मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ४९:२८सुमारे इ.स.पू. ५८३

    केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.

  2. यिर्मयाह ४९:२९सुमारे इ.स.पू. ५८३

    त्यांचे कळप व त्यांचे तंबू उचलून नेण्यात येतील; त्यांची आश्रयस्थाने, सर्व घरगुती सामान व उंटही हस्तगत केले जातील. लोक त्यांच्यावर ओरडून म्हणतील, ‘प्रत्येक बाजूला आतंक पसरला आहे!’

  3. यिर्मयाह ४९:३०सुमारे इ.स.पू. ५८३

    “लवकर दूर पळा! हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, याहवेह जाहीर करतात.

  4. यिर्मयाह ४९:३१सुमारे इ.स.पू. ५८३

    “सज्ज हो आणि सुखात राहणार्‍या राष्ट्रांवर हल्ला कर, जे आत्मविश्वासाने जगतात,” याहवेह जाहीर करतात. “ज्या राष्ट्रांना प्रवेशद्वार नाही वा सळया नाहीत; त्यातील लोक धोक्यांपासून दूर राहतात.

  5. यिर्मयाह ४९:३२सुमारे इ.स.पू. ५८३

    त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील, व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील. या मूर्तिपूजक लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन. याहवेह असे जाहीर करतात.

  6. यिर्मयाह ४९:३३सुमारे इ.स.पू. ५८३

    हासोरात कोल्हे संचार करतील, ते कायमचे ओसाड होईल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; मनुष्य तिथे वस्ती करणार नाही.”

  7. यिर्मयाह ४९:३४सुमारे इ.स.पू. ५८३

    यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याच्या कारकिर्दीच्या आरंभी एलामविषयी याहवेहकडून हा संदेश यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाला.

  8. यिर्मयाह ४९:३५सुमारे इ.स.पू. ५८३

    सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी एलामचा धनुष्य तोडणार आहे, जो त्यांच्या सामर्थ्याचा मुख्य आधार आहे.

  9. यिर्मयाह ४९:३६सुमारे इ.स.पू. ५८३

    मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्‍याला आणेन; ते आकाशाच्या चारही कोपऱ्यातून येतील; मी त्यांना चारही दिशातील वार्‍यावर पसरवून टाकेन, असे एकही राष्ट्र नसेल जिथे एलामचे निर्वासित नसतील.

  10. यिर्मयाह ४९:३७सुमारे इ.स.पू. ५८३

    जे एलामचा वध करू इच्छितात, त्या त्यांच्या शत्रूदेखत मी पांगापांग करेन; मी त्यांच्यावर अरिष्ट आणेन, माझा भयंकर क्रोधही आणेन,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांचा समूळ नाश करेपर्यंत त्यांचा तलवारीने पाठलाग करेन.

  11. यिर्मयाह ४९:३८सुमारे इ.स.पू. ५८३

    मी माझे राजासन एलाम येथे स्थापन करेन मी तिचा राजा व तिचे सरदार यांचा नाश करेन. असे याहवेह जाहीर करतात.

  12. यिर्मयाह ४९:३९सुमारे इ.स.पू. ५८३

    “तरी येत्या दिवसात मी एलामची समृद्धी परत आणेन,” याहवेह जाहीर करतात.

  13. यिर्मयाह ५०:१सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे:

  14. यिर्मयाह ५०:२सुमारे इ.स.पू. ५९५

    “राष्ट्रांमध्ये जाहीर कर व घोषणा कर, ध्वज उंचावून घोषणा कर; काहीही मागे सोडू नको, पण म्हण, ‘बाबेलचा पाडाव होणार आहे; तिचे दैवत बेल लज्जित करण्यात येणार आहे, मरोदख भयाने व्याप्त होणार. तिच्या मूर्ती लज्जित करण्यात येणार आहेत तिची दैवते भयाने व्याप्त होणार आहेत.’

