.

  9. यिर्मयाह ५१:२६सुमारे इ.स.पू. ५९५

    तुझ्यातील पाषाण कोनशिलेसाठी वापरण्यात येणार नाहीत. पायाभरणीसाठीही तुझे डबर घेणार नाहीत, तू कायमची उजाड होशील,” याहवेह जाहीर करतात.

  10. यिर्मयाह ५१:२७सुमारे इ.स.पू. ५९५

    “या भूमीवर आपले ध्वज फडकवा! राष्ट्रांमध्ये रणशिंगे वाजवा! तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा; या राष्ट्रांना तिच्याविरुद्ध पाचारण करा: अरारात, मिन्नी व आष्कनाज. तिच्याविरुद्ध सेनापतीची नेमणूक करा; टोळधाडी सारखा घोड्यांचा प्रचंड समुदाय पाठवा.

  11. यिर्मयाह ५१:२८सुमारे इ.स.पू. ५९५

    तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा— मेदिया राजे, त्यांचे राज्यपाल आणि अधिपती, आणि ज्यावर ते शासन करतात अशी सर्व राष्ट्रे.

  12. यिर्मयाह ५१:२९सुमारे इ.स.पू. ५९५

    भूमी थरथरत व वेदनांनी तळमळत आहे, कारण याहवेहने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प कायमचा आहे— बाबेलची भूमी ओसाड होईल जेणेकरून तिथे कोणीही राहणार नाही.

  13. यिर्मयाह ५१:३०सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबिलोनचे योद्धे युद्ध करण्याचे थांबले आहेत; ते त्यांच्या गडात बसून आहेत. त्यांचे सामर्थ्य संपुष्टात आले आहे; ते दुर्बल झाले आहेत. तिचे आवास जळत आहेत; तिच्या प्रवेशद्वाराच्या सळया मोडल्या आहेत.

  14. यिर्मयाह ५१:३१सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबेलच्या राजाला वर्तमान सांगण्यासाठी, की त्याचे संपूर्ण नगर हस्तगत करण्यात आले आहे, संदेशवाहक एका पाठोपाठ धावत आहेत निरोपे एका पाठोपाठ येत आहेत,

  15. यिर्मयाह ५१:३२सुमारे इ.स.पू. ५९५

    नदीवरील पूल जप्त करण्यात आले आहेत, दलदली जळत आहेत, सैन्य भयभीत झाले आहेत.”

  16. यिर्मयाह ५१:३३सुमारे इ.स.पू. ५९५

    कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “बाबेलची कन्या अशा खळ्याप्रमाणे आहे जिची तुडवणी सुरू होण्याची वेळ आली आहे; तिचे पीक घेण्याचा समय लवकरच येणार आहे.”

  17. यिर्मयाह ५१:३४सुमारे इ.स.पू. ५९५

    “बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने आम्हाला गिळंकृत केले आहे, त्याने आम्हाला निराशेत ढकलले आहे, त्याने आम्हाला रिक्त भांड्यासारखे केले आहे. सर्पासारखे त्याने आम्हाला गिळले आहे. आणि आमच्या मिष्टान्नाने स्वतःचे पोट भरले आहे, आणि मग आम्हाला बाहेर थुंकून दिले आहे.

  18. यिर्मयाह ५१:३५सुमारे इ.स.पू. ५९५

    सीयोनचे रहिवासी म्हणतात, आमच्या संतानांवर जसा अत्याचार केला, तसा बाबेलवर येवो,” यरुशलेम म्हणते, “आमचे रक्त सांडल्याचा सर्व दोष बाबेल्यांवर पडो.”

  19. यिर्मयाह ५१:३६सुमारे इ.स.पू. ५९५

    म्हणून याहवेह असे म्हणतात: “मी तुमची बाजू मांडेन मी तुमचा सूड उगवेन; मी तिचे समुद्र आटवून टाकेन आणि तिचे झरे शुष्क करेन.

  20. यिर्मयाह ५१:३७सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण.

  21. यिर्मयाह ५१:३८सुमारे इ.स.पू. ५९५

    तिचे सर्व लोक तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील, सिंहाच्या छाव्यासारखे डरकाळ्या मारतील.

  22. यिर्मयाह ५१:३९सुमारे इ.स.पू. ५९५

    पण ते जेव्हा जागृत होतील, मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करेन त्यांना मद्यधुंद करेन, म्हणजे ते किंकाळ्या मारून हसतील—मग ते कायमचे झोपतील मग ते चिरनिद्रा घेतील व उठणार नाहीत.” असे याहवेह जाहीर करतात.

  23. यिर्मयाह ५१:४०सुमारे इ.स.पू. ५९५

    मी त्यांना कोकरागत, मेंढ्या व बोकडागत कत्तल करण्यास खाली आणेन.

  24. यिर्मयाह ५१:४१सुमारे इ.स.पू. ५९५

    “शेशाक कसे हस्तगत केल्या जाईल, संपूर्ण पृथ्वीचे अभिमान पात्र जप्त केल्या जाईल! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड होईल!

  25. यिर्मयाह ५१:४२सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबेलवर सागर उसळून येईल; सागरलाटांनी ती भूमी झाकून जाईल.