मुख्य मजकुरावर जा

circa 970–930 BC

Solomon & The Temple

Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.

635 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 इतिहास १:१७सुमारे इ.स.पू. १०१५

    त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते निर्यात करीत असे.

  2. 2 इतिहास २:१सुमारे इ.स.पू. १०१५

    शलोमोनाने याहवेहच्या नामाने मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची आज्ञा दिली.

  3. 2 इतिहास २:२सुमारे इ.स.पू. १०१५

    या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली.

  4. 2 इतिहास २:३सुमारे इ.स.पू. १०१५

    शलोमोनाने सोरचा राजा हीराम याच्याकडे हा निरोप पाठविला: “माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे.

  5. 2 इतिहास २:४सुमारे इ.स.पू. १०१५

    आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.

  6. 2 इतिहास २:५सुमारे इ.स.पू. १०१५

    “मी जे मंदिर बांधणार आहे ते फारच भव्य होईल, कारण आमचे परमेश्वर सर्व दैवतांपेक्षा महान आहेत.

  7. 2 इतिहास २:६सुमारे इ.स.पू. १०१५

    परंतु ज्यांना स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्ग सुद्धा अपुरा आहे, त्यांच्यासाठी मंदिर बांधण्यास कोण समर्थ आहे? तर मग मंदिर बांधणारा मी कोण? केवळ त्यांच्या पुढे अर्पणे करण्यासाठी स्थान मी बांधत आहे.

  8. 2 इतिहास २:७सुमारे इ.स.पू. १०१५

    “म्हणून या कामासाठी सोने, चांदी, कास्य व लोखंड या कामात एक कुशल व हुशार कारागीर, जांभळ्या, किरमिजी व निळ्या रंगांचे कापड विणण्यात आणि उत्तम नक्षीचे कोरीव काम करण्यात तरबेज कारागीर माझ्याकडे पाठवा. माझ्याजवळ यहूदीयात व यरुशलेममध्ये, माझे पिता दावीदाने निवडलेले जे निपुण कारागीर आहेत, त्यांच्याबरोबर तो काम करेल.

  9. 2 इतिहास २:८सुमारे इ.स.पू. १०१५

    “याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.

  10. 2 इतिहास २:९सुमारे इ.स.पू. १०१५

    जे मंदिर मी बांधणार आहे ते अत्यंत विशाल व भव्य असेल, म्हणून लाकडाचा फारच मोठा साठा लागेल.

  11. 2 इतिहास २:१०सुमारे इ.स.पू. १०१५

    तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर झोडलेला गहू, वीस हजार कोर जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.”

  12. 2 इतिहास २:११सुमारे इ.स.पू. १०१५

    सोरचा राजा हीरामाने शलोमोन राजाच्या पत्रास असे उत्तर पाठविले: “कारण याहवेह आपल्या लोकांवर प्रेम करतात, त्यामुळेच त्यांनी तुम्हाला त्यांचा राजा केले आहे.”

  13. 2 इतिहास २:१२सुमारे इ.स.पू. १०१५

    हीराम पुढे हे देखील म्हणाला, “इस्राएलचे परमेश्वर याहवेह धन्यवादित असो, ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली! त्यांनी दावीद राजाला तुमच्यासारखा सुज्ञ, बुद्धिमान व समजूतदार पुत्र दिला, जो याहवेहचे मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधेल.

  14. 2 इतिहास २:१३सुमारे इ.स.पू. १०१५

    “माझ्याकडे असलेला अत्यंत निष्णात असा हुराम-आबी हा कारागीर मी तुमच्याकडे पाठवित आहे.

  15. 2 इतिहास २:१४सुमारे इ.स.पू. १०१५

    त्याची आई दान येथील एक इस्राएली स्त्री असून त्याचा पिता सोरचा आहे. सोन्याचांदीच्या कामाची तसेच कास्य व लोखंडी, दगडकाम, सुतारकी, जांभळा, निळा व किरमिजी रंगाच्या सुताचे व तलम कापडाच्या विणकामाची त्याला संपूर्ण माहिती आहे. तो उत्तम कोरीव काम जाणणारा असून त्याला देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. तो तुमच्याकडील कामगार आणत असे तुमचे पिता व माझा प्रभू दावीद राजे यांनी नेमणूक केलेल्या तुमच्या कारागिरांबरोबर काम करेल.

  16. 2 इतिहास २:१५सुमारे इ.स.पू. १०१५

    “आता माझ्या स्वामींनी कबूल केलेले गहू, जव, द्राक्षारस व जैतुनाचे तेल पाठवून द्या.

  17. 2 इतिहास २:१६सुमारे इ.स.पू. १०१५

    आम्ही लबानोन डोंगरावरील सर्व लाकडे कापून ते ओंडके जलमार्गाने याफोला पाठवू, तिथून ते तुम्ही यरुशलेममध्ये घेऊ शकाल.”

  18. 2 इतिहास २:१७सुमारे इ.स.पू. १०१५

    शलोमोनाने, त्याचा पिता दावीदाने केल्यानंतर, इस्राएल देशातील सर्व परदेशी लोकांची मोजणी केली; मोजणीत 1,53,600 परदेशी लोक आढळले.

  19. 2 इतिहास २:१८सुमारे इ.स.पू. १०१५

    त्यातून त्याने 70,000 कष्टकरी मजूर, डोंगरात 80,000 पाथरवट व यांच्यावर देखरेख करण्यास 3,600 मुकादम यांची नियुक्ती केली.

  20. 2 इतिहास ३:१सुमारे इ.स.पू. १०११

    मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती.

  21. 2 इतिहास ३:२सुमारे इ.स.पू. १०११

    शलोमोन राजाने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बांधकामास सुरुवात केली.

  22. 2 इतिहास ३:३सुमारे इ.स.पू. १०११

    परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाने पाया घातला, त्याची लांबी साठ हात आणि रुंदी वीस हात होती.

  23. 2 इतिहास ३:४सुमारे इ.स.पू. १०११

    मंदिरापुढील द्वारमंडपाची लांबी मंदिराच्या रुंदीएवढीच म्हणजेच वीस हात व उंचीही वीस हात होती. त्याच्या आतील भाग शुद्ध सोन्याने मढविलेला होता.

  24. 2 इतिहास ३:५सुमारे इ.स.पू. १०११

    मंदिराचा दिवाणखाना त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी करून ती सोन्याने मढविली व तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्यांची नक्षीचे कोरीव काम केले होते.

  25. 2 इतिहास ३:६सुमारे इ.स.पू. १०११

    मंदिर मोलवान रत्नांनी सजविले होते. परवाईम नामक ठिकाणी मिळणारे सोने वापरण्यात आले होते.