मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ४३:८सुमारे इ.स.पू. ५८८

    तहपनहेस येथे यिर्मयाहला याहवेहचे वचन आले:

  2. यिर्मयाह ४३:९सुमारे इ.स.पू. ५८८

    “यहूदी लोक तुझ्याकडे पाहत असताना त्यांच्या समक्ष तहपनहेस येथील फारोहच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी फरसबंदीचे जे दगड आहेत, त्यांच्यामध्ये काही मोठे धोंडे मातीत पुरून टाक,

  3. यिर्मयाह ४३:१०सुमारे इ.स.पू. ५८८

    आणि मग त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला इजिप्तमध्ये पाठवेन. मी त्याचे सिंहासन याच लपविलेल्या धोंड्यावर स्थापन करेन; मग तो त्यावर आपला राजमंडप पसरेल.

  4. यिर्मयाह ४३:११सुमारे इ.स.पू. ५८८

    तो येईल व इजिप्त देशावर हल्ला करेल, जे मृत्यूसाठी नियुक्त आहेत, त्यांना तो मृत्यू देईल, जे बंदिवासासाठी नियुक्त आहेत, त्यांना बंदिवासात टाकेल, आणि जे तलवारीसाठी नियुक्त आहेत, त्यांचा तो तलवारीने वध करेल.

  5. यिर्मयाह ४३:१२सुमारे इ.स.पू. ५८८

    तो इजिप्तच्या दैवतांच्या मंदिरांना आग लावील; तो त्यांची मंदिरे जाळून त्यांच्या मूर्ती ताब्यात घेईल. एखादा धनगर आपल्या अंगरख्यातील पिसवा वेचून स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो इजिप्त देशातील सर्व वेचूनवेचून लुटून नेईल.

  6. यिर्मयाह ४३:१३सुमारे इ.स.पू. ५८८

    तसेच इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या मंदिरातील बेथ-शेमेशचे स्तंभ नष्ट करून तो मोडून टाकील व इजिप्तच्या दैवतांची मंदिरे जाळून भस्म करेल.’ ”

  7. यिर्मयाह ४४:१सुमारे इ.स.पू. ५८७

    इजिप्तच्या उत्तरेस मिग्दोल, तहपनहेस, व मेम्फीस या शहरात व संबंध दक्षिण इजिप्तमधील पथरोस प्रदेशात राहत असलेल्या यहूद्यांसंबंधी याहवेहचे यिर्मयाहला हे वचन आले:

  8. यिर्मयाह ४४:२सुमारे इ.स.पू. ५८७

    “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: यरुशलेम व यहूदीयाची सर्व नगरे यांच्यावर मी कसा विनाश आणला, ते तुम्ही पाहिले आहे. ते आता टाकलेल्या लोकागत भग्नावशेषात निवास करतात,

  9. यिर्मयाह ४४:३सुमारे इ.स.पू. ५८७

    त्यांनी केलेल्या दुष्टाईमुळेच असे झाले. त्यांनी इतर दैवतांना धूप जाळला व त्यांची आराधना केली म्हणून माझा क्रोध त्यांच्यावर भडकला. अशी दैवते जी त्यांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनाही माहीत नव्हती.

  10. यिर्मयाह ४४:४सुमारे इ.स.पू. ५८७

    मी माझे सेवक संदेष्टे त्यांच्याकडे वारंवार पाठविले, हे सांगण्यास, ‘ज्यांचा मला तिरस्कार वाटतो, त्या घृणास्पद गोष्टी करू नका!’

  11. यिर्मयाह ४४:५सुमारे इ.स.पू. ५८७

    पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; आणि आपल्या कुमार्गापासून ते माघारी फिरले नाहीत व इतर दैवतांना धूप जाळण्याचे बंदही केले नाही.

  12. यिर्मयाह ४४:६सुमारे इ.स.पू. ५८७

    यामुळे माझा क्रोधाग्नी उफाळून आला; त्याचा यहूदीयातील नगरांवर, यरुशलेमच्या रस्त्यावर वर्षाव झाला. त्याने ती नगरे ओसाड केली, जसे ते आजही आहेत.

