मुख्य मजकुरावर जा

circa 970–930 BC

Solomon & The Temple

Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.

635 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास ६:४सुमारे इ.स.पू. १००४

    मग राजा म्हणाला: “याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीदाला आपल्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की,

  2. 2 इतिहास ६:५सुमारे इ.स.पू. १००४

    ‘मी माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, त्या दिवसापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, ज्यामुळे माझे नाव तिथे असावे किंवा माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी मी कोणालाही राज्यकर्ता म्हणून निवडले नाही.

  3. 2 इतिहास ६:६सुमारे इ.स.पू. १००४

    परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’

  4. 2 इतिहास ६:७सुमारे इ.स.पू. १००४

    “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते.

  5. 2 इतिहास ६:८सुमारे इ.स.पू. १००४

    पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले.

  6. 2 इतिहास ६:९सुमारे इ.स.पू. १००४

    तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’

  7. 2 इतिहास ६:१०सुमारे इ.स.पू. १००४

    “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे.

  8. 2 इतिहास ६:११सुमारे इ.स.पू. १००४

    तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.”

  9. 2 इतिहास ६:१२सुमारे इ.स.पू. १००४

    नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले

  10. 2 इतिहास ६:१३सुमारे इ.स.पू. १००४

    शलोमोनाने आता पाच हात लांब आणि पाच हात रुंद आणि तीन हात उंच असा एक कास्याचा मंच तयार केला होता आणि तो बाहेरील अंगणाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला होता. तो त्या मंचावर उभा राहिला आणि त्याने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत गुडघे टेकले आणि स्वर्गाकडे आपले हात पसरले.

  11. 2 इतिहास ६:१४सुमारे इ.स.पू. १००४

    तो म्हणाला: “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात.

  12. 2 इतिहास ६:१५सुमारे इ.स.पू. १००४

    आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.

  13. 2 इतिहास ६:१६सुमारे इ.स.पू. १००४

    “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीदाला आपण जे वचन दिले होते ते पाळावे. आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर माझ्या नियमानुसार चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही कमी पडणार नाही.’

  14. 2 इतिहास ६:१७सुमारे इ.स.पू. १००४

    तर आता, याहवेह हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीदाला जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे.

  15. 2 इतिहास ६:१८सुमारे इ.स.पू. १००४

    “पण परमेश्वर खचितच मानवजातीबरोबर पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल?

  16. 2 इतिहास ६:१९सुमारे इ.स.पू. १००४

    तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या.

  17. 2 इतिहास ६:२०सुमारे इ.स.पू. १००४

    आपण आपले नाव देणार असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी.

  18. 2 इतिहास ६:२१सुमारे इ.स.पू. १००४

    आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंत्या करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या व ती ऐकून त्यांना क्षमा करा.

  19. 2 इतिहास ६:२२सुमारे इ.स.पू. १००४

    “जेव्हा कोणी आपल्या शेजार्‍याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली आणि ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील,

  20. 2 इतिहास ६:२३सुमारे इ.स.पू. १००४

    तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा.

  21. 2 इतिहास ६:२४सुमारे इ.स.पू. १००४

    “तुमच्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा तुमचे इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातील आणि जेव्हा ते तुमच्याकडे पुन्हा वळतील व आपल्या नावाची थोरवी गाऊन या मंदिरात तुमच्यापुढे प्रार्थना व विनंती करतील,

  22. 2 इतिहास ६:२५सुमारे इ.स.पू. १००४

    तेव्हा स्वर्गातून ऐकून तुमच्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश तुम्ही त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे.

  23. 2 इतिहास ६:२६सुमारे इ.स.पू. १००४

    “तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही, आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील, आणि तुमच्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील,

  24. 2 इतिहास ६:२७सुमारे इ.स.पू. १००४

    तेव्हा त्यांची विनंती ऐकून तुमचे सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा, व जो देश तुम्ही तुमच्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा.

  25. 2 इतिहास ६:२८सुमारे इ.स.पू. १००४

    “जेव्हा देशावर दुष्काळ, किंवा पीडा येते, किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला,