- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ५०:३९सुमारे इ.स.पू. ५९५
“म्हणून या नगरीत वनपशू व तरस वास करतील, व घुबडे येऊन राहतील. येथे आता पुन्हा कधी मानवाची वस्ती होणार नाही; किंवा ही नगरीत पिढ्यान् पिढ्या ओसाड पडेल.
- यिर्मयाह ५०:४०सुमारे इ.स.पू. ५९५
याहवेह जाहीर करतात, जसा मी परमेश्वराने सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश केला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही. त्यात लोक वस्ती करणार नाहीत.
- यिर्मयाह ५०:४१सुमारे इ.स.पू. ५९५
“पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; पृथ्वीच्या शेवटापासून एक मोठे राष्ट्र व अनेक राजे भडकविले जात आहेत.
- यिर्मयाह ५०:४२सुमारे इ.स.पू. ५९५
त्यांचे सैनिक धनुष्ये व भाल्यांसहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर व दयाहीन आहेत. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे बाबिलोन कन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.
- यिर्मयाह ५०:४३सुमारे इ.स.पू. ५९५
बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे. त्याचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी त्याला ग्रासले आहे.
- यिर्मयाह ५०:४४सुमारे इ.स.पू. ५९५
यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्या सिंहाप्रमाणे, बाबेलच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”
- यिर्मयाह ५०:४५सुमारे इ.स.पू. ५९५
बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. बाबेलच्या लोकांच्या भूमीविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.
- यिर्मयाह ५०:४६सुमारे इ.स.पू. ५९५
बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल.
- यिर्मयाह ५१:१सुमारे इ.स.पू. ५९५
याहवेहचे म्हणणे हे असे आहे, “बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांवर चाल करून जाण्यास मी एका संहारक आत्म्याला प्रेरित करेन.
- यिर्मयाह ५१:२सुमारे इ.स.पू. ५९५
त्यांना पाखडण्यात यावे व त्यांच्या भूमीचा विध्वंस व्हावा म्हणून मी बाबेलविरुद्ध विदेशी लोकांना पाठवेन; तिच्या विनाशाच्या दिवशी ते प्रत्येक दिशेने तिच्या विरोधात येतील.
- यिर्मयाह ५१:३सुमारे इ.स.पू. ५९५
तिच्या सैनिकांना त्यांचे धनुष्य ताणू देऊ नका. तिच्या योद्ध्यांची चिलखते अंगात घालू देऊ नका. त्यांच्या तरुणांनाही सोडू नका; त्यांच्या सैन्याचा संपूर्ण नाश करा.
- यिर्मयाह ५१:४सुमारे इ.स.पू. ५९५
बाबेलमध्ये ते मरून पडतील. तिच्या रस्त्यांवर ते मरणोप्राय जखमी होतील.
- यिर्मयाह ५१:५सुमारे इ.स.पू. ५९५
त्यांची भूमी इस्राएलच्या पवित्र परमेश्वरासमोर जरी तिच्या अपराधाने भरलेली आहे तरीही त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेह यांनी इस्राएल व यहूदीयाचा त्याग केला नाही.
- यिर्मयाह ५१:६सुमारे इ.स.पू. ५९५
“बाबेलमधून पलायन करा! आपला जीव वाचविण्यास पळा! तिच्या पापांमुळे तुम्ही तुमचा नाश करून घेऊ नका. हा याहवेहचा सूड घेण्याचा समय आहे; ज्यास ती पात्र आहे, त्याचा मोबदला ते तिला देतील.
- यिर्मयाह ५१:७सुमारे इ.स.पू. ५९५
बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; म्हणून आता ते वेडे झाले आहेत.
- यिर्मयाह ५१:८सुमारे इ.स.पू. ५९५
बाबिलोनचे अचानक पतन होईल व ती मोडली जाईल. तिच्यासाठी विलाप करा! तिच्या वेदना जाण्यासाठी औषध आणा; कदाचित ती बरी होऊ शकेल.
- यिर्मयाह ५१:९सुमारे इ.स.पू. ५९५
“ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते. पण ती बरी होऊ शकत नाही. आपण तिला सोडून आपल्या देशात परत जाऊ या. कारण तिचा न्याय आता आकाशापर्यंत पोचला आहे, तो स्वर्गाच्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.’
- यिर्मयाह ५१:१०सुमारे इ.स.पू. ५९५
“ ‘याहवेहने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे; चला, आपण सीयोनात जाऊन सांगू आमचे परमेश्वर याहवेहने काय केले आहे.’
- यिर्मयाह ५१:११सुमारे इ.स.पू. ५९५
“बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.
- यिर्मयाह ५१:१२सुमारे इ.स.पू. ५९५
बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.
- यिर्मयाह ५१:१३सुमारे इ.स.पू. ५९५
तुम्ही, जे बऱ्याच जलाशयाकाठी वास करता, आणि अतिसंपन्न आहात, तुमचा अंत जवळ आला आहे, तुमचा नाश होण्याचा समय आला आहे.
- यिर्मयाह ५१:१४सुमारे इ.स.पू. ५९५
सर्वसमर्थ याहवेह, स्वतःच्याच नावाची शपथ घेतातः मी निश्चितच तुम्हाला टोळधाडीसारख्या असंख्य सैनिकांनी भरून टाकेन आणि लोक तुमच्यावरील विजयोन्मादाने गर्जना करतील.
- यिर्मयाह ५१:१५सुमारे इ.स.पू. ५९५
“त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.
- यिर्मयाह ५१:१६सुमारे इ.स.पू. ५९५
जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघ गर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.
- यिर्मयाह ५१:१७सुमारे इ.स.पू. ५९५
“प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे; प्रत्येक सोनार त्याच्या मूर्तींनी लज्जित झाला आहे. त्याने घडविलेल्या प्रतिमा खोट्या आहेत. त्यांच्यामध्ये श्वास नाही.