मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ४८:२५सुमारे इ.स.पू. ५८४

    मोआबभूमीचे शिंग तोडून टाकण्यात आले आहे. तिचे बाहू मोडले आहेत.” असे याहवेह जाहीर करतात.

  2. यिर्मयाह ४८:२६सुमारे इ.स.पू. ५८४

    “तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे, कारण तिने याहवेहविरुद्ध बंड केले आहे. मोआबभूमी आपल्याच वांतीत लोळू दे; तिला उपहासाचा विषय होऊ दे.

  3. यिर्मयाह ४८:२७सुमारे इ.स.पू. ५८४

    इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का? ती चोरांच्यामध्ये पकडली गेली का, कारण जेव्हाही तिचा उल्लेख होतो, घृणाभावनेने तुम्ही आपली मान हालविता नाही का?

  4. यिर्मयाह ४८:२८सुमारे इ.स.पू. ५८४

    मोआबभूमीच्या रहिवाशांनो आपली नगरे सोडा आणि खडकांच्या कपारीत जाऊन राहा. गुहेच्या तोंडाशी घरी बांधणाऱ्या पारव्याप्रमाणे व्हा.

  5. यिर्मयाह ४८:२९सुमारे इ.स.पू. ५८४

    “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे— तिचा गर्व किती मोठा आहे— तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे.

  6. यिर्मयाह ४८:३०सुमारे इ.स.पू. ५८४

    याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे, तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही.

  7. यिर्मयाह ४८:३१सुमारे इ.स.पू. ५८४

    म्हणून मी मोआबभूमीसाठी विलाप करतो, मी मोआबसाठी अश्रू गाळतो, कीर-हरेसेथच्या लोकांसाठी मी शोक करतो.

  8. यिर्मयाह ४८:३२सुमारे इ.स.पू. ५८४

    जसे याजेर शोक करतो, तसे मी सिबमाहच्या द्राक्षलतांसाठी शोक करतो. तुमच्या फांद्या समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत, त्या याजेरपर्यंत पोहोचतात; संहार करणाऱ्याने तुमच्या पिकलेल्या फळांवर व द्राक्षांवर हल्ला केला आहे.

  9. यिर्मयाह ४८:३३सुमारे इ.स.पू. ५८४

    मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून आनंद व हर्ष लयास गेले आहेत. द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. ओरडणे आहे, होय पण ते आनंदाचे नाही.

  10. यिर्मयाह ४८:३४सुमारे इ.स.पू. ५८४

    “त्यांच्या आक्रोशाचा ध्वनी उंचाविला जात आहे हेशबोनपासून एलिआलेह आणि याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम आणि एग्लाथ-शलीशियापर्यंत तो ऐकू येत आहे, निम्रीमाची कुरणेही आता शुष्क झाली आहेत.

  11. यिर्मयाह ४८:३५सुमारे इ.स.पू. ५८४

    जे उच्चस्थळी जाऊन अर्पणे वाहतात, आणि त्यांच्या खोट्या दैवतांना धूप जाळतात त्या मोआबभूमीत या गोष्टी मी आता बंद पाडेन,” याहवेह असे जाहीर करतात.

  12. यिर्मयाह ४८:३६सुमारे इ.स.पू. ५८४

    “माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे; कीर-हरेसेथसाठी विलापाने बासरीगत गीत गात आहे. त्यांनी साठविलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.

  13. यिर्मयाह ४८:३७सुमारे इ.स.पू. ५८४

    तेथील प्रत्येक डोक्याचे मुंडण झाले आहे व प्रत्येक दाढीचे बोडण झाले आहे; प्रत्येक हातावर घाव करण्यात आला आहे व प्रत्येक कमरेवर गोणपाट नेसलेला आहे.

  14. यिर्मयाह ४८:३८सुमारे इ.स.पू. ५८४

    मोआबभूमीतील प्रत्येक घराच्या छतावर आणि प्रत्येक चौरस्त्यावर केवळ आकांतच आढळत आहे, कारण जुन्या निकामी पात्रांचा चक्काचूर करावा त्याप्रमाणे मोआब भूमीचा मी चुराडा केला आहे,” याहवेह असे जाहीर करतात.

  15. यिर्मयाह ४८:३९सुमारे इ.स.पू. ५८४

    “पाहा, मोआबभूमी कशी मोडकळीस आली आहे! ती कशी विलाप करीत आहे! मोआबने लज्जेने कशी पाठ फिरविली आहे ते पाहा! मोआब तिच्या सभोवती असलेल्या लोकांच्या उपहासाचा व दहशतीचा विषय झाली आहे.”

  16. यिर्मयाह ४८:४०सुमारे इ.स.पू. ५८४

    याहवेह असे म्हणतात: पाहा! एक गरुड आकाशातून खाली झेप घेत आहे, मोआबभूमीवर आपले पंख पसरवित आहे.

  17. यिर्मयाह ४८:४१सुमारे इ.स.पू. ५८४

    करीयोथ पडले आहेत, व तेथील दुर्गमस्थाने जिंकून घेतली आहेत. प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांच्या हृदयाप्रमाणे मोआबच्या योद्ध्यांचे हृदय होईल.

  18. यिर्मयाह ४८:४२सुमारे इ.स.पू. ५८४

    मोआब एक राष्ट्र म्हणून न राहता तिचा नाश होईल. कारण तिने याहवेहविरुद्ध उर्मटपणा केला आहे.

  19. यिर्मयाह ४८:४३सुमारे इ.स.पू. ५८४

    हे मोआबातील लोकांनो, दहशत, खड्डे व पाश तुझ्या वाट्याला येतील, असे याहवेह म्हणतात.

  20. यिर्मयाह ४८:४४सुमारे इ.स.पू. ५८४

    “जो कोणी दहशतीपासून दूर पळेल तो खड्ड्यात पडेल, जो कोणी खड्ड्यातून बाहेर पडेल, तो पाशात सापडेल. कारण मी मोआबावर तिच्या शिक्षेचे वर्ष आणणार आहे. याहवेह असे जाहीर करतात.

  21. यिर्मयाह ४८:४५सुमारे इ.स.पू. ५८४

    “हेशबोनच्या सावलीत फरारी हतबलपणे उभे आहेत, हेशबोनमधून अग्नी येत आहे, सीहोनच्या मध्यातून ज्वाला पसरत आहेत; त्या मोआबाचे कपाळ जाळून टाकीत आहे, त्या कर्कश बढाईखोरांचे मस्तक जाळीत आहे.

  22. यिर्मयाह ४८:४६सुमारे इ.स.पू. ५८४

    हे मोआबा, तुला धिक्कार असो! कमोश दैवताचे उपासक नष्ट झाले आहेत; आणि तुझ्या पुत्रांना बंदिवासात नेण्यात येत आहे व कन्यांना गुलाम करून नेण्यात येत आहे.

  23. यिर्मयाह ४८:४७सुमारे इ.स.पू. ५८४

    “परंतु मी मोआबच्या समृद्धीची येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,” असे याहवेह म्हणतात. मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते.

  24. यिर्मयाह ४९:१सुमारे इ.स.पू. ५८३

    अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?

  25. यिर्मयाह ४९:२सुमारे इ.स.पू. ५८३

    याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.