- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- होशेय १२:१२सुमारे इ.स.पू. ७२५
याकोब अराम देशात पळून गेला; इस्राएलने पत्नी मिळविण्यासाठी चाकरी केली आणि तिची किंमत चुकविण्यासाठी त्याने मेंढरे राखली.
- होशेय १२:१३सुमारे इ.स.पू. ७२५
याहवेहने इजिप्तमधून इस्राएलला बाहेर काढण्यासाठी संदेष्ट्याच्या उपयोग केला, एका संदेष्ट्याच्या मार्फत त्याची काळजी घेतली.
- होशेय १२:१४सुमारे इ.स.पू. ७२५
पण एफ्राईमने त्यांचा कोप भयंकर चेतविला आहे; त्याचे प्रभू त्याच्या रक्ताचा दोष त्याच्यावरच राहू देतील आणि त्याला त्याच्या अपमानाची भरपाई देतील.
- होशेय १३:१सुमारे इ.स.पू. ७२५
जेव्हा एफ्राईम बोलत असे, तेव्हा लोक थरथर कापत असत; कारण तो इस्राएलाचा अधिपती होता. पण तो बआल मूर्तीच्या उपासनेचा दोषी झाला आणि मरण पावला.
- होशेय १३:२सुमारे इ.स.पू. ७२५
आता ते अधिकाधिक पाप करीत आहेत; ते आपल्या चांदीपासून स्वतःसाठी मूर्ती बनवतात, हुशारीने तयार केलेल्या प्रतिमा, त्या सर्व कारागिरांची हस्तकृती आहेत. या लोकांबद्दल असे म्हटले जाते, “हे नरबली देतात! ते वासराच्या मूर्तीचे चुंबन घेतात!”
- होशेय १३:३सुमारे इ.स.पू. ७२५
म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे, पहाटेच्या लवकर उडून जाणार्या दहिवरासारखे, खळ्यातून उडून जाणार्या भुशासारखे, धुराड्यातून निघणार्या धुराप्रमाणे होतील.
- होशेय १३:४सुमारे इ.स.पू. ७२५
“तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्याशिवाय इतर कोणत्याही परमेश्वराला तू स्वीकारणार नाहीस, माझ्याशिवाय इतर कोणीही तारणारा नाही.
- होशेय १३:५सुमारे इ.स.पू. ७२५
मी रानात, त्या तप्त उष्णतेच्या प्रदेशात, तुझी काळजी वाहिली.
- होशेय १३:६सुमारे इ.स.पू. ७२५
जेव्हा मी त्यांना भोजन दिले ते तृप्त झाले; जेव्हा ते तृप्त झाले तेव्हा ते गर्विष्ठ झाले; नंतर ते मला विसरले.
- होशेय १३:७सुमारे इ.स.पू. ७२५
म्हणून मी त्यांच्यासाठी सिंहासारखा होईन, चित्त्यासारखा त्यांच्या वाटेवर दबा धरून बसेन.
- होशेय १३:८सुमारे इ.स.पू. ७२५
जिची पिल्ले हरण केली आहेत, अशा अस्वलीप्रमाणे मी त्यांच्यावर हल्ला करेन आणि त्यांचे तुकडे तुकडे करेन; मी त्यांना सिंहाप्रमाणे फाडून टाकेन— वनपशू त्यांना फाडून टाकतील.
- होशेय १३:९सुमारे इ.स.पू. ७२५
“हे इस्राएला, तुझा नाश झाला आहे, कारण तू माझ्याविरुद्ध, तुझ्या साहाय्यकर्त्यांच्या विरुद्ध आहेस.
- होशेय १३:१०सुमारे इ.स.पू. ७२५
तुला वाचविणारा तुझा राजा कुठे आहे? ‘मला राजा व राजपुत्र द्या’ ज्यांच्याबद्दल तू असे म्हटले होते, ते तुझे सर्व नगरांचे अधिकारी कुठे आहेत?
- होशेय १३:११सुमारे इ.स.पू. ७२५
म्हणून माझ्या रागात मी तुला राजा दिला आणि माझ्या क्रोधात त्याला मी काढून टाकले आहे.
- होशेय १३:१२सुमारे इ.स.पू. ७२५
एफ्राईमची पातके जमा केली आहेत, त्याची पापे साठवून ठेवली आहेत.
- होशेय १३:१३सुमारे इ.स.पू. ७२५
बाळंतपणात स्त्रीला होणारा त्रास त्याला होईल, पण तो बुद्धी नसलेला एक बालक आहे; जेव्हा प्रसूतीची वेळ येते तेव्हा त्याला गर्भातून बाहेर येण्याचे ज्ञान नसते.
- होशेय १३:१४सुमारे इ.स.पू. ७२५
“मी या लोकांना कबरेच्या सामर्थ्यापासून सुटका देईन; मी त्यांना मृत्यूपासून वाचवेन. अरे मरणा, तुझ्या पीडा कुठे आहे? हे कबरे, तुझा नाश कुठे आहे? “मला काहीही कळवळा येणार नाही,
- होशेय १३:१५सुमारे इ.स.पू. ७२५
जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता, परंतु याहवेहकडून पूर्वेकडील वारा येईल, तो वाळवंटातून येईल; त्याचे झरे सुकून जातील आणि त्याची विहीर कोरडी पडेल. त्याच्या भांडारातील सर्व खजिना लुटला जाईल.
- होशेय १३:१६सुमारे इ.स.पू. ७२५
शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. ते तलवारीने पडतील; त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”
- होशेय १४:१सुमारे इ.स.पू. ७२५
हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे!
- होशेय १४:२सुमारे इ.स.पू. ७२५
परमेश्वराच्या वचनांचे पालन कर आणि याहवेहकडे परत ये. त्यांना सांगा: “आमच्या सर्व पापांची क्षमा करा, आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा, म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.
- होशेय १४:३सुमारे इ.स.पू. ७२५
अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही; आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही. हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही ‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही. कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.”
- होशेय १४:४सुमारे इ.स.पू. ७२५
“मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन, कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे.
- होशेय १४:५सुमारे इ.स.पू. ७२५
मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन. तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल आणि त्याची मुळे लबानोनातील गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील;
- होशेय १४:६सुमारे इ.स.पू. ७२५
त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल. त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल.