मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ४४:२०सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा हे उत्तर देणार्‍या सर्व स्त्रीपुरुषांना यिर्मयाह म्हणाला,

  2. यिर्मयाह ४४:२१सुमारे इ.स.पू. ५८७

    “तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे व अधिपती, आणि सर्व लोक यहूदीयाच्या नगरामध्ये, आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर मूर्तींपुढे धूप जाळीत होता, हे याहवेहच्या स्मरणात नाही का व ते त्यांनी दर्शवून दिले नाही का?

  3. यिर्मयाह ४४:२२सुमारे इ.स.पू. ५८७

    तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.

  4. यिर्मयाह ४४:२३सुमारे इ.स.पू. ५८७

    जी तुम्ही बघता ती भयानक संकटे तुमच्यावर कोसळली याचे खरे कारण एकच आहे, ते म्हणजे तुम्ही मूर्तींपुढे धूप जाळला, याहवेहविरुद्ध पाप केले आणि त्यांच्या आज्ञा, नियम व करार पाळण्याचे नाकारले.”

  5. यिर्मयाह ४४:२४सुमारे इ.स.पू. ५८७

    मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका!

  6. यिर्मयाह ४४:२५सुमारे इ.स.पू. ५८७

    सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!

  7. यिर्मयाह ४४:२६सुमारे इ.स.पू. ५८७

    तरीपण इजिप्त देशात राहणार्‍या सर्व यहूद्यांनो, याहवेहचे वचन ऐका: ‘मी आपल्या थोर नामाची शपथ घेत आहे, याहवेह म्हणतात, इजिप्त देशात राहणारे कोणीही यहूदीयाचे नागरिक “सार्वभौम याहवेहच्या नावाची शपथ.” असे कधीही म्हणणार नाही.

  8. यिर्मयाह ४४:२७सुमारे इ.स.पू. ५८७

    इजिप्तमधील सर्व यहूदी लोक तलवारीने व दुष्काळाने नाश पावतील; तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी नव्हे तर अनिष्टासाठी माझी त्यांच्यावर नजर आहे.

  9. यिर्मयाह ४४:२८सुमारे इ.स.पू. ५८७

    तलवारीपासून वाचलेले जे इजिप्त देशातून यहूदीयाला परत जातील, ते अगदी थोडके असतील. मग इजिप्त देशात येऊन राहणाऱ्या यहूदीयाच्या सर्व अवशेष नागरिकांना कळेल की कोणाचा शब्द खरा ठरतो—माझा की त्यांचा.

  10. यिर्मयाह ४४:२९सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘याहवेह जाहीर करतात, या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा करण्याचे हे चिन्ह मी तुम्हाला देईन, म्हणजे तुमच्यावर संकटे कोसळणार या मी दिलेल्या धमक्या खऱ्या आहेत हे तुम्हाला कळेल.’

  11. यिर्मयाह ४४:३०सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हातात देईन.’ ”

  12. यिर्मयाह ४५:१सुमारे इ.स.पू. ६०७

    यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:

  13. यिर्मयाह ४५:२सुमारे इ.स.पू. ६०७

    “हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत:

  14. यिर्मयाह ४५:३सुमारे इ.स.पू. ६०७

    तू म्हणालास, ‘मला धिक्कार असो! माझ्या क्लेशात याहवेहने दुःखाची भर घातली आहे; मी उसासे टाकून थकून गेलो आहे आणि मला काही विश्रांती मिळत नाही.’

  15. यिर्मयाह ४५:४सुमारे इ.स.पू. ६०७

    परंतु याहवेहने मला तुला हे सांगण्यास म्हटले, ‘याहवेह असे म्हणतात: जे मी बांधलेले आहे ते मी नष्ट करेन, संपूर्ण पृथ्वीवर मी जे पेरले, ते मीच उपटून टाकेन.

  16. यिर्मयाह ४५:५सुमारे इ.स.पू. ६०७

    मग तू स्वतःसाठी मोठमोठ्या गोष्टी मिळवू पाहतोस काय? तसे करू नकोस, कारण या सर्व लोकांवर मी महान विपत्ती आणणार असलो, तरी मात्र तू जिथे जाशील, तिथे मी तुझा जीव वाचवेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”

  17. यिर्मयाह ४६:१सुमारे इ.स.पू. ६०७

    राष्ट्रांसंबंधी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:

  18. यिर्मयाह ४६:२सुमारे इ.स.पू. ६०७

    इजिप्तसंबंधी: योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीशच्या लढाईत इजिप्तचा राजा फारोह नखो व त्याचे सैन्य यांचा पराभव केला. त्या प्रसंगी इजिप्तच्या सेनेविरुद्ध हा संदेश देण्यात आला.

  19. यिर्मयाह ४६:३सुमारे इ.स.पू. ६०७

    “तुमच्या ढाली सिद्ध करा, लहान व मोठ्या अशा दोन्ही, आणि लढाईसाठी कूच करा!

  20. यिर्मयाह ४६:४सुमारे इ.स.पू. ६०७

    घोड्यांवर खोगीर चढवा, आणि अश्वारूढ व्हा! शिरस्त्राण घालून मोर्चा बांधा! भाल्यांना धार लावा, व चिलखते चढवा!

  21. यिर्मयाह ४६:५सुमारे इ.स.पू. ६०७

    मी हे काय पाहात आहे? ते भयभीत झालेले आहेत, ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत. मागे वळूनदेखील न पाहता ते घाईघाईत पळत आहेत, आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात.

  22. यिर्मयाह ४६:६सुमारे इ.स.पू. ६०७

    “चपळ सैनिक पळू शकत नाहीत. वा बलाढ्य निसटून शकत नाहीत. उत्तरेकडे फरात नदीकाठी ते अडखळून पडत आहेत.

  23. यिर्मयाह ४६:७सुमारे इ.स.पू. ६०७

    “नाईल नदीसारखा हा कोण उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखा हा कोण आहे?

  24. यिर्मयाह ४६:८सुमारे इ.स.पू. ६०७

    इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखी. ती म्हणते, ‘मी उभारेन व पृथ्वी व्यापून टाकेन; मी नगरांना व त्यांच्या लोकांना नष्ट करेन.’

  25. यिर्मयाह ४६:९सुमारे इ.स.पू. ६०७

    अश्वांनो, तुम्ही हल्ला करा! सारथ्यांनो, तुम्ही आवेशाने धाव घ्या! योद्ध्यांनो—पूट व कूश या प्रांतातील ढालधारक, लूदीमवासी बाण जे सोडतात, ते तुम्ही सर्वजण पुढे कूच करा!