  13. यिर्मयाह ४४:७सुमारे इ.स.पू. ५८७

    “आता सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही स्वतःवर विनाश आणला. यहूदीयातील तुमचे पुरुष, स्त्री, अथवा लेकरे व तान्हीमुले देखील वाचणार नाहीत व तुमचे कोणीही अवशेष राहणार नाहीत असे तुम्ही का करीत आहात?

  14. यिर्मयाह ४४:८सुमारे इ.स.पू. ५८७

    इथे तुम्ही बनविलेल्या मूर्ती केल्या. इजिप्तमध्ये, जिथे तुम्ही निवास करण्यास आला आहात, तेथील इतर दैवतांना धूप जाळून, तुम्ही माझा क्रोध का भडकावित आहात व तुमचा पूर्ण नाश करावयाला मला का लावत आहात? तुम्ही स्वतःस पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शाप व त्यांच्या उपहासाचा विषय बनवित आहात.

  15. यिर्मयाह ४४:९सुमारे इ.स.पू. ५८७

    तुम्ही तुमच्या पूर्वजांनी केलेली पापे, यहूदीयाचे राजे व राण्यांनी केलेली पापे, यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावर तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी केलेली पापे, ही सर्व विसरला काय?

  16. यिर्मयाह ४४:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि अद्यापही कोणी लीन होऊन माझ्याविषयी श्रद्धा व्यक्त केली नाही, किंवा मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेले नियम व आज्ञा पाळल्या नाही.

  17. यिर्मयाह ४४:११सुमारे इ.स.पू. ५८७

    “म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी तुम्हावर अरिष्ट आणून संपूर्ण यहूदीयाचा नाश करण्याचा निर्धार केला आहे.

  18. यिर्मयाह ४४:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्‍या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील.

  19. यिर्मयाह ४४:१३सुमारे इ.स.पू. ५८७

    यरुशलेममध्ये राहणाऱ्यांना मी जशी शिक्षा केली, तशीच या इजिप्तमध्ये राहणाऱ्यांनाही मी तलवार, दुष्काळ व मरी यांनी शिक्षा करेन.

  20. यिर्मयाह ४४:१४सुमारे इ.स.पू. ५८७

    इजिप्तमध्ये निवास करण्यास गेलेल्या यहूदीयाच्या अवशेषांपैकी एकही जण, जिथे परत येऊन राहण्याची त्यांची उत्कट इच्छा आहे, तिथे सुटून परत यहूदीयात येण्यासाठी जिवंत राहणार नाहीत; मोजक्या फराऱ्यांशिवाय कोणीही परतणार नाही.”

  21. यिर्मयाह ४४:१५सुमारे इ.स.पू. ५८७

    त्यांच्या स्त्रिया इतर सर्व उपस्थित स्त्रियांसोबत—एका विशाल सभेत—परकीय दैवतांना धूप जाळीत असतात हे माहीत असलेल्या पुरुषांनी व वरच्या व खालच्या इजिप्तच्या पथरोसमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी यिर्मयाहला उत्तर दिले:

  22. यिर्मयाह ४४:१६सुमारे इ.स.पू. ५८७

    “याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही!

  23. यिर्मयाह ४४:१७सुमारे इ.स.पू. ५८७

    आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही.

  24. यिर्मयाह ४४:१८सुमारे इ.स.पू. ५८७

    जेव्हापासून आम्ही आकाशराणीला धूप जाळणे थांबविले व तिला पेयार्पणे करण्याचे थांबविले, तेव्हापासून आम्हाला सर्व गोष्टींचा अभाव झाला असून तलवारीने आणि दुष्काळाने आमचा नाश होत आहे.”

  25. यिर्मयाह ४४:१९सुमारे इ.स.पू. ५८७

    स्त्रिया त्याची पुष्टी करीत म्हणाल्या, “आम्ही आकाशराणीची पूजा करीत होतो, तिला पेयार्पणे ओतीत होतो, तिच्यासाठी तिची प्रतिमा असलेल्या पोळ्या करीत होतो, हे सर्व आमच्या पतींना माहीत नव्हते काय?”