- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ५१:४३सुमारे इ.स.पू. ५९५
तिची शहरे ओसाड होतील, ती एक शुष्क व निर्जन भूमी होईल, एक अशी भूमी जिथे कोणी मनुष्य राहत नाही, जिच्यामधून कोणीही प्रवास करीत नाही.
- यिर्मयाह ५१:४४सुमारे इ.स.पू. ५९५
मी बेलला बाबिलोन मध्येच शिक्षा देईन आणि त्याने जे गिळले ते मी त्याला थुंकावयास लावेन. यापुढे राष्ट्रे त्याच्याकडे जमावाने येणार नाहीत. बाबेलची तटबंदी कोसळून पडेल.
- यिर्मयाह ५१:४५सुमारे इ.स.पू. ५९५
“अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर पडा! पलायन करून आपला जीव वाचवा! याहवेहच्या भयंकर क्रोधापासून दूर पळा.
- यिर्मयाह ५१:४६सुमारे इ.स.पू. ५९५
जेव्हा तुम्हाला देशात अफवा ऐकिवात येतील तेव्हा तुमचे अंतःकरण खचू देऊ नका किंवा भयभीत होऊ नका; देशात आणि एका राजाने दुसऱ्या राजाविरुद्ध केलेल्या हिंसाचारांच्या अफवा ऐकू येतील, एक अफवा या वर्षी येते तर दुसरी पुढील वर्षी येते.
- यिर्मयाह ५१:४७सुमारे इ.स.पू. ५९५
असा समय निश्चित येईल जेव्हा मी बाबेलच्या मूर्तींना शिक्षा करेन; तिच्या संपूर्ण देशाची अप्रतिष्ठा होईल वध केलेल्यांचे शव तिच्या भूमीवर पडलेले दिसतील.
- यिर्मयाह ५१:४८सुमारे इ.स.पू. ५९५
मग स्वर्गात व पृथ्वीवर व त्यामध्ये असलेले सर्व बाबेलवरील विजयोत्सवाच्या आनंदाने गर्जना करतील, कारण उत्तरेकडून विनाशक तिच्यावर हल्ला करतील.” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह ५१:४९सुमारे इ.स.पू. ५९५
“जसे संपूर्ण पृथ्वीवर वध झालेले मृतदेह पडतात, तसेच इस्राएल लोकांच्या केलेल्या हत्येमुळे बाबेलचा पाडाव होईल.
- यिर्मयाह ५१:५०सुमारे इ.स.पू. ५९५
जे तुम्ही तलवारीपासून वाचला आहात, ते तुम्ही निघून जा, उगाच रेंगाळू नका! दूरवरील भूमीवर याहवेहचे स्मरण करा, आणि यरुशलेम तुमच्या स्मरणात येवो.”
- यिर्मयाह ५१:५१सुमारे इ.स.पू. ५९५
“आमची अप्रतिष्ठा झाली आहे, आमचा अपमान झाला आहे लज्जेने आमची मुखमंडले झाकली गेली आहेत, कारण परकीय लोकांनी याहवेहच्या भवनातील पवित्रस्थानी प्रवेश केला आहे.”
- यिर्मयाह ५१:५२सुमारे इ.स.पू. ५९५
याहवेह जाहीर करतात, “पण असे दिवस येत आहेत, जेव्हा मी तिच्या मूर्तींना शिक्षा देईन, संपूर्ण देशभरातील जखमी लोक कण्हतील.
- यिर्मयाह ५१:५३सुमारे इ.स.पू. ५९५
बाबिलोन जरी गगनापर्यंत पोचली आणि तिने आपल्या गढांची तटबंदी केली, तरी मी तिच्याविरुद्ध विनाशक पाठवेन,” याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह ५१:५४सुमारे इ.स.पू. ५९५
“बाबेलमधून विलापाचा ध्वनी ऐकू येत आहे, तिच्या घोर विनाशाचा ध्वनी बाबेलांच्या प्रदेशातूनच ऐकू येत आहे.
- यिर्मयाह ५१:५५सुमारे इ.स.पू. ५९५
याहवेह बाबेलचा विनाश करणार आहेत; तेच तिच्यामधील कोलाहल शांत करतील. शत्रूंच्या लाटा तिच्यावर प्रचंड पाण्यासारख्या कोसळतील; त्या आवाजाच्या गर्जनेचा प्रतिध्वनी ऐकू येईल.
- यिर्मयाह ५१:५६सुमारे इ.स.पू. ५९५
बाबेलांच्या विरुद्ध विनाशक येईल; तिचे योद्धे बंदी बनविले जातील, आणि त्यांचे धनुष्य मोडून टाकण्यात येतील. कारण याहवेह परतफेड करणारे परमेश्वर आहेत; ते पुरेपूर परतफेड करतील.
- यिर्मयाह ५१:५७सुमारे इ.स.पू. ५९५
मी तिचे राज्यपाल, सुज्ञ लोक, अधिपती, सेनापती व योद्धे या सर्वांना मद्यधुंद करेन; ते झोपतील आणि पुन्हा कधीच उठणार नाहीत,” महाराज, सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.
- यिर्मयाह ५१:५८सुमारे इ.स.पू. ५९५
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “बाबेलची दुर्गम तटबंदी भुईसपाट होईल आणि तिच्या उंच वेशी अग्नीने भस्म करण्यात येतील; लोकांचे कष्ट व्यर्थ ठरतील, देशाने केलेले श्रम अग्नीचे जळण होईल.”
- यिर्मयाह ५१:५९सुमारे इ.स.पू. ५९५
सिद्कीयाहच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी जेव्हा यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा राजा सिद्कीयाहसह बाबेलला गेला, तेव्हा त्याने सेरायाहस, जो नेरीयाहचा पुत्र, जो महसेयाहचा नातू, तो सैन्यात दुय्यम दर्जाचा एक अधिकारी होता त्याला हा संदेश दिला.
- यिर्मयाह ५१:६०सुमारे इ.स.पू. ५९५
बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती.
- यिर्मयाह ५१:६१सुमारे इ.स.पू. ५९५
यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच.
- यिर्मयाह ५१:६२सुमारे इ.स.पू. ५९५
मग म्हण, ‘हे याहवेह, तुम्ही म्हटले की तुम्ही बाबेलचा नाश कराल व तिथे कोणीही मनुष्य वा पशूप्राणी वसती करणार नाही; ती कायमची ओसाड होईल.’
- यिर्मयाह ५१:६३सुमारे इ.स.पू. ५९५
मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे.
- यिर्मयाह ५१:६४सुमारे इ.स.पू. ५९५
आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ” इथे यिर्मयाहच्या संदेशाचा शेवट होतो.
- यिर्मयाह ५२:१सुमारे इ.स.पू. ५९८
सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.
- यिर्मयाह ५२:२सुमारे इ.स.पू. ५९८
यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
- यिर्मयाह ५२:३सुमारे इ.स.पू. ५९८
यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.