मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, तर ती स्वस्थ कशी बसेल, त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?”

  2. यिर्मयाह ४८:१सुमारे इ.स.पू. ५८४

    मोआबी लोकांविषयी: इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, यांनी दिलेला संदेश हा आहे: “नबो शहराचा धिक्कार असो, कारण त्याचा विध्वंस होईल. किर्याथाईम लज्जित होईल व हस्तगत करण्यात येईल; तेथील किल्ले लज्जित होतील व चक्काचूर करण्यात येतील.

  3. यिर्मयाह ४८:२सुमारे इ.स.पू. ५८४

    आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही; हेशबोनमधील लोक तिच्या अधःपतनाचा कट रचतील: ते म्हणतील, ‘चला, आपण त्या राष्ट्राचा अंत करू.’ तुम्ही मदमेनमधील लोकही निःशब्द केले जातील; तलवार तुमचा पाठलाग करेल.

  4. यिर्मयाह ४८:३सुमारे इ.स.पू. ५८४

    नंतर होरोनाईममधून विलापध्वनी ऐकू येत आहे, प्रचंड संहाराचा व विध्वंसाचा आक्रांत ऐकू येत आहे.

  5. यिर्मयाह ४८:४सुमारे इ.स.पू. ५८४

    कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे, तिचे बालक विलाप करतील.

  6. यिर्मयाह ४८:५सुमारे इ.स.पू. ५८४

    ते लुहिथच्या डोंगरावर चढतील व चढताना आक्रोश करीत जातील; व होरोनाईम नगराच्या उतरणीवरून विनाश बघतांनाच्या किंकाळ्या ऐकू येतील.

  7. यिर्मयाह ४८:६सुमारे इ.स.पू. ५८४

    पळा, जीव घेऊन पळा! रानावनात झुडूपागत व्हा.

  8. यिर्मयाह ४८:७सुमारे इ.स.पू. ५८४

    कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.

  9. यिर्मयाह ४८:८सुमारे इ.स.पू. ५८४

    विनाशक प्रत्येक नगराविरुद्ध येईल, एकाही नगराची त्याच्या हातून सुटका होणार नाही. दर्‍याखोर्‍यांचा नाश होईल, आणि पठारे उद्ध्वस्त होतील, कारण याहवेहने तसे म्हटले आहे.

  10. यिर्मयाह ४८:९सुमारे इ.स.पू. ५८४

    मोआबावर मीठ टाका कारण तिचा उकिरडा बनेल; तिची नगरे उजाड़ होतील, तिथे कोणीही वसती करणार नाही.

  11. यिर्मयाह ४८:१०सुमारे इ.स.पू. ५८४

    “याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो! रक्तपात न करता तलवार म्यानात ठेवणारे शापित असो!

  12. यिर्मयाह ४८:११सुमारे इ.स.पू. ५८४

    “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.

  13. यिर्मयाह ४८:१२सुमारे इ.स.पू. ५८४

    परंतु याहवेह म्हणतात, लवकरच असे दिवस येत आहेत, मी तिला बुधल्यातून ओतणारी माणसे पाठवेन, ते तिला या पात्रातून ओतून बाहेर टाकतील; ते तिचे बुधले रिकामी करतील व नंतर तिची पात्रे फोडून टाकतील.

  14. यिर्मयाह ४८:१३सुमारे इ.स.पू. ५८४

    इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,

  15. यिर्मयाह ४८:१४सुमारे इ.स.पू. ५८४

    “ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ असे तुम्ही कसे बोलू शकता?

  16. यिर्मयाह ४८:१५सुमारे इ.स.पू. ५८४

    परंतु आता मोआबचा सर्वनाश होणार आहे, तिची नगरे हस्तगत केली जाणार आहेत; तिच्या अत्यंत उमद्या तरुणांची कत्तल होईल,” असे राजाधिराज, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे ते म्हणतात.

  17. यिर्मयाह ४८:१६सुमारे इ.स.पू. ५८४

    “मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे; तिच्यावरील अरिष्ट वेगाने येणार आहे.

  18. यिर्मयाह ४८:१७सुमारे इ.स.पू. ५८४

    तिच्याभोवती असणाऱ्या सर्व लोकांनो, तिच्यासाठी विलाप करा, तिची किर्ती माहीत असणारे सर्व सामील व्हा; म्हणा, ‘तिचा बलशाली राजदंड कसा मोडला, इतकी वैभवशाली काठी कशी मोडली!’

  19. यिर्मयाह ४८:१८सुमारे इ.स.पू. ५८४

    “अहो दिबोन कन्येचे निवासी, आपल्या वैभवावरून खाली उतरा आणि शुष्क भूमीवर येऊन बसा, कारण जे मोआब भूमीचा विनाशक तुमच्याविरुद्ध येत आहेत आणि ते तिच्या सर्व तटबंदीची नगरे नष्ट करतील.

  20. यिर्मयाह ४८:१९सुमारे इ.स.पू. ५८४

    अरोएरवासी जनहो, तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा, आणि पळ काढणार्‍या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा, ‘तिथे काय घडले?’

  21. यिर्मयाह ४८:२०सुमारे इ.स.पू. ५८४

    मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे. रडा व आकांत करा! आर्णोनच्या काठी घोषणा करा मोआब नष्ट झाले आहे.

  22. यिर्मयाह ४८:२१सुमारे इ.स.पू. ५८४

    पठारे—होलोन, याहसाह, मेफाथ यांनाही शिक्षा मिळाली आहे.

  23. यिर्मयाह ४८:२२सुमारे इ.स.पू. ५८४

    दिबोन, नबो, बेथ‑दिबलाथाईम,

  24. यिर्मयाह ४८:२३सुमारे इ.स.पू. ५८४

    किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन

  25. यिर्मयाह ४८:२४सुमारे इ.स.पू. ५८४

    करीयोथ, बस्रा— मोआबभूमीच्या जवळच्या व दूरच्या सर्वच नगरांना शिक्षा झाली आहे.