मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. होशेय ७:११सुमारे इ.स.पू. ७८०

    “एफ्राईम एखाद्या खुळ्या पारव्यासारखा बुद्धिहीन आणि सहज फसणारा आहे— तो आता इजिप्तला हाक मारतो; आता तो अश्शूराकडे धाव घेतो.

  2. होशेय ७:१२सुमारे इ.स.पू. ७८०

    जेव्हा ते जातील तेव्हा मी माझे जाळे त्याच्यावर फेकेन; मी त्यांना आकाशातील पक्ष्याप्रमाणे खाली आणेन. जेव्हा मी ऐकेन की ते एकत्र होत आहेत, तेव्हा मी त्यांना पकडेन.

  3. होशेय ७:१३सुमारे इ.स.पू. ७८०

    ते माझ्यापासून बहकले आहेत म्हणून त्यांचा धिक्कार असो! त्यांचा नाश होवो, कारण त्यांनी माझ्याविरुद्ध विद्रोह केला आहे. मला त्यांचा उद्धार करावयाची इच्छा होती, पण ते माझ्याबद्दल खोटे बोलतात.

  4. होशेय ७:१४सुमारे इ.स.पू. ७८०

    ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत, परंतु त्यांच्या बिछान्यांवर विलाप करतात. ते धान्य आणि नवीन द्राक्षारसासाठी त्यांच्या दैवतांकडे भीक मागून स्वतःला जखमा करतात, पण ते माझ्यापासून दूर राहतात.

  5. होशेय ७:१५सुमारे इ.स.पू. ७८०

    मी त्यांना शिक्षण दिले आहे आणि त्यांचे बाहू बळकट केले आहे, परंतु ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.

  6. होशेय ७:१६सुमारे इ.स.पू. ७८०

    ते परमोच्च परमेश्वराकडे फिरत नाहीत; तर ते सदोष धनुष्यांसारखे आहेत. उर्मट शब्दांमुळे त्यांचे पुढारी तलवारीला बळी पडतील. यामुळे इजिप्त देशात त्यांची थट्टा करण्यात येईल.

  7. होशेय ८:१सुमारे इ.स.पू. ७८०

    “तू कर्णे आपल्या मुखाला लाव! याहवेहच्या भवनावर एक गरुड आहे, कारण लोकांनी माझा करार मोडला आहे आणि माझ्या नियमशास्त्राविरुद्ध बंड केले आहे.

  8. होशेय ८:२सुमारे इ.स.पू. ७८०

    इस्राएल माझा धावा करून आता म्हणतो, ‘आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचा स्वीकार करतो!’

  9. होशेय ८:३सुमारे इ.स.पू. ७८०

    इस्राएलने जे उत्तम ते नाकारले आहे; शत्रू त्याचा पाठलाग करतील.

  10. होशेय ८:४सुमारे इ.स.पू. ७८०

    त्यांनी माझ्या संमतीशिवाय राजे नेमले आहेत; ते माझ्या मान्येतेशिवाय अधिपतींना निवडतात. त्यांनी आपले चांदी आणि सोने घेऊन स्वतःच्या नाशाकरिता मूर्ती बनविल्या आहेत.

  11. होशेय ८:५सुमारे इ.स.पू. ७८०

    हे शोमरोना, तुझी वासराची मूर्ती फेकून दे! त्यांच्याविरुद्ध माझा राग पेटला आहे. ते अजून किती काळ शुद्ध होण्यास असमर्थ राहतील?

  12. होशेय ८:६सुमारे इ.स.पू. ७८०

    ते इस्राएलाकडून आहे! हे वासरू—एका कारागिराने बनविले आहे; तो परमेश्वर नाही. शोमरोनाच्या या वासराचे तुकडे तुकडे करण्यात येतील.

