मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ५०:१४सुमारे इ.स.पू. ५९५

    “बाबेलच्या सभोवती तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा, धनुर्धाऱ्यांनो तिच्यावर बाणांचा नेम धरा. तिच्यावर बाण मारा, कोणताही बाण राखून ठेवू नका. कारण तिने याहवेहविरुद्ध पाप केले आहे.

  2. यिर्मयाह ५०:१५सुमारे इ.स.पू. ५९५

    तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा! ती शरण येत आहे, तिचे बुरूज धराशायी झाले आहेत, तिच्या तटाच्या भिंती कोसळल्या आहेत. हा याहवेहने घेतलेला सूड आहे, तुम्हीही तिचा सूड घ्या; जसे तिने इतरांचे केले तसेच तिचेही करा.

  3. यिर्मयाह ५०:१६सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबेलच्या शेतकऱ्यांना तिथून काढून टाका, कापणी करणारे आपले विळे घेऊन निघून जावोत. अत्याचाऱ्याच्या तलवारीमुळे प्रत्येकाने आपल्या लोकांकडे परत जावे. प्रत्येकाने आपल्या देशाकडे पलायन करावे.

  4. यिर्मयाह ५०:१७सुमारे इ.स.पू. ५९५

    “इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले तो अश्शूरचा राजा होता; नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.”

  5. यिर्मयाह ५०:१८सुमारे इ.स.पू. ५९५

    म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: “मी बाबेलच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन, अश्शूरच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन.

  6. यिर्मयाह ५०:१९सुमारे इ.स.पू. ५९५

    पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन, ते कर्मेल व बाशान येथे चरतील; एफ्राईम व गिलआदच्या डोंगरावर ते खाऊन तृप्त होतील.

  7. यिर्मयाह ५०:२०सुमारे इ.स.पू. ५९५

    त्या दिवसात, त्या समयी, याहवेह घोषित करतात, इस्राएलमध्ये दोषाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी ते आढळणार नाहीत, आणि यहूदीयामध्ये पाप शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी आढळणार नाही, लोकांना मी क्षमा करेन. कारण मी वाचवून ठेवलेल्या अवशेषाला क्षमा करेन.

  8. यिर्मयाह ५०:२१सुमारे इ.स.पू. ५९५

    “मराथाईम प्रदेशावर आक्रमण करा आणि पकोड येथील रहिवाशांवर स्वारी करा. त्यांचा पाठलाग करा, त्यांचा वध करा व त्यांना समूळ नष्ट करा.” असे याहवेह जाहीर करतात. “मी तुम्हाला आज्ञापिलेले सर्वकाही करा.

  9. यिर्मयाह ५०:२२सुमारे इ.स.पू. ५९५

    देशामध्ये रणगर्जनेचा ध्वनी ऐकू येत आहे. प्रचंड विध्वंसतेचा ध्वनी!

  10. यिर्मयाह ५०:२३सुमारे इ.स.पू. ५९५

    कसा मोडणारा व चुराडा करणारा संपूर्ण पृथ्वीतलावरील अत्यंत जबरदस्त असा हा हातोडा! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड बनले आहे!

  11. यिर्मयाह ५०:२४सुमारे इ.स.पू. ५९५

    अगे बाबिलोन, मी तुझ्यासाठी सापळा लावला आणि तुला कळण्या आधीच तू त्यात अडकलीस; तू सापडलीस व पकडण्यात आलीस कारण तू याहवेहस विरोध केला.

  12. यिर्मयाह ५०:२५सुमारे इ.स.पू. ५९५

    याहवेहने आपले शस्त्रागार उघडले व आपल्या क्रोधाचा स्फोट करण्यासाठी शस्त्रे बाहेर काढली, कारण सार्वभौम सर्वसमर्थ याहवेहस बाबेलच्या भूमीवर कार्य करावयाचे आहे.

  13. यिर्मयाह ५०:२६सुमारे इ.स.पू. ५९५

    या! दूरदूरच्या राष्ट्रांमधून बाबेलवर स्वारी करण्यासाठी या! तिची धान्यांची कोठारे फोडा; तिच्या भिंती पाडा, धान्याच्या राशी सारखा तिचा ढिगारा करा. आणि तिचा समूळ नायनाट करा तिच्यातील कोणीही शिल्लक ठेवू नका.

  14. यिर्मयाह ५०:२७सुमारे इ.स.पू. ५९५

    तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे.

  15. यिर्मयाह ५०:२८सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबेलमधील फरारी व निर्वासित लोक सीयोनात काय म्हणतात ते ऐका याहवेह, आमच्या परमेश्वराने कसा सूड घेतला, त्यांच्या मंदिराबद्दल सूड घेतला. हे याहवेह जाहीर करतात.

  16. यिर्मयाह ५०:२९सुमारे इ.स.पू. ५९५

    “धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,

  17. यिर्मयाह ५०:३०सुमारे इ.स.पू. ५९५

    म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील; त्या दिवशी तिचे सर्व योद्धे निःशब्द होतील,” हे याहवेह जाहीर करतात.

  18. यिर्मयाह ५०:३१सुमारे इ.स.पू. ५९५

    “पाहा, अहो गर्विष्ठ लोकांनो, मीच तुमच्याविरुद्ध आहे आता तुमचा दिवस आला आहे, तुम्हाला शिक्षा देण्याचा समय आला आहे! प्रभू सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

  19. यिर्मयाह ५०:३२सुमारे इ.स.पू. ५९५

    गर्विष्ठ अडखळतील व पडतील, तिला मदतीचा हात देऊन कोणीही उठविणार नाही; मी तिच्या नगरांमध्ये अग्नी पेटवेन तो अग्नी सभोवतालचे सर्वकाही गिळंकृत करेल.”

  20. यिर्मयाह ५०:३३सुमारे इ.स.पू. ५९५

    सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “इस्राएलाच्या लोकांवर जुलूम झाला आहे. व यहूदीयाच्या लोकांवरही झाला आहे. त्यांना कैद करणार्‍यांनी त्यांना घट्ट पकडून ठेवले आहे व त्यांना जाऊ देण्याचे ते नाकारतात.

  21. यिर्मयाह ५०:३४सुमारे इ.स.पू. ५९५

    परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल.

  22. यिर्मयाह ५०:३५सुमारे इ.स.पू. ५९५

    “बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल! ती बाबेलमध्ये राहणाऱ्या लोकांवर आणि तिच्या अधिपतींवर, सुज्ञ लोकांवरही प्रहार करेल! याहवेह असे जाहीर करतात.

  23. यिर्मयाह ५०:३६सुमारे इ.स.पू. ५९५

    तिच्या खोट्या संदेष्ट्यांवर तलवारीचा प्रहार होईल ते सल्लागार मूर्ख बनतील! तिच्या योद्ध्यांवर तलवारीचा प्रहार होईल! ते अत्यंत भयभीत होतील.

  24. यिर्मयाह ५०:३७सुमारे इ.स.पू. ५९५

    तिचे घोडे, रथांवर तलवारीचा प्रहार होईल! आणि तिच्यात राहणाऱ्या विदेशीयांवरही होईल! ते दुर्बल होतील. तिच्या संपत्तीवर तलवारीचा प्रहार होईल! त्यांची लूट केली जाईल.

  25. यिर्मयाह ५०:३८सुमारे इ.स.पू. ५९५

    तिच्या पाण्यावर तलवारीचा प्रहार होईल! ते शुष्क होतील. कारण ही मूर्तींची भूमी आहे, आणि या मूर्ती भयाने वेड्या होतील.