- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 970–930 BC
Solomon & The Temple
Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास ३:७सुमारे इ.स.पू. १०११
त्याने मंदिराच्या छताचे वासे, दारांच्या चौकटी, भिंती आणि मंदिराचे दरवाजे सोन्याने मढविले, भिंतींवर करुबाची आकृती कोरली.
- 2 इतिहास ३:८सुमारे इ.स.पू. १०११
त्याने परमपवित्रस्थान बांधले, त्याची लांबी मंदिराच्या रुंदीएवढी, वीस हात लांब आणि वीस हात रुंद होती. त्याच्या आतील भाग सहाशे तालांत शुद्ध सोन्याने मढविला.
- 2 इतिहास ३:९सुमारे इ.स.पू. १०११
त्यात पन्नास शेकेल वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता.
- 2 इतिहास ३:१०सुमारे इ.स.पू. १०११
मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात शलोमोनाने दोन कोरलेले करूब बसविले व त्यांनाही सोन्याने मढविले.
- 2 इतिहास ३:११सुमारे इ.स.पू. १०११
करुबांच्या पंखांची एकूण लांबी वीस हात होती. पहिल्या करुबाचा एक पंख पाच हात लांब होता आणि तो मंदिराच्या भिंतीला लागून होता, तर त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब असून दुसऱ्या करुबाच्या पंखाला लागून होता.
- 2 इतिहास ३:१२सुमारे इ.स.पू. १०११
त्याचप्रमाणे दुसऱ्या करुबांचा एक पंख पाच हात लांब आणि मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागून होता आणि त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब आणि पहिल्या करुबाच्या पंखाला लागून होता.
- 2 इतिहास ३:१३सुमारे इ.स.पू. १०११
या करुबांचे पंख वीस हात पसरलेले होते. मुख्य दिवानखाण्याकडे तोंड करून ते त्यांच्या पायांवर उभे होते.
- 2 इतिहास ३:१४सुमारे इ.स.पू. १०११
त्याने करुबांच्या आकाराची कशिदा केलेले निळ्या, जांभळ्या व किरमिजी धाग्यांचे आणि तागाच्या कापडाचे पडदे तयार केले.
- 2 इतिहास ३:१५सुमारे इ.स.पू. १०११
मंदिराच्या समोरील भागासाठी त्याने दोन आधारस्तंभ तयार केले जे एकत्र मिळून पस्तीस हात लांब होते, प्रत्येक स्तंभावर पाच हात उंचीचा कळस होता.
- 2 इतिहास ३:१६सुमारे इ.स.पू. १०११
त्याने एकमेकात गुंफून विणलेल्या साखळ्या बनविल्या आणि त्या आधारस्तंभाच्या टोकांवर ठेवल्या. त्याने शंभर डाळिंबेसुद्धा तयार केली आणि त्यांना साखळ्यांना लागून जोडले.
- 2 इतिहास ३:१७सुमारे इ.स.पू. १०११
त्याने मंदिराच्या समोर आधारस्तंभ बांधले, एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे असे ते उभारले. दक्षिणेकडील खांबाला त्याने याखीन असे नाव दिले आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले.
- 2 इतिहास ४:१सुमारे इ.स.पू. १०११
त्याने वीस हात लांब आणि वीस हात रुंद आणि दहा हात उंच अशी कास्याची एक वेदी तयार केली.
- 2 इतिहास ४:२सुमारे इ.स.पू. १०११
त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात दोरी लागत असे.
- 2 इतिहास ४:३सुमारे इ.स.पू. १०११
त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर बैलाच्या आकृती होत्या. हे बैल हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या.
- 2 इतिहास ४:४सुमारे इ.स.पू. १०११
हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते.
- 2 इतिहास ४:५सुमारे इ.स.पू. १०११
त्याची जाडी चार बोटे होती आणि पेल्याचा घेर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे.
- 2 इतिहास ४:६सुमारे इ.स.पू. १०११
होमबलींची अर्पणे धुण्यासाठी त्याने दहा गंगाळे तयार करून टाकीच्या उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली. फक्त याजकवर्गाला धुण्यासाठी हौदाचे पाणी वापरता येत असे.
- 2 इतिहास ४:७सुमारे इ.स.पू. १०११
दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्याने सोन्याच्या दहा समया तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये पाच दक्षिण बाजूच्या भागावर आणि पाच उत्तर बाजूच्या भागावर ठेवल्या.
- 2 इतिहास ४:८सुमारे इ.स.पू. १०११
त्याने दहा मेज तयार केले आणि ते मंदिरात ठेवले, पाच दक्षिणेकडे आणि पाच उत्तरेकडे. पाणी शिंपडणारे सोन्याचे शंभर कटोरे सुद्धा तयार केले.
- 2 इतिहास ४:९सुमारे इ.स.पू. १०११
नंतर त्याने याजकांसाठी एक अंगण व जनतेसाठी एक मोठे अंगण तयार केले व त्यांचे दरवाजे कास्य धातूने मढविले.
- 2 इतिहास ४:१०सुमारे इ.स.पू. १०११
त्याने पाण्याचा हौद दक्षिण बाजूला, दक्षिणपूर्व दिशेच्या कोपऱ्यावर ठेवला.
- 2 इतिहास ४:११सुमारे इ.स.पू. १०११
आणि हुरामने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हुरामने परमेश्वराच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले सर्व काम पूर्ण केले:
- 2 इतिहास ४:१२सुमारे इ.स.पू. १०११
दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्या जाळ्यांचे दोन संच;
- 2 इतिहास ४:१३सुमारे इ.स.पू. १०११
त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा);
- 2 इतिहास ४:१४सुमारे इ.स.पू. १०११
तिवड्या व त्यांची गंगाळे;