  13. होशेय ८:७सुमारे इ.स.पू. ७८०

    “ते वारा पेरतात आणि ते वावटळीची कापणी करतात. त्यांच्या पिकांना कणसे येत नाहीत; त्यातून पीठ तयार होत नाही. जर त्यातून अन्न तयार झाले तर परकीय ते गिळून टाकतील.

  14. होशेय ८:८सुमारे इ.स.पू. ७८०

    इस्राएलास गिळून टाकण्यात आले आहे; राष्ट्रांमध्ये ती कोणासही आवडत नाही.

  15. होशेय ८:९सुमारे इ.स.पू. ७८०

    एकाकी भटकणार्‍या रानगाढवासारखे ते वर अश्शूराकडे गेले आहे. एफ्राईमने स्वतःस तिच्या प्रियकरांना विकले आहे.

  16. होशेय ८:१०सुमारे इ.स.पू. ७८०

    जरी त्यांना स्वतःला राष्ट्रांमध्ये विकले असेल, तरीही आता मी त्यांना एकत्र करेन. बलाढ्य राजाच्या अत्याचाराने ते नष्ट होऊ लागतील.

  17. होशेय ८:११सुमारे इ.स.पू. ७८०

    “एफ्राईमने पापार्पण करण्यास पुष्कळ वेद्या बांधल्या आहेत, पण ते पाप करण्याच्या वेद्या झाल्या आहेत.

  18. होशेय ८:१२सुमारे इ.स.पू. ७८०

    मी त्यांच्यासाठी माझ्या नियमशास्त्राच्या पुष्कळ गोष्टी लिहिल्या, पण त्यांनी ते परकीय मानले.

  19. होशेय ८:१३सुमारे इ.स.पू. ७८०

    जरी ते त्यांचे यज्ञार्पण मला भेटस्वरूप अर्पितात, आणि तरीही ते मांस खातात, याहवेह त्यांच्याशी प्रसन्न नाही. आता ते त्यांचा दुष्टपणा स्मरणार आणि त्यांच्या पापांची शिक्षा देणार: ते इजिप्तला परततील.

  20. होशेय ८:१४सुमारे इ.स.पू. ७८०

    कारण इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे आणि राजवाडे बांधले; यहूदाहने अनेक तटबंदीची नगरे बांधली आहेत. पण मी त्यांच्या नगरांवर अग्नी पाठवून त्यांचे किल्ले भस्म करेन.”

  21. होशेय ९:१सुमारे इ.स.पू. ७६०

    हे इस्राएला, आनंद करू नकोस; इतर राष्ट्रांसारखे उल्लासू नकोस, कारण तू तुझ्या परमेश्वराशी अविश्वासू झाला आहेस; धान्याच्या प्रत्येक खळ्यावर वेश्याव्यवसाय करून मिळणारी कमाई तुला आवडते.

  22. होशेय ९:२सुमारे इ.स.पू. ७६०

    खळे आणि द्राक्षकुंड लोकांना खाऊ घालणार नाही; नवा द्राक्षारस त्यांना दगा देईल.

  23. होशेय ९:३सुमारे इ.स.पू. ७६०

    याहवेहच्या देशात ते राहणार नाहीत; एफ्राईम इजिप्त देशात परत जाईल आणि अश्शूर येथे अशुद्ध भोजन खाईल.

  24. होशेय ९:४सुमारे इ.स.पू. ७६०

    ते याहवेहला द्राक्षारसाची पेयार्पणे करू शकणार नाही, किंवा त्यांच्या यज्ञार्पणाने याहवेहला संतोष होणार नाही. कारण असे यज्ञ त्यांच्यासाठी शोक करणाऱ्यांच्या अन्नासारखे होईल; त्यास खाणारे सर्वजण अमंगळ होतील. ते भोजन त्यांच्यासाठीच असेल; ते याहवेहच्या मंदिरात आणता येणार नाही.

  25. होशेय ९:५सुमारे इ.स.पू. ७६०

    मग तू ठरविलेल्या उत्सवाच्या दिवशी, याहवेहच्या सणाच्या दिवशी काय करशील?