मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ५२:२९सुमारे इ.स.पू. ५८९

    बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या अठराव्या वर्षी, 832 लोक यरुशलेममधून;

  2. यिर्मयाह ५२:३०सुमारे इ.स.पू. ५८९

    नबुखद्नेस्सरच्या तेविसाव्या वर्षी, पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने 745 यहूदी लोक बाबेलला नेले.

  3. यिर्मयाह ५२:३१सुमारे इ.स.पू. ५६२

    यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले.

  4. यिर्मयाह ५२:३२सुमारे इ.स.पू. ५६२

    तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबिलोन येथे होते त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले.

  5. यिर्मयाह ५२:३३सुमारे इ.स.पू. ५६२

    यहोयाखीनने तुरुंगातील कपडे वेगळे ठेवले आणि त्याने आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले.

  6. यिर्मयाह ५२:३४सुमारे इ.स.पू. ५६२

    यहोयाखीन जिवंत असेपर्यंत बाबेलचा राजा त्याला प्रती दिवस तो मरेपर्यंत नियमित पुरवठा देत असे.

  7. होशेय १:१सुमारे इ.स.पू. ७८५

    यहूदाहचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज, हिज्कीयाह आणि इस्राएलचा राजा, योआशचा पुत्र यरोबोअम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याच्याकडे याहवेहचे जे वचन आले ते हे:

  8. होशेय १:२सुमारे इ.स.पू. ७८५

    जेव्हा याहवेहने प्रथम होशेयद्वारे बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “जा आणि एखाद्या व्यभिचारी स्त्रीबरोबर विवाह कर आणि तिच्यापासून लेकरे जन्माला घाल. कारण हा देश एका व्यभिचारी पत्नीप्रमाणे याहवेहशी अविश्वासूपणाचा दोषी आहे.”

  9. होशेय १:३सुमारे इ.स.पू. ७८५

    म्हणून त्याने दिब्लाइमाची कन्या गोमेर हिच्याशी विवाह केला आणि ती गरोदर राहिली. तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला.

  10. होशेय १:४सुमारे इ.स.पू. ७८५

    तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन.

  11. होशेय १:५सुमारे इ.स.पू. ७८५

    त्या दिवशी येज्रीलच्या खोर्‍यात मी इस्राएलचे धनुष्य मोडून टाकीन.”

  12. होशेय १:६सुमारे इ.स.पू. ७८५

    गोमेर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने कन्येला जन्म दिला. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “हिचे नाव लो-रुहामा असे ठेव, कारण येथून पुढे त्यांना क्षमा करावी अशी प्रीती मी इस्राएलवर दाखविणार नाही.

  13. होशेय १:७सुमारे इ.स.पू. ७८५

    पण मी यहूदीयाच्या वंशावर मी प्रीती करेन; आणि मी त्यांना वाचवेन—धनुष्य, तलवार किंवा युद्ध, किंवा घोडे आणि घोडेस्वार यांच्याद्वारे नाही, परंतु मी याहवेह त्यांचा परमेश्वर, त्यांना वाचवेन.”

  14. होशेय १:८सुमारे इ.स.पू. ७८५

    लो-रुहामाचे दूध तोडल्यावर गोमेरने आणखी एका पुत्राला जन्म दिला.

  15. होशेय १:९सुमारे इ.स.पू. ७८५

    तेव्हा याहवेह म्हणाले, “याचे नाव लो-अम्मी असे ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाहीत आणि मी तुमचा परमेश्वर नाही.

  16. होशेय १:१०सुमारे इ.स.पू. ७८५

    “तरीही इस्राएली लोक समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे असंख्य असतील जी मापता येणार नाही किंवा मोजता येणार नाही, असे. ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे म्हणतील

  17. होशेय १:११सुमारे इ.स.पू. ७८५

    तेव्हा यहूदाहचे संतान व इस्राएलचे संतान एकत्र येतील; ते एक पुढारी नेमतील आणि देशातून एकत्र बाहेर येतील, कारण तो येज्रीलचा किती महान दिवस असेल.

  18. होशेय २:१सुमारे इ.स.पू. ७८५

    “तुमच्या बंधूंना, ‘माझे लोक’ आणि तुमच्या भगिनींना, ‘माझी प्रिय व्यक्ती.’ असे म्हणा.

  19. होशेय २:२सुमारे इ.स.पू. ७८५

    “तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तिचा पती नाही. ती आपल्या मुखावरून तिचे व्यभिचारी रूप आणि अविश्वासूपणा तिच्या स्तनांमधून दूर करो.

  20. होशेय २:३सुमारे इ.स.पू. ७८५

    नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन, जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती; तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन, निर्जल भूमीसारखी ठेवेन व तिला तहानेने जिवे मारीन.

  21. होशेय २:४सुमारे इ.स.पू. ७८५

    मी तिच्या मुलांच्या प्रती आपली प्रीती दाखविणार नाही, कारण ती मुले व्यभिचाराची आहेत.

  22. होशेय २:५सुमारे इ.स.पू. ७८५

    कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’

  23. होशेय २:६सुमारे इ.स.पू. ७८५

    म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन; मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही.

  24. होशेय २:७सुमारे इ.स.पू. ७८५

    ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही. ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’

  25. होशेय २:८सुमारे इ.स.पू. ७८५

    तिने ओळखले नाही की, तो मीच होतो ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले, ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले; जे त्यांनी बआलसाठी वापरले.