  15. यिर्मयाह ५०:३सुमारे इ.स.पू. ५९५

    तिच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र हल्ला करेल आणि तिच्या भूमीचा विध्वंस करेल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; लोक आणि पशू पलायन करतील.

  16. यिर्मयाह ५०:४सुमारे इ.स.पू. ५९५

    “त्या समयी, त्या दिवसात इस्राएलचे लोक आणि यहूदीयाचे लोक एकत्र येतील, आणि अश्रू गाळीत त्यांचे परमेश्वर याहवेहचा शोध घेतील, याहवेह जाहीर करतात.

  17. यिर्मयाह ५०:५सुमारे इ.स.पू. ५९५

    ते सीयोनकडे जाणार्‍या मार्गाची विचारणा करतील आणि त्या दिशेने ते अभिमुख होतील. ते येतील व याहवेहशी, कधीही विस्मृतित न जाणाऱ्या, एका सार्वकालिक कराराशी जडून जातील.

  18. यिर्मयाह ५०:६सुमारे इ.स.पू. ५९५

    “माझे लोक हरवलेली मेंढरे होती; त्यांच्या मेंढपाळांनीच त्यांची वाट चुकविली त्यांना डोंगरांवर भटकण्यासाठी सोडून दिले होते. ते डोंगर व पर्वतावर भटकत राहिले व त्यांच्या मेंढवाड्यास ते विसरले.

  19. यिर्मयाह ५०:७सुमारे इ.स.पू. ५९५

    ज्यांना ते सापडले, त्यांनी त्यांना गिळंकृत केले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘आपण दोषी नाही, कारण याहवेह, त्यांचे हिरवेगार कुरण, आणि त्यांच्या पूर्वजांचे आशास्थान, यांच्याविरुद्धच ज्यांनी पाप केले आहे.’

  20. यिर्मयाह ५०:८सुमारे इ.स.पू. ५९५

    “बाबेलच्या बाहेर पळा; बाबिलोनच्या लोकांच्या भूमीचा त्याग करा, आणि त्या बोकडांसारखे व्हा, जे कळपाचे नेतृत्व करतात.

  21. यिर्मयाह ५०:९सुमारे इ.स.पू. ५९५

    कारण मी उत्तरेकडील महान राष्ट्रांना एकवटून बाबेलवर हल्ला करण्यास प्रेरित करणार. ते बाबेलवर हल्ला करण्यास सज्ज होतील, आणि उत्तरेकडून तिचा पाडाव होईल. त्यांचे बाण लक्ष्यवेधी योद्ध्यांसारखे असतील ते रिकाम्या हाताने परत जात नसतात.

  22. यिर्मयाह ५०:१०सुमारे इ.स.पू. ५९५

    तर मग बाबेलची लूट करण्यात येईल; ते सर्व तिची मनसोक्त लूट करतील,” असे याहवेह जाहीर करतात.

  23. यिर्मयाह ५०:११सुमारे इ.स.पू. ५९५

    “तुम्ही जे माझे वतन लुटता, तुम्ही आनंद व उल्हास करतात, तुम्ही धान्य मळणार्‍या कालवडीप्रमाणे बागडता आणि घोड्यांसारखे खिंकाळत असाल,

  24. यिर्मयाह ५०:१२सुमारे इ.स.पू. ५९५

    पण तुमची माता अत्यंत लज्जित होईल; जिने तुम्हाला जन्म दिला, तिची अप्रतिष्ठा होईल, ती सर्व राष्ट्रात सर्वात क्षुद्र होईल— मग ती अरण्यात असो, शुष्क भूमीत, वा वाळवंटात असो.

  25. यिर्मयाह ५०:१३सुमारे इ.स.पू. ५९५

    याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही, पण पूर्णपणे ओसाड होईल. आणि तिची अवस्था पाहून बाबेलातून येजा करणार्‍यांना दहशत वाटेल; तिच्या जखमा पाहून ते तिचा उपहास करतील.