- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 970–930 BC
Solomon & The Temple
Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.
या कालखंडातील वचने
- 1 राजे १०:१४सुमारे इ.स.पू. १०१५
शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत होते,
- 1 राजे १०:१५सुमारे इ.स.पू. १०१५
याशिवाय व्यापारी आणि सावकार, अरब देशाचे राजे व देशाच्या राज्यपालांपासून येणारी महसूल ती वेगळीच होती.
- 1 राजे १०:१६सुमारे इ.स.पू. १०१५
शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल ठोकलेले सोने लागले होते.
- 1 राजे १०:१७सुमारे इ.स.पू. १०१५
तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीन मीना सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या.
- 1 राजे १०:१८सुमारे इ.स.पू. १०१५
नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले.
- 1 राजे १०:१९सुमारे इ.स.पू. १०१५
सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याच्या मागचा भाग गोलाकार होता. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह केलेले होते.
- 1 राजे १०:२०सुमारे इ.स.पू. १०१५
प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते.
- 1 राजे १०:२१सुमारे इ.स.पू. १०१५
शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे.
- 1 राजे १०:२२सुमारे इ.स.पू. १०१५
हीरामच्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा समुद्रावर तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.
- 1 राजे १०:२३सुमारे इ.स.पू. १०१५
संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता.
- 1 राजे १०:२४सुमारे इ.स.पू. १०१५
परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व लोक येत असत.
- 1 राजे १०:२५सुमारे इ.स.पू. १०१५
आणि जे लोक येत असत, ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत.
- 1 राजे १०:२६सुमारे इ.स.पू. १०१५
शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती.
- 1 राजे १०:२७सुमारे इ.स.पू. १०१५
राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.
- 1 राजे १०:२८सुमारे इ.स.पू. १०१५
शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असत.
- 1 राजे १०:२९सुमारे इ.स.पू. १०१५
त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते पाठवित असत.
- 1 राजे ११:१सुमारे इ.स.पू. ९८४
शलोमोन राजा, फारोहच्या कन्येशिवाय मोआबी, अम्मोनी, एदोमी, सीदोनी व हिथी या परदेशीय स्त्रियांवर देखील प्रेम करत होता.
- 1 राजे ११:२सुमारे इ.स.पू. ९८४
हे ते राष्ट्र होते ज्याविषयी याहवेहने इस्राएल लोकांना सांगितले होते, “तुम्ही त्यांच्याशी विवाह करू नये, कारण ते खचितच तुमची मने त्यांच्या दैवतांकडे वळवतील.” तरीही, शलोमोन त्या स्त्रियांच्या प्रेमात फार जडला होता.
- 1 राजे ११:३सुमारे इ.स.पू. ९८४
त्याला राजकीय घराण्यातील सातशे पत्नी आणि तीनशे उपपत्नी होत्या व त्याच्या पत्नींनी त्याला बहकविले.
- 1 राजे ११:४सुमारे इ.स.पू. ९८४
तो उतार वयाचा होईपर्यंत, त्याच्या पत्नींनी त्याचे हृदय इतर दैवतांकडे वळविले आणि त्याचा पिता दावीदाप्रमाणे शलोमोनचे हृदय आता संपूर्णपणे याहवेह त्याच्या परमेश्वरास समर्पित नव्हते.
- 1 राजे ११:५सुमारे इ.स.पू. ९८४
शलोमोन सीदोन लोकांची देवी अष्टारोथ आणि अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलेख याची उपासना करू लागला.
- 1 राजे ११:६सुमारे इ.स.पू. ९८४
याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते शलोमोनने केले; त्याचा पिता दावीदाने केले त्याप्रमाणे शलोमोन याहवेहला पूर्णपणे अनुसरला नाही.
- 1 राजे ११:७सुमारे इ.स.पू. ९८४
शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली.
- 1 राजे ११:८सुमारे इ.स.पू. ९८४
आपल्या परदेशीय स्त्रिया, ज्या धूप जाळून आपआपल्या दैवतांना यज्ञ अर्पण करीत होत्या, त्यांच्यासाठी सुद्धा त्याने तसेच केले.
- 1 राजे ११:९सुमारे इ.स.पू. ९८४
शलोमोनचे हृदय याहवेह इस्राएलचे परमेश्वर, ज्यांनी त्याला दोनदा दर्शन दिले होते त्यांच्यापासून दूर वळले होते, म्हणून याहवेह शलोमोनवर रागावले.