- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 970–930 BC
Solomon & The Temple
Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास ४:१५सुमारे इ.स.पू. १०११
हौद आणि त्याखालील बारा बैल;
- 2 इतिहास ४:१६सुमारे इ.स.पू. १०११
भांडी, फावडे, मांस पकडण्याचे काटे, इत्यादी सर्व वस्तू. शलोमोन राजासाठी हुराम-अबीने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.
- 2 इतिहास ४:१७सुमारे इ.स.पू. १०११
राजाने त्या वस्तू सुक्कोथ आणि सारेथान प्रदेशामध्ये यार्देनेच्या पठारावर मातीच्या साच्यात घडवून घेतल्या होत्या.
- 2 इतिहास ४:१८सुमारे इ.स.पू. १०११
या सर्व वस्तू शलोमोनाने इतक्या बनविल्या होत्या की, कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.
- 2 इतिहास ४:१९सुमारे इ.स.पू. १०११
परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेज, ज्यांच्यावर समक्षतेची भाकर ठेवली होती;
- 2 इतिहास ४:२०सुमारे इ.स.पू. १०११
नेमून दिल्याप्रमाणे आतील पवित्रस्थानासमोर जाळण्यासाठी शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्यांचे दिवे;
- 2 इतिहास ४:२१सुमारे इ.स.पू. १०११
सोन्याच्या फुलांची सजावट आणि दिवे आणि चिमटे (ते शुद्ध सोन्याचे होते);
- 2 इतिहास ४:२२सुमारे इ.स.पू. १०११
दिव्याच्या वाती कापण्याची शुद्ध सोन्याची कात्री, शिंपडण्याचे कटोरे, पात्रे व धूपदाण्या; मंदिराचा सोन्याचा प्रवेशभाग: मुख्य द्वार, परमपवित्रस्थानाची आतील दारेसुध्दा सोन्याची होती.
- 2 इतिहास ५:१सुमारे इ.स.पू. १००४
याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने त्याचा पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि इतर सामान—शलोमोनाने त्या वस्तू परमेश्वराच्या मंदिराच्या भांडार्यात ठेवल्या.
- 2 इतिहास ५:२सुमारे इ.स.पू. १००४
तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले.
- 2 इतिहास ५:३सुमारे इ.स.पू. १००४
आणि इस्राएलचे सर्व लोक सातव्या महिन्यातील सणाच्या काळात राजाकडे एकत्र आले.
- 2 इतिहास ५:४सुमारे इ.स.पू. १००४
जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेवी लोकांनी कोश उचलून घेतला,
- 2 इतिहास ५:५सुमारे इ.स.पू. १००४
आणि त्यांनी कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजकीय लेवींनी ती वाहून आणली,
- 2 इतिहास ५:६सुमारे इ.स.पू. १००४
राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचे आणि गुरांचे बळी देत होते की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.
- 2 इतिहास ५:७सुमारे इ.स.पू. १००४
नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या निर्धारित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.
- 2 इतिहास ५:८सुमारे इ.स.पू. १००४
करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते.
- 2 इतिहास ५:९सुमारे इ.स.पू. १००४
ते दांडे इतके लांब होते की, त्यांची कोशालगत असलेली टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असे, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ते दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत.
- 2 इतिहास ५:१०सुमारे इ.स.पू. १००४
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते.
- 2 इतिहास ५:११सुमारे इ.स.पू. १००४
त्यानंतर याजक पवित्रस्थानापासून मागे निघाले. तिथे असलेल्या सर्व याजकांनी त्यांच्या वर्गाकडे लक्ष न देता स्वतःस पवित्र करून घेतले होते.
- 2 इतिहास ५:१२सुमारे इ.स.पू. १००४
सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले.
- 2 इतिहास ५:१३सुमारे इ.स.पू. १००४
रणशिंग वाजविणारे आणि संगीतकार याहवेहस्तव एकसुरात स्तुतिगान आणि आभारप्रदर्शन करण्यासाठी सहभागी झाले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्यांसहित गायकांनी याहवेहची स्तुती करण्यासाठी त्यांचा आवाज उंचाविला व ते गाईले: “ते चांगले आहेत; त्यांचे प्रेम सर्वकाळ टिकते.” तेव्हा याहवेहचे मंदिर मेघांनी भरून गेले,
- 2 इतिहास ५:१४सुमारे इ.स.पू. १००४
आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते.
- 2 इतिहास ६:१सुमारे इ.स.पू. १००४
तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील;
- 2 इतिहास ६:२सुमारे इ.स.पू. १००४
मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.”
- 2 इतिहास ६:३सुमारे इ.स.पू. १००४
इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला.