मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. होशेय ९:६सुमारे इ.स.पू. ७६०

    जरी ते नाशापासून सुटले तरी इजिप्त त्यांना गोळा करेल, आणि मेम्फीस त्यांना मूठमाती देतील. काटेकुसळे त्यांच्या चांदीच्या वस्तू नेतील, आणि त्यांच्या तंबूत काटेरी झाडे उगवतील.

  2. होशेय ९:७सुमारे इ.स.पू. ७६०

    शासन करण्याची वेळ जवळ आली आहे; प्रतिफळ घेण्याचे दिवस जवळ आले आहेत. इस्राएलला हे समजून यावे. कारण तुमची पापे अधिक आहेत आणि तुमचे शत्रुत्व जास्त आहे, संदेष्टा मूर्ख ठरत आहे, प्रेरित वेडा समजला जातो.

  3. होशेय ९:८सुमारे इ.स.पू. ७६०

    संदेष्टा माझ्या परमेश्वरासोबत, एफ्राईमचा पहारेकरी आहे, तरीही त्याच्या सर्व मार्गात सापळा त्याची वाट पाहत आहे, आणि परमेश्वराच्या भवनात शत्रुत्व आहे.

  4. होशेय ९:९सुमारे इ.स.पू. ७६०

    जसे गिबियाहमधील दिवसात केले तसे त्यांनी स्वतःला अधिक भ्रष्ट केले आहे. परमेश्वर त्यांचे दुष्कर्म स्मरणात ठेवतील आणि त्यांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करतील.

  5. होशेय ९:१०सुमारे इ.स.पू. ७६०

    “जेव्हा मला इस्राएल आढळला, तेव्हा ते रानात द्राक्षे आढळल्यासारखे होते; जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना पाहिले, ते अंजिराच्या झाडावर प्रथमफळ पाहण्यासारखे होते. पण जेव्हा ते बआल-पौराला आले तेव्हा त्यांनी त्या घृणास्पद मूर्तींपुढे स्वतःला समर्पित केले आणि त्यांच्या आवडत्या वस्तूप्रमाणे अमंगळ झाले.

  6. होशेय ९:११सुमारे इ.स.पू. ७६०

    एफ्राईमचे वैभव पक्ष्याप्रमाणे उडून जाईल— जन्म नाही, गर्भधारणा नाही, गर्भसंभव नाही.

  7. होशेय ९:१२सुमारे इ.स.पू. ७६०

    जरी त्यांनी मुलांचे संगोपन केले, तरी मी त्यांना सर्वांपासून दूर करेन. मी त्या लोकांपासून निघून जाईन, तेव्हा त्यांचा धिक्कार असो.

  8. होशेय ९:१३सुमारे इ.स.पू. ७६०

    सोर जसा सुखदायी ठिकाणी लावलेला मी पाहिला, तसाच एफ्राईम आहे, परंतु एफ्राईम आपल्या मुलांना वध करणार्‍याकडे घेऊन येईल.”

  9. होशेय ९:१४सुमारे इ.स.पू. ७६०

    हे याहवेह, त्यांना द्या— तुम्ही त्यांना काय द्याल? त्यांना वांझ गर्भाशये आणि शुष्क स्तने द्या.

  10. होशेय ९:१५सुमारे इ.स.पू. ७६०

    “गिलगालात त्यांची सर्व दुष्कृत्ये आहेत, मी त्यांचा तिथेच द्वेष केला. त्यांच्या पापी कृत्यांमुळे, मी त्यांना माझ्या घरातून हाकलून देईन. मी यापुढे त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व पुढारी बंडखोर आहेत.

  11. होशेय ९:१६सुमारे इ.स.पू. ७६०

    एफ्राईम नाश पावला आहे. त्यांची मुळे सुकून गेली आहेत. ते फळ देत नाही. जरी ते मुलांना जन्म देतील, तर मी त्यांचे प्रिय मूल मारून टाकेन.”

  12. होशेय ९:१७सुमारे इ.स.पू. ७६०

    माझा परमेश्वर त्यांना नाकारील कारण त्यांनी त्यांची आज्ञा पाळली नाही; ते देशादेशातून भटकत राहतील.

  13. होशेय १०:१सुमारे इ.स.पू. ७४०

    इस्राएल एक पसरणारा द्राक्षवेल होता. त्याने स्वतःसाठी फळे आणली. जसे त्याचे फळ वाढले, तसे त्याने आणखी वेद्या बांधल्या; जसा त्याचा देश समृद्ध झाला, तसे त्याने त्याच्या पवित्र दगडांना सुशोभित केले.

  14. होशेय १०:२सुमारे इ.स.पू. ७४०

    त्यांचे अंतःकरण फसवणूक करणारे आहे, आणि आता त्यांना त्यांचे अपराध भोगावेच लागतील. याहवेह त्यांच्या वेद्या पाडून टाकतील आणि त्यांच्या पवित्र दगडांचे तुकडे करतील.

  15. होशेय १०:३सुमारे इ.स.पू. ७४०

    मग ते म्हणतील, “आम्हाला राजा नाही कारण आम्ही याहवेहचा आदर केला नाही. पण आमचा राजा असला तरी त्याने आमच्यासाठी काय केले असते?”

  16. होशेय १०:४सुमारे इ.स.पू. ७४०

    ते अनेक अभिवचने देतात, खोट्या शपथा घेतात आणि करार करतात; त्यामुळे नांगरलेल्या शेतात उगविलेल्या विषारी तणाप्रमाणे खटले सुरू होतात.

  17. होशेय १०:५सुमारे इ.स.पू. ७४०

    शोमरोनात राहणारे लोक बेथ-आवेनच्या वासरूच्या मूर्तीला घाबरतात. त्याचे लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचप्रमाणे त्याचे मूर्तिपूजक पुजारी करतील, जे पूर्वी त्याच्या वैभवात आनंदित होते. कारण ते वैभव त्यांच्याकडून हिसकावून त्यांना बंदिवासात नेण्यात आले आहे.

  18. होशेय १०:६सुमारे इ.स.पू. ७४०

    महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी ते अश्शूरला नेले जातील. एफ्राईमला लज्जित केले जाईल; बाहेरील लोकांशी संबंध ठेवल्यामुळे इस्राएलही आपल्या मसलतीविषयी लज्जित होईल.

  19. होशेय १०:७सुमारे इ.स.पू. ७४०

    शोमरोनच्या राजाचा नाश होईल, पाण्याच्या पृष्ठभागावर पडलेली डहाळी जशी वाहून जाते, तसा तो वाहून जाईल.

  20. होशेय १०:८सुमारे इ.स.पू. ७४०

    दुष्टता असलेल्या उच्च स्थानांचा नाश केला जाईल— हे इस्राएलचे पाप आहे. काटेरी झाडे आणि कुसळे उगवतील आणि त्यांच्या वेद्या झाकून घेतील. मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाकून टाका!” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!”

  21. होशेय १०:९सुमारे इ.स.पू. ७४०

    “हे इस्राएला, गिबियाहतील दिवसापासून तू पाप करीत आला आहेस आणि तू तिथेच राहिला. गिबियाहच्या दुष्कृत्य करणाऱ्या विरुद्ध पुन्हा युद्ध भडकणार नाही काय?

  22. होशेय १०:१०सुमारे इ.स.पू. ७४०

    जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी त्यांना दंड देईन; त्यांनी केलेल्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकण्यासाठी राष्ट्रे त्यांच्याविरुद्ध एकत्र होतील.

  23. होशेय १०:११सुमारे इ.स.पू. ७४०

    एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे; म्हणून मी तिच्या नाजूक मानेवर जू ठेवेन. मी एफ्राईमला नांगराला जुंपेन, यहूदाहला नांगरणी करणे व याकोबाला माती फोडणे आवश्यक आहे.

  24. होशेय १०:१२सुमारे इ.स.पू. ७४०

    तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.

  25. होशेय १०:१३सुमारे इ.स.पू. ७४०

    पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे आणि अन्यायाचे पीक काढले आहे, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले आहे. कारण तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आपल्या अनेक योद्धांवर विश्वास ठेवला आहे,