मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ४६:१०सुमारे इ.स.पू. ६०७

    कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे— हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे. रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील. कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार.

  2. यिर्मयाह ४६:११सुमारे इ.स.पू. ६०७

    “हे इजिप्तच्या कुमारिके, वर गिलआदामध्ये जाऊन औषध आण. तुझे घाव बरे व्हावे म्हणून तू अनेक औषधे वापरलीस, पण तुझे घाव बरे करेल असे औषधच नाही.

  3. यिर्मयाह ४६:१२सुमारे इ.स.पू. ६०७

    राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील; तुझ्या आक्रोशाने संपूर्ण पृथ्वी भरेल. तुझे योद्धे परस्परांवर अडखळून पडतील; दोघेही एकमेकांसोबत एकत्र पडतील.”

  4. यिर्मयाह ४६:१३सुमारे इ.स.पू. ६०७

    यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता:

  5. यिर्मयाह ४६:१४सुमारे इ.स.पू. ६०७

    “इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’

  6. यिर्मयाह ४६:१५सुमारे इ.स.पू. ६०७

    तुमचे योद्धे कोलमडून का पडले? ते उभे राहू शकत नाहीत, कारण याहवेहने त्यांना खाली ढकलले आहे.

  7. यिर्मयाह ४६:१६सुमारे इ.स.पू. ६०७

    ते पुन्हापुन्हा अडखळतील; ते एकमेकांवर कोसळून पडतील. ते म्हणतील, ‘चला, उठा, आपल्या लोकांकडे व आपल्या जन्मभूमीत आपण परत जाऊ, या छळवाद्यांच्या तलवारीपासून दूर जाऊ.’

  8. यिर्मयाह ४६:१७सुमारे इ.स.पू. ६०७

    तिथे ते उद्गारतील, ‘इजिप्तचा राजा फारोह होफ्रा व्यर्थ गोंगाट करणारा मनुष्य आहे; त्याने त्याला मिळालेली सुसंधी घालविली.’

  9. यिर्मयाह ४६:१८सुमारे इ.स.पू. ६०७

    “ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे, ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’ जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा, समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे.

  10. यिर्मयाह ४६:१९सुमारे इ.स.पू. ६०७

    इजिप्तमधील रहिवाशांनो, सामानाची बांधाबांध करा, कारण मेम्फीस शहराचा नाश होणार आहे व ते ओसाड होऊन एक निर्जन स्थान होईल.

  11. यिर्मयाह ४६:२०सुमारे इ.स.पू. ६०७

    “इजिप्त ही सुंदर कालवड आहे; परंतु उत्तरेकडून तिच्याविरुद्ध गांधीलमाशी येत आहे.

  12. यिर्मयाह ४६:२१सुमारे इ.स.पू. ६०७

    तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. तेही वळून एकत्र पलायन करतील, ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.

  13. यिर्मयाह ४६:२२सुमारे इ.स.पू. ६०७

    जसे त्यांचे बलाढ्य शत्रूपुढे चाल करतील, जंगलतोड्यांगत येऊन त्यांच्यावर ते कुऱ्हाड घेऊन आक्रमण करतील. तेव्हा इजिप्त फुत्कारणाऱ्या सर्पाप्रमाणे पळ काढेल;

  14. यिर्मयाह ४६:२३सुमारे इ.स.पू. ६०७

    याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल ते कापून नष्ट करतील. ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील, ज्यांची संख्या मोजता येणार नाही.

  15. यिर्मयाह ४६:२४सुमारे इ.स.पू. ६०७

    उत्तरेकडील लोकांच्या तावडीत सापडलेल्या इजिप्तच्या कुमारिकेची लज्जा घालविण्यात येईल.”

  16. यिर्मयाह ४६:२५सुमारे इ.स.पू. ६०७

    सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे.

  17. यिर्मयाह ४६:२६सुमारे इ.स.पू. ६०७

    त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात.

  18. यिर्मयाह ४६:२७सुमारे इ.स.पू. ६०७

    “याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नको; इस्राएला, निराश होऊ नका. मी बंदिवासाच्या देशातून तुमच्या वंशजांचा दूर देशातून तुमचा बचाव करेन, याकोबाला पुन्हा शांती व संरक्षण मिळेल, त्याला कोणीही भयभीत करणार नाही.

  19. यिर्मयाह ४६:२८सुमारे इ.स.पू. ६०७

    याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे.” असे याहवेह जाहीर करतात. “मी तुला ज्या राष्ट्रांमध्ये विखरून दिले होते, त्या राष्ट्रांचा जरी नाश केला, परंतु तुझा संपूर्ण नाश करणार नाही. मी तुला शिस्त लावण्यासाठी एका मर्यादेत शिक्षा करेन. तुला पूर्णपणे विना शिक्षेचे मी सोडणार नाही.”

  20. गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:

  21. याहवेह हे असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे; तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल. जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे. लोक किंकाळ्या मारतील; त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील. कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, शत्रूंच्या रथाचा आवाज आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे. त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत; त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.

  22. At the noise of the stamping of the hoofs of his strong horses, at the rushing of his chariots, and at the rumbling of his wheels, the fathers shall not look back to their children for feebleness of hands;

  23. कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास आणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा, सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचा समय आला आहे. याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत, कफतोरहून आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत.

  24. गाझा विलापाचे चिन्ह म्हणून आपले मुंडण करेल; अष्कलोन पूर्णपणे निःशब्द होईल. अहो तुम्ही घाटातील अवशिष्ट लोकहो, तुम्ही केव्हापर्यंत स्वतःच्या देहास जखमी कराल?

  25. “ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी, तू पुन्हा केव्हा विसावा घेणार? जा! आपल्या म्यानात परत जा; शांत राहा व स्तब्ध हो.’