- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 970–930 BC
Solomon & The Temple
Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.
या कालखंडातील वचने
- 1 राजे ११:१०सुमारे इ.स.पू. ९८४
जरी याहवेहने इतर देवांचे अनुसरण करण्यास मना केली होती, तरी शलोमोनने याहवेहची आज्ञा मानली नाही.
- 1 राजे ११:११सुमारे इ.स.पू. ९८४
म्हणून याहवेहने शलोमोनला म्हटले, “तुझी ही वृत्ती आहे, आणि मी तुला लावून दिलेल्या माझ्या कराराचे व विधींचे पालन तू केले नाही, मी खचितच तुझे राज्य तुझ्यापासून हिसकावून घेईन व ते तुझ्या हाताखालच्या मनुष्याला देईन.
- 1 राजे ११:१२सुमारे इ.स.पू. ९८४
तथापि, तुझा पिता दावीद याच्याप्रीत्यर्थ, ते मी तुझ्या जीवनकाळात करणार नाही. ते मी तुझ्या पुत्राच्या हातून हिसकावून घेईन.
- 1 राजे ११:१३सुमारे इ.स.पू. ९८४
तरीही, संपूर्ण राज्यच मी त्याच्यापासून हिसकावून घेणार नाही, तर माझा सेवक दावीद व यरुशलेम ज्यांना मी निवडले, याच्याप्रीत्यर्थ एक गोत्र मी तुझ्या पुत्राच्या हाती देईन.”
- 1 राजे ११:१४सुमारे इ.स.पू. ९८४
नंतर याहवेहने एदोमी राजघराण्यातील एदोम हदाद याला शलोमोनचा शत्रू म्हणून उभे केले.
- 1 राजे ११:१५सुमारे इ.स.पू. ९८४
काही वर्षापूर्वी योआबाचा सेनापती एदोम, जो मृतांना पुरण्यास गेला होता, तेव्हा दावीदाने त्याच्याशी युद्ध केले होते आणि एदोमातील सर्व पुरुषांना मारून टाकले होते.
- 1 राजे ११:१६सुमारे इ.स.पू. ९८४
एदोमातील सर्व पुरुषांना मारेपर्यंत योआब व सर्व इस्राएली लोक सहा महिने तिथेच राहिले.
- 1 राजे ११:१७सुमारे इ.स.पू. ९८४
परंतु हदाद, जो अजूनही कोवळा मुलगा होता, काही एदोमी अधिकारी, ज्यांनी त्याच्या पित्याची सेवा केली होती, त्यांच्याबरोबर इजिप्तमध्ये पळून गेला.
- 1 राजे ११:१८सुमारे इ.स.पू. ९८४
ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.
- 1 राजे ११:१९सुमारे इ.स.पू. ९८४
फारोह हदादवर इतका प्रसन्न झाला की त्याने आपली पत्नी, तहपनीस राणीची बहीण त्याला पत्नी म्हणून दिली.
- 1 राजे ११:२०सुमारे इ.स.पू. ९८४
तहपनीसच्या बहिणीकडून त्याला गेनुबाथ नावाचा एक पुत्र झाला, ज्याचे संगोपन तहपनीसने राजवाड्यात केले. गेनुबाथ तिथे स्वतः फारोहच्या लेकरांबरोबर राहिला.
- 1 राजे ११:२१सुमारे इ.स.पू. ९८४
इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकले की दावीद आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आहे आणि सैन्याचा अधिकारी योआब देखील मरण पावला होता. तेव्हा हदाद फारोहला म्हणाला, “मी आपल्या स्वदेशास जावे म्हणून मला जाऊ द्यावे.”
- 1 राजे ११:२२सुमारे इ.स.पू. ९८४
फारोहने त्याला विचारले, “येथे तुला काय कमी आहे की तू आपल्या देशाला जाऊ इच्छितोस?” हदाद म्हणाला, “काही कमी नाही, पण मला जाऊ द्यावे!”
- 1 राजे ११:२३सुमारे इ.स.पू. ९८४
परमेश्वराने शलोमोनविरुद्ध आणखी एक शत्रू उभा केला, तो एलयादाचा पुत्र रेजोन होता, जो त्याचा मालक सोबाहचा राजा हादादेजर याच्यापासून पळून गेला होता.
- 1 राजे ११:२४सुमारे इ.स.पू. ९८४
जेव्हा दावीदाने जोबाहच्या सैन्याचा नाश केला, रेजोनने त्याच्यासोबत काही लोक जमा केले व तो त्यांचा पुढारी झाला; ते पुढे दिमिष्कास गेले, तिथे स्थायिक होऊन त्यांनी त्याचा ताबा घेतला.
- 1 राजे ११:२५सुमारे इ.स.पू. ९८४
शलोमोन जिवंत होता तोपर्यंत हदादने दिलेल्या त्रासात भर असे रेजोनने देखील इस्राएलशी वैर केले. तेव्हा रेजोनने अरामात राज्य केले व इस्राएलला विरोध केला.
- 1 राजे ११:२६सुमारे इ.स.पू. ९८४
जेरेदाह येथील एक एफ्राईमकर, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने सुद्धा शलोमोन राजाविरुद्ध बंड केले. त्याची आई विधवा होती, तिचे नाव जेरुआह होते.
- 1 राजे ११:२७सुमारे इ.स.पू. ९८४
त्याने राजाविरुद्ध बंड कसे केले त्याचा वृत्तांत असा: शलोमोनने स्तरीय बांधकाम व त्याचा पिता दावीदाच्या शहराच्या भिंतीची खिंडारे दुरुस्त केली.
- 1 राजे ११:२८सुमारे इ.स.पू. ९८४
यरोबोअम एक शूरवीर होता. या तरुणाने आपले काम किती उत्तम प्रकारे केले आहे, हे शलोमोनने पाहिले, तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या गोत्रातील सर्व मजूर कामगारांवर मुख्य असे नेमले.
- 1 राजे ११:२९सुमारे इ.स.पू. ९८४
त्याच दरम्यान यरोबोअम यरुशलेमातून बाहेर जात असताना, शिलोनी अहीयाह नावाचा संदेष्टा, नवीन झगा घातलेला असा त्याला वाटेत भेटला. ते त्या मैदानात दोघेच होते,
- 1 राजे ११:३०सुमारे इ.स.पू. ९८४
अहीयाहने घातलेला आपला नवीन झगा घेऊन तो फाडून त्याचे बारा तुकडे केले.
- 1 राजे ११:३१सुमारे इ.स.पू. ९८४
आणि तो यरोबोअमास म्हणाला, “तुझ्यासाठी दहा तुकडे उचलून घे, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘पाहा, मी शलोमोनच्या हातून राज्य हिसकावून घेईन व दहा गोत्र मी तुझ्या हाती देईन.
- 1 राजे ११:३२सुमारे इ.स.पू. ९८४
पण माझा सेवक दावीद आणि यरुशलेम शहर ज्याची मी इस्राएलच्या सर्व गोत्रांतून निवड केली त्याच्याप्रित्यर्थ, शलोमोनच्या हातात एक गोत्र राहील.
- 1 राजे ११:३३सुमारे इ.स.पू. ९८४
मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत.
- 1 राजे ११:३४सुमारे इ.स.पू. ९८४
“ ‘परंतु मी शलोमोनच्या हातून आताच संपूर्ण राज्य हिसकावून घेणार नाही; माझा सेवक दावीदाप्रीत्यर्थ मी त्याला त्याच्या जीवनभर अधिकारी असे नेमले आहे, कारण मी दावीदाला निवडले व त्याने माझ्या आज्ञा व विधींचे पालन केले.