मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ४९:३सुमारे इ.स.पू. ५८३

    “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.

  2. यिर्मयाह ४९:४सुमारे इ.स.पू. ५८३

    तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?

  3. यिर्मयाह ४९:५सुमारे इ.स.पू. ५८३

    तुझ्या सर्व बाजूने मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.

  4. यिर्मयाह ४९:६सुमारे इ.स.पू. ५८३

    “परंतु नंतर मी अम्मोन्यांच्या समृद्धीची भरपाई करेन,” याहवेह जाहीर करतात.

  5. यिर्मयाह ४९:७सुमारे इ.स.पू. ५८३

    एदोम्यांविषयी: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तेमान प्रांतात आता शहाणपणा राहिलेला नाही का? शहाण्या मनुष्यातून बोध नाहीसा झाला आहे काय? त्यांच्यातील समंजसपणा क्षय पावला आहे काय?

  6. यिर्मयाह ४९:८सुमारे इ.स.पू. ५८३

    ददान प्रदेशातील रहिवाशांनो, मागे वळा व पलायन करा, खोल गुहेत जाऊन लपा, कारण मी जेव्हा त्याला शिक्षा करेन, तेव्हा मी एसावावर अरिष्ट आणेन.

  7. यिर्मयाह ४९:९सुमारे इ.स.पू. ५८३

    जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले, तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय? जर रात्रीच्या वेळी चोर आले, तर ते त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय?

  8. यिर्मयाह ४९:१०सुमारे इ.स.पू. ५८३

    परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन; मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन, म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही. त्याचे शस्त्रधारी पुरुष, तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत, म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही,

  9. यिर्मयाह ४९:११सुमारे इ.स.पू. ५८३

    ‘तुझ्या पितृहीन मुलांना माझ्याकडे ठेव; मी त्यांना जिवंत ठेवेन. आणि तुझ्या विधवाही माझ्यावर विसंबून राहू शकतात.’ ”

  10. यिर्मयाह ४९:१२सुमारे इ.स.पू. ५८३

    याहवेह असे म्हणतात: “जे हे पेय पिण्यास पात्र नाहीत त्यांनी ते प्यालेच पाहिजे, तुम्हाला शिक्षा का होऊ नये? तुम्ही शिक्षा भोगलीच पाहिजे, तुम्ही ते प्यालेच पाहिजे.

  11. यिर्मयाह ४९:१३सुमारे इ.स.पू. ५८३

    याहवेह जाहीर करतात, मी माझ्या नावाची शपथ वाहून म्हणत आहे, बस्रा उद्ध्वस्त व शापित होईल, ते दहशत व उपहासाचा विषय बनतील; आणि त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”

  12. यिर्मयाह ४९:१४सुमारे इ.स.पू. ५८३

    मी याहवेहकडून हा संदेश ऐकला आहे; “एदोमावर हल्ला करण्यास एकत्र या! युद्ध करण्यास सज्ज व्हा!” असे सर्व राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला होता.

  13. यिर्मयाह ४९:१५सुमारे इ.स.पू. ५८३

    “आता राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन व सर्व मानवजात तुमचा तिरस्कार करतील.

  14. यिर्मयाह ४९:१६सुमारे इ.स.पू. ५८३

    तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता, तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत. जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत, तरी तिथून मी तुला खाली आणेन. असे याहवेह जाहीर करतात.

  15. यिर्मयाह ४९:१७सुमारे इ.स.पू. ५८३

    एदोम दहशतीचे ठिकाण होईल; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.

  16. यिर्मयाह ४९:१८सुमारे इ.स.पू. ५८३

    याहवेह जाहीर करतात जसा सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश झाला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही; त्यात लोक वस्ती करणार नाहीत.

  17. यिर्मयाह ४९:१९सुमारे इ.स.पू. ५८३

    “यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”

  18. यिर्मयाह ४९:२०सुमारे इ.स.पू. ५८३

    एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. तेमानमध्ये राहणार्‍या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.

  19. यिर्मयाह ४९:२१सुमारे इ.स.पू. ५८३

    एदोमच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्यांचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत प्रतिध्वनित होईल.

  20. यिर्मयाह ४९:२२सुमारे इ.स.पू. ५८३

    पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल, व बस्रावर आपले पंख पसरेल. त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे वेणा देणार्‍या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील.

  21. यिर्मयाह ४९:२३सुमारे इ.स.पू. ५८३

    दिमिष्क विषयी: “हमाथ व अर्पाद ही शहरे भीतीने घाबरी झाली आहेत, कारण त्यांना वाईट बातमी समजली आहे. ते निराश झाले आहेत, एखाद्या खवळलेल्या समुद्रागत अस्वस्थ झाले आहेत.

  22. यिर्मयाह ४९:२४सुमारे इ.स.पू. ५८३

    दिमिष्क दुर्बल झाले आहे, पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे; जशा प्रसूत होणार्‍या वेदना स्त्रियांना घेरतात, त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे.

  23. यिर्मयाह ४९:२५सुमारे इ.स.पू. ५८३

    जी नगरी मला प्रसन्न करते, त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही?

  24. यिर्मयाह ४९:२६सुमारे इ.स.पू. ५८३

    निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील; तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  25. यिर्मयाह ४९:२७सुमारे इ.स.पू. ५८३

    “आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”