मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. होशेय ४:६सुमारे इ.स.पू. ७८०

    ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे, “कारण, तुम्ही ज्ञानाला नाकारले आहे, म्हणून मी तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारत आहे; कारण तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे, म्हणून मी सुद्धा तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करेन.

  2. होशेय ४:७सुमारे इ.स.पू. ७८०

    जितकी याजकांची संख्या वाढत गेली, तितकी अधिक पापे त्यांनी माझ्याविरुद्ध केली; त्यांच्या वैभवशाली परमेश्वराच्या बदल्यात त्यांनी लाजिरवाणी गोष्ट स्वीकारली.

  3. होशेय ४:८सुमारे इ.स.पू. ७८०

    माझ्या लोकांच्या पापांवर ते पोषण करतात आणि त्यांच्या दुष्टतेचा आनंद घेतात.

  4. होशेय ४:९सुमारे इ.स.पू. ७८०

    आणि असे होईल की: जसे लोक तसे याजक होतील. मी दोघांनाही त्यांच्या आचरणामुळे शासन करेन आणि त्यांच्या कृत्यांसाठी त्यांना परतफेड करेन.

  5. होशेय ४:१०सुमारे इ.स.पू. ७८०

    “ते खातील परंतु ते तृप्त होणार नाहीत; ते व्यभिचार करतील परंतु त्यांची भरभराट होणार नाही, कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला आहे आणि स्वतःस वेश्या व्यवसायास सोपविले आहे.

  6. होशेय ४:११सुमारे इ.स.पू. ७८०

    जुना द्राक्षारस आणि नवीन द्राक्षारस त्यांचा समंजसपणा दूर करतात.

  7. होशेय ४:१२सुमारे इ.स.पू. ७८०

    माझे लोक लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांची काठी त्यांचे भविष्य सांगते. व्यभिचाराचा आत्मा त्यांना भरकटवितो; ते त्यांच्या परमेश्वराला विश्वासू राहिले नाहीत.

  8. होशेय ४:१३सुमारे इ.स.पू. ७८०

    एला वृक्ष, हिवर आणि एला या झाडांखाली, जिथे सुखदायक सावली असते तिथे पर्वतांच्या शिखरांवर यज्ञ करतात आणि टेकड्यांवर ते होमार्पण करतात. म्हणून तुमच्या कन्या वेश्याव्यवसायाकडे वळतात आणि तुमच्या सुना व्यभिचार करतात.

  9. होशेय ४:१४सुमारे इ.स.पू. ७८०

    “जेव्हा त्या वेश्याव्यवसायाकडे वळतात, अथवा तुमच्या सुना त्या व्यभिचार करतात, मी तुमच्या कन्यांना शासन करणार नाही, कारण पुरुष स्वतः वेश्यांबरोबर सहवास करतात आणि पवित्र स्थळी असलेल्या देवदासींबरोबर बलिदान करतात— समंजसपणा नसलेल्या लोकांचा नाश होईल!

  10. होशेय ४:१५सुमारे इ.स.पू. ७८०

    “हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस. “गिलगालकडे जाऊ नका; वर बेथ-आवेन येथे जाऊ नका. आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका.

  11. होशेय ४:१६सुमारे इ.स.पू. ७८०

    जशी कालवड हट्टी असते, तसे इस्राएली लोक हट्टी आहेत. मग जशी कोकरे कुरणात चरतात, त्याप्रमाणे याहवेह त्यांना कुरणात कसे नेतील?

  12. होशेय ४:१७सुमारे इ.स.पू. ७८०

    एफ्राईम मूर्तीबरोबर जोडले गेले आहे, त्याला एकटे सोडून द्या!

  13. होशेय ४:१८सुमारे इ.स.पू. ७८०

    जेव्हा त्यांचे मद्य संपते तेव्हा सुद्धा, ते त्यांचा वेश्याव्यवसाय चालू ठेवतात; त्यांचे शासक लज्जास्पद कृतिंवर अधिक प्रीती करतात.

  14. होशेय ४:१९सुमारे इ.स.पू. ७८०

    एक वावटळ त्यांना वाहून नेईल, आणि त्यांच्या अर्पणांमुळे त्यांना लाज वाटेल.

  15. होशेय ५:१सुमारे इ.स.पू. ७८०

    “तुम्ही याजकांनो, हे ऐका! अहो इस्राएलाच्या घराण्यांनो, लक्ष द्या! राजघराणे, ऐका! हा न्याय तुमच्याविरुद्ध आहे: मिस्पाह येथे तुम्ही पाश झाला आहात, ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.

  16. होशेय ५:२सुमारे इ.स.पू. ७८०

    बंडखोरांनी भयंकर कत्तल केली आहे, मी त्या सर्वांना शिस्त लावेन.

  17. होशेय ५:३सुमारे इ.स.पू. ७८०

    एफ्राईमाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे; इस्राएल माझ्यापासून लपलेले नाही. हे एफ्राईमा, तू आता वेश्याव्यवसायाकडे वळला आहेस; इस्राएल भ्रष्ट झालेला आहे.

  18. होशेय ५:४सुमारे इ.स.पू. ७८०

    “त्यांची कर्मे त्यांना पुन्हा त्यांच्या परमेश्वराकडे येऊ देत नाहीत. वेश्यावृत्तीचा आत्मा त्यांच्या अंतःकरणात आहे; ते याहवेहला ओळखत नाहीत.

  19. होशेय ५:५सुमारे इ.स.पू. ७८०

    इस्राएलचा उन्मत्तपणाच त्यांच्याविरुद्ध साक्ष देतो; इस्राएल आणि एफ्राईम सुद्धा आपल्या पापात अडखळतात; यहूदीया देखील त्यांच्यासोबत अडखळतो.

  20. होशेय ५:६सुमारे इ.स.पू. ७८०

    जेव्हा ते आपले मेंढरांचे व गुरांचे कळप घेऊन याहवेहच्या शोधात फिरतील, ते त्यांना सापडणार नाही; कारण त्यांनी स्वतःला त्यांच्यापासून दूर केले आहेत.

  21. होशेय ५:७सुमारे इ.स.पू. ७८०

    ते याहवेहशी अविश्वासू राहिले; ते अनौरस लेकरांना जन्म देतात. जेव्हा ते अमावस्येचा उत्सव साजरा करतील, तेव्हा ते त्यांच्या शेताला गिळून टाकतील.

  22. होशेय ५:८सुमारे इ.स.पू. ७८०

    “तुम्ही गिबियाहात शिंग फुंका, रामाह येथे कर्णा वाजवा. बेथ-आवेन येथे उंच आवाजात युद्धाची घोषणा करा; बिन्यामीन आमचे नेतृत्व करा.

  23. होशेय ५:९सुमारे इ.स.पू. ७८०

    एफ्राईम शासनाच्या दिवशी ओसाड पडेल. इस्राएली गोत्रात जे निश्चितच होणार त्याची घोषणा करणार.

  24. होशेय ५:१०सुमारे इ.स.पू. ७८०

    यहूदाहचे पुढारी सीमारेषांचे दगड हालविणारे झाले आहेत. एखाद्या जलप्रलयाप्रमाणे मी माझा संताप त्यांच्यावर ओतेन.

  25. होशेय ५:११सुमारे इ.स.पू. ७८०

    एफ्राईम चिरडला गेला आहे, न्यायात चेंगरलेला आहे. कारण मूर्तीच्या मागे जाण्याचा त्याचा निश्चय आहे.