मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. होशेय १०:१४सुमारे इ.स.पू. ७४०

    तुझ्या लोकांच्या विरुद्ध युद्धाची गर्जना होईल, जेणेकरून तुझ्या सर्व गडांचा नाश होईल; जसे शलमनाने युद्धाच्या दिवशी बेथ-आर्बेलाचा नाश केला, जेव्हा मातेला तिच्या मुलांसहित आपटून ठार मारण्यात आले.

  2. होशेय १०:१५सुमारे इ.स.पू. ७४०

    तसेच बेथेल तुझ्यासोबत होईल, कारण तुझी दुष्टता फार अधिक आहे. तेव्हा त्या दिवशी सकाळच्या प्रहरी इस्राएलाच्या राजाचा पूर्णरीतीने नाश केला जाईल.

  3. होशेय ११:१सुमारे इ.स.पू. ७४०

    “इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली, आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले.

  4. होशेय ११:२सुमारे इ.स.पू. ७४०

    पण त्यांना जितके जास्त बोलाविले, तितके ते माझ्यापासून दूर गेले. त्यांनी बआलापुढे बळी दिले आणि त्यांनी मूर्तीला धूप जाळला.

  5. होशेय ११:३सुमारे इ.स.पू. ७४०

    मी तोच होतो ज्याने एफ्राईमला चालण्यास शिकविले, मी त्यांना कडेवर वागवले; तो मीच होतो ज्याने त्यांना आरोग्य दिले, परंतु हे त्यांना समजले नाही.

  6. होशेय ११:४सुमारे इ.स.पू. ७४०

    मी त्यांना मानवी दयाळूपणाच्या दोरीने आणि प्रीतीच्या बंधनाने चालविले. त्यांच्यासाठी मी एखाद्या लहान मुलाला गालापर्यंत उचलल्यासारखा होतो, आणि मी खाली वाकून त्यांना खायला घालत असे.

  7. होशेय ११:५सुमारे इ.स.पू. ७४०

    “ते इजिप्त देशात परत जाणार नाहीत काय आणि अश्शूर त्यांच्यावर राज्य करणार नाही काय कारण ते पश्चात्ताप करण्यास नकार देतात?

  8. होशेय ११:६सुमारे इ.स.पू. ७४०

    त्यांच्या शहरातून तलवार चमकेल; ती त्यांच्या खोट्या संदेष्ट्यांना मारून टाकेल व त्यांच्या योजनांचा अंत करेल.

  9. होशेय ११:७सुमारे इ.स.पू. ७४०

    माझ्या लोकांनी माझा त्याग करून दूर जाण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी मला परमोच्च परमेश्वर म्हटले तरी मी त्यांना कोणत्याही प्रकारे उन्नत करणार नाही.

  10. होशेय ११:८सुमारे इ.स.पू. ७४०

    “अरे एफ्राईमा, मी तुला कसे सोडू शकतो? अरे इस्राएला, मी तुला दुसऱ्याच्या हाती कसे सोपवून देऊ? मी तुला अदमाहसारखे कसे वागवू शकतो? मी तुला सबोईमसारखा कसे बनवू शकतो? माझे हृदय आतल्याआत आक्रोश करीत आहे; माझी सर्व करुणा जागृत झाली आहे.

  11. होशेय ११:९सुमारे इ.स.पू. ७४०

    मी माझ्या तीव्र रागाप्रमाणे वागणार नाही, मी एफ्राईमचा पुन्हा नाश करणार नाही. कारण मी तुमच्यामध्ये एक पवित्र परमेश्वर आहे. मनुष्य नाही. मी त्यांच्या शहरांविरुद्ध येणार नाही.

  12. होशेय ११:१०सुमारे इ.स.पू. ७४०

    ते याहवेहला अनुसरतील; ते सिंहासारखी गर्जना करतील. जेव्हा ते गर्जना करतील, तेव्हा त्यांची मुले थरथर कापत पश्चिमेकडून परत येतील.

  13. होशेय ११:११सुमारे इ.स.पू. ७४०

    पक्ष्यांच्या थरथरणाऱ्या थव्याप्रमाणे ते इजिप्तकडून येतील, पारव्यांप्रमाणे पंख फडफडत अश्शूरहून येतील. आणि मी त्यांना त्यांच्या घरी स्थायिक करेन,” असे याहवेह घोषणा करतात.

  14. होशेय ११:१२सुमारे इ.स.पू. ७४०

    एफ्राईमने मला खोटेपणाने, इस्राएलने फसवेगिरीने वेढून टाकले आहे. आणि यहूदाह उद्धटपणाने परमेश्वराच्या विरोधात आहे, शिवाय जे परमेश्वर विश्वासू व पवित्र आहेत, त्यांच्याविरुद्ध आहे.

  15. होशेय १२:१सुमारे इ.स.पू. ७२५

    एफ्राईम वाऱ्यावर चरतो; तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. तो अश्शूरसोबत करार करतो आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो.

  16. होशेय १२:२सुमारे इ.स.पू. ७२५

    याहवेह यहूदीयाच्या विरुद्ध वाद आणत आहेत; याकोबाला त्याच्या मार्गाप्रमाणे ते शासन करतील आणि त्याच्या कार्यानुसार त्याला प्रतिफळ देतील.

  17. होशेय १२:३सुमारे इ.स.पू. ७२५

    त्याने गर्भात असता आपल्या भावाची टाच धरली; एका मनुष्य असून त्याने परमेश्वराशी झुंज केली.

  18. होशेय १२:४सुमारे इ.स.पू. ७२५

    तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. बेथेलला ते त्याला भेटले आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला—

  19. होशेय १२:५सुमारे इ.स.पू. ७२५

    याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, याहवेह हे त्यांचे नाव!

  20. होशेय १२:६सुमारे इ.स.पू. ७२५

    पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे; प्रीती आणि न्यायाचे पालन कर आणि सतत आपल्या परमेश्वराची प्रतीक्षा कर.

  21. होशेय १२:७सुमारे इ.स.पू. ७२५

    व्यापारी चुकीचे माप वापरतो आणि त्याला लबाडी करणे आवडते.

  22. होशेय १२:८सुमारे इ.स.पू. ७२५

    एफ्राईम बढाई मारतो, “मी फार धनवान आहे; मी श्रीमंत झालो आहे. माझ्या सर्व संपत्तीसह त्यांना माझ्यामध्ये कोणताही अपराध किंवा पाप आढळणार नाही.”

  23. होशेय १२:९सुमारे इ.स.पू. ७२५

    “तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; तुझ्या नेमलेल्या उत्सवाच्या दिवसात मी तुला पुन्हा तंबूंमध्ये राहवयास लावेन.

  24. होशेय १२:१०सुमारे इ.स.पू. ७२५

    मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, त्यांना अनेक दृष्टान्त दिले आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.”

  25. होशेय १२:११सुमारे इ.स.पू. ७२५

    गिलआद दुष्ट आहे काय? त्याचे लोक निरुपयोगी आहेत! ते गिलगालात बैलांचे अर्पण करतात का? त्यांच्या वेद्या नांगरलेल्या शेतातील दगडांच्या ढिगार्‍यासारख्या असतील.