circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ४२:५सुमारे इ.स.पू. ५८८
त्यावर ते यिर्मयाहला म्हणाले, “आम्हाला याहवेह जे करावयास सांगतील, ते आम्ही करण्याचे नाकारले, तर याहवेह आमचे परमेश्वर आमच्याविरुद्ध सत्य व विश्वसनीय साक्षीदार असतील.
- यिर्मयाह ४२:६सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांचा संदेश आम्हाला अनुकूल असो वा प्रतिकूल, आम्ही आमच्या याहवेहच्या आज्ञा पाळू, आम्ही तुला ज्यांच्याकडे विनंती करण्यास पाठवित आहोत, त्या आमच्या परमेश्वर याहवेहचे आम्ही ऐकू.”
- यिर्मयाह ४२:७सुमारे इ.स.पू. ५८८
दहा दिवसांनी यिर्मयाहला याहवेहचे वचन आले.
- यिर्मयाह ४२:८सुमारे इ.स.पू. ५८८
तेव्हा त्याने कारेहाचा पुत्र योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाप्रमुख व सर्व लहान थोर लोक यांना एकत्र बोलाविले.
- यिर्मयाह ४२:९सुमारे इ.स.पू. ५८८
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपली विनंती सादर करण्यासाठी मला याहवेह, इस्राएलाच्या परमेश्वराकडे पाठविले, ते असे म्हणतात:
- यिर्मयाह ४२:१०सुमारे इ.स.पू. ५८८
‘तुम्ही जर याच देशात राहिलात तर मी तुम्हाला उभारेन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही; मी तुम्हाला रोपीन, आणि उपटून टाकणार नाही, कारण तुमच्यावर अरिष्ट आणल्याचा मला अनुताप होत आहे.
- यिर्मयाह ४२:११सुमारे इ.स.पू. ५८८
आता ज्याला तुम्ही घाबरता त्या बाबेलच्या राजाचे मुळीच भय बाळगू नका. त्याला भयभीत होऊ नका, याहवेह असे जाहीर करतात, कारण मी तुम्हासह असेन व तुम्हाला त्याच्या हातातून सोडवेन.
- यिर्मयाह ४२:१२सुमारे इ.स.पू. ५८८
त्याने तुमच्यावर दया करावी व तुम्हाला तुमच्या भूमीवर परत पुनर्वसित करावे म्हणून मी तुमच्यावर दया करेन.’
- यिर्मयाह ४२:१३सुमारे इ.स.पू. ५८८
“परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही,
- यिर्मयाह ४२:१४सुमारे इ.स.पू. ५८८
आणि आम्ही इजिप्तमध्ये जाऊन राहू, जिथे आम्हाला लढाई, रणशिंगे ऐकू येणार नाहीत किंवा अन्नाची भूक यापासून सुटका मिळेल,’
- यिर्मयाह ४२:१५सुमारे इ.स.पू. ५८८
तर तुम्हाला याहवेहचे हे वचन मिळत आहे, हे यहूदीयाच्या अवशेषा, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘जर तुम्ही इजिप्तमध्ये जाण्याचा व तिथेच राहण्याचा हट्ट कराल,
- यिर्मयाह ४२:१६सुमारे इ.स.पू. ५८८
तर ज्या लढाईच्या व दुष्काळाच्या आपत्तींना तुम्ही घाबरता, त्या तुमच्या मागोमाग इजिप्तमध्ये येतील व तुम्ही तिथे नाश पावाल.
- यिर्मयाह ४२:१७सुमारे इ.स.पू. ५८८
तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’
- यिर्मयाह ४२:१८सुमारे इ.स.पू. ५८८
कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’
- यिर्मयाह ४२:१९सुमारे इ.स.पू. ५८८
“कारण याहवेहने तुम्हाला म्हटले आहे. ‘अहो यहूदीयातील अवशिष्ट लोकांनो, इजिप्तमध्ये जाऊ नका! आज मी तुम्हाला इशारा दिला आहे, तो कधी विसरू नका.
- यिर्मयाह ४२:२०सुमारे इ.स.पू. ५८८
तुम्ही ही भयानक चूक केली आहे, तुम्हीच मला याहवेह, तुमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी पाठविले होते व सांगितले की आमच्या याहवेह परमेश्वराकडे प्रार्थना करून ते काय म्हणतात ते सर्व आम्हाला सांग, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू.’
- यिर्मयाह ४२:२१सुमारे इ.स.पू. ५८८
याहवेह तुमचे परमेश्वर यांनी जे सांगण्यास मला तुमच्याकडे पाठविले, ते मी तुम्हाला आज सांगितले, परंतु तुम्ही ते अद्यापि पाळले नाही.
- यिर्मयाह ४२:२२सुमारे इ.स.पू. ५८८
म्हणून आता तुम्ही हे निश्चित समजा: जिथे जाऊन वसती करण्याची तुमची इच्छा आहे, तिथे तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल.”
- यिर्मयाह ४३:१सुमारे इ.स.पू. ५८८
जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा
- यिर्मयाह ४३:२सुमारे इ.स.पू. ५८८
होशयाहचा पुत्र अजर्याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही.
- यिर्मयाह ४३:३सुमारे इ.स.पू. ५८८
नेरीयाहचा पुत्र नेरीयाहचा पुत्र बारूख याने तुला हे आम्हास सांगण्यास चिथविले आहे, म्हणजे आम्ही येथेच राहू आणि बाबिलोनच्या सैन्याकडून मारले जाऊ किंवा गुलाम करून बाबेलला नेले जाऊ.”
- यिर्मयाह ४३:४सुमारे इ.स.पू. ५८८
अशाप्रकारे कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख व सर्व लोकांनी यहूदीयात राहण्याची याहवेहची अवज्ञा केली.
- यिर्मयाह ४३:५सुमारे इ.स.पू. ५८८
यहूदीया जे इतर देशात विखुरलेले पण आता परत आलेल्या सर्व उरलेल्या लोकांना कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख आपल्या देखरेखीत घेऊन निघाले.
- यिर्मयाह ४३:६सुमारे इ.स.पू. ५८८
त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.
- यिर्मयाह ४३:७सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांनी याहवेहची आज्ञा न पाळता इजिप्तमध्ये प्रवेश केला आणि ते तहपनहेस पर्यंत येऊन पोहोचले.