मुख्य मजकुरावर जा

circa 970–930 BC

Solomon & The Temple

Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.

635 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे ११:३५सुमारे इ.स.पू. ९८४

    परंतु मी शलोमोनच्या पुत्राच्या हातून राज्य काढून दहा गोत्र तुला देईन.

  2. 1 राजे ११:३६सुमारे इ.स.पू. ९८४

    मी शलोमोनच्या पुत्राला एक गोत्र देईन, यासाठी की ज्या यरुशलेम नगरास मी माझ्या नावासाठी निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद याचा दीप सदा माझ्यासमोर पेटलेला असेल.

  3. 1 राजे ११:३७सुमारे इ.स.पू. ९८४

    आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुला मनास वाटेल त्यावर तू राज्य करशील; इस्राएलवर तू राज्य करशील.

  4. 1 राजे ११:३८सुमारे इ.स.पू. ९८४

    मी तुला दिलेल्या आज्ञांनुसार जर तू करशील, माझा सेवक दावीदाने केले त्याप्रमाणे माझ्या आज्ञेत चालशील व माझे विधी व आज्ञा पाळून माझ्या दृष्टीत जे योग्य ते करशील, तर मी तुझ्याबरोबर राहीन. दावीदाचे जसे मी कायमचे राज्य स्थापले आहे, तसेच तुझी व तुझ्या राज्याची स्थापना मी करेन व इस्राएल तुझ्या हाती देईन.

  5. 1 राजे ११:३९सुमारे इ.स.पू. ९८४

    असे करून मी दावीदाच्या वंशजांना नम्र बनवीन, पण सर्वकाळासाठी नव्हे.’ ”

  6. 1 राजे ११:४०सुमारे इ.स.पू. ९८४

    शलोमोनने यरोबोअमला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण यरोबोअम इजिप्त देशाचा राजा शिशाककडे पळून गेला आणि शलोमोनचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिला.

  7. 1 राजे ११:४१सुमारे इ.स.पू. ९८४

    शलोमोनच्या राज्यकाळातील इतर घटना; त्याची कृत्ये व त्याने दाखविलेले ज्ञान हे शलोमोनच्या पुस्तकात लिहिलेले नाहीत का?

  8. 1 राजे ११:४२सुमारे इ.स.पू. ९८४

    शलोमोनने यरुशलेमात संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.

  9. 1 राजे ११:४३सुमारे इ.स.पू. ९७५

    नंतर शलोमोन त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला व त्याला त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरले आणि रेहोबोअम राजा म्हणून त्याचा वारस झाला.

  10. 2 इतिहास १:१सुमारे इ.स.पू. १०१५

    दावीद राजाचा पुत्र शलोमोनाने स्वतःस इस्राएलच्या राज्यावर भक्कमपणे स्थापित केले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराने त्याला अत्यंत महान बनविले होते.

  11. 2 इतिहास १:२सुमारे इ.स.पू. १०१५

    मग शलोमोन संपूर्ण इस्राएलास म्हणाला—फौजेचे सहस्त्राधिपती व शताधिपती, न्यायाधीश, इस्राएलातील सर्व पुढारी, कुटुंबप्रमुख—

  12. 2 इतिहास १:३सुमारे इ.स.पू. १०१५

    शलोमोन व संपूर्ण सभा गिबोनच्या उच्चस्थानी गेले, कारण याहवेहचा सेवक मोशेने अरण्यवासात परमेश्वराचा सभामंडप उभारला होता.

  13. 2 इतिहास १:४सुमारे इ.स.पू. १०१५

    दावीदाने किर्याथ-यआरीमहून परमेश्वराचा कोश आणला, कारण त्याने त्याकरिता यरुशलेम येथे एक मंडप उभारला होता.

  14. 2 इतिहास १:५सुमारे इ.स.पू. १०१५

    परंतु हूरचा पुत्र, उरीचा पुत्र बसालेलाने गिबोनात कास्याच्या धातूची वेदी याहवेहच्या कोशासमोर बनविली होती; आता शलोमोन व सर्व लोक त्यांची इच्छा जाणून घेण्यास आले.

  15. 2 इतिहास १:६सुमारे इ.स.पू. १०१५

    शलोमोन याहवेहच्या समक्षतेत सभामंडपात गेला व त्याने कास्याच्या वेदीवर एक हजार होमबली अर्पिले.

  16. 2 इतिहास १:७सुमारे इ.स.पू. १०१५

    त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”

  17. 2 इतिहास १:८सुमारे इ.स.पू. १०१५

    शलोमोनाने परमेश्वराला उत्तर दिले, “आपला सेवक माझे पिता दावीद याला आपण अपार दया दाखविली आणि त्यांच्या जागी तुम्ही मला राजा म्हणून नेमले.

  18. 2 इतिहास १:९सुमारे इ.स.पू. १०१५

    आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले.

  19. 2 इतिहास १:१०सुमारे इ.स.पू. १०१५

    या लोकांना मार्गदर्शन करण्यास मला सुज्ञता व ज्ञान द्या, कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकणार?”

  20. 2 इतिहास १:११सुमारे इ.स.पू. १०१५

    तेव्हा परमेश्वर शलोमोनाला म्हणाले, “जर हीच तुझ्या मनातील इच्छा आहे व तू धनदौलत, संपत्ती किंवा मान सन्मान मागितला नाहीस. मी तुझ्या शत्रूंना मृत्यू द्यावा अथवा स्वतःसाठी मोठे आयुष्यमान ही मागणी देखील केली नाहीस, तर ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा बनविले त्यांच्यावर नीट शासन करता यावे म्हणून तू सुज्ञता व ज्ञान मागितलेस,

  21. 2 इतिहास १:१२सुमारे इ.स.पू. १०१५

    तुला सुज्ञता व ज्ञान देण्यात येईल. याशिवाय मी तुला इतकी धन, संपत्ती आणि सन्मान देईन की, आतापर्यंत कोणत्याही राजाला कधीही प्राप्त झाले नव्हते व कोणालाही होणार नाही.”

  22. 2 इतिहास १:१३सुमारे इ.स.पू. १०१५

    नंतर शलोमोन गिबोनाच्या उच्च स्थानावरील सभामंडपावरून निघून यरुशलेमास गेला आणि इस्राएलावर राज्य करू लागला.

  23. 2 इतिहास १:१४सुमारे इ.स.पू. १०१५

    शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती.

  24. 2 इतिहास १:१५सुमारे इ.स.पू. १०१५

    राजाने यरुशलेमात चांदी व सोने धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  25. 2 इतिहास १:१६सुमारे इ.स.पू. १०१५

    शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असे.