- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 970–930 BC
Solomon & The Temple
Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.
या कालखंडातील वचने
- 2 इतिहास ७:१२सुमारे इ.स.पू. १००४
रात्रीच्या वेळेस याहवेहने शलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी स्वतःकरिता हे ठिकाण यज्ञांसाठी मंदिर म्हणून निवडले आहे.
- 2 इतिहास ७:१३सुमारे इ.स.पू. १००४
“जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन,
- 2 इतिहास ७:१४सुमारे इ.स.पू. १००४
जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.
- 2 इतिहास ७:१५सुमारे इ.स.पू. १००४
आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील.
- 2 इतिहास ७:१६सुमारे इ.स.पू. १००४
मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.
- 2 इतिहास ७:१७सुमारे इ.स.पू. १००४
“तुझ्या बाबतीत म्हणायचे तर, तू आपला पिता दावीदाप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील,
- 2 इतिहास ७:१८सुमारे इ.स.पू. १००४
तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीदाशी करार करीत म्हटले होते, ‘इस्राएलवर राज्य करण्यास तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’
- 2 इतिहास ७:१९सुमारे इ.स.पू. १००४
“परंतु जर तुम्ही दूर वळले आणि मी तुला दिलेले विधी आणि आज्ञा पाळल्या नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली,
- 2 इतिहास ७:२०सुमारे इ.स.पू. १००४
तर मी माझ्या देशातून जो मी त्यांना दिलेला आहे, तिथून मी इस्राएली लोकांना उपटून टाकीन आणि या मंदिराचा, जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. सर्व लोकांमध्ये मी ते थट्टा व निंदेचा विषय करेन.
- 2 इतिहास ७:२१सुमारे इ.स.पू. १००४
हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’
- 2 इतिहास ७:२२सुमारे इ.स.पू. १००४
तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर ज्यांनी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून त्यांनी त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”
- 2 इतिहास ८:१सुमारे इ.स.पू. १००४
शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि आपला राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.
- 2 इतिहास ८:२सुमारे इ.स.पू. १००४
शलोमोनाने त्याला हीरामकडून मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली.
- 2 इतिहास ८:३सुमारे इ.स.पू. १००४
नंतर शलोमोन हमाथ-सोबाहकडे गेला आणि ते ताब्यात घेतले
- 2 इतिहास ८:४सुमारे इ.स.पू. १००४
त्याने तदमोर शहरसुद्धा वाळवंटात बांधले आणि भांडारे असलेली सर्व नगरे त्याने हमाथ येथे बांधली.
- 2 इतिहास ८:५सुमारे इ.स.पू. १००४
त्याने वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन ही तटबंदीची शहरे, मोठ्या भिंती आणि प्रवेशद्वारांची धातूंचे गज बसवून पुनर्बांधणी केली,
- 2 इतिहास ८:६सुमारे इ.स.पू. १००४
त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
- 2 इतिहास ८:७सुमारे इ.स.पू. १००४
हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते.
- 2 इतिहास ८:८सुमारे इ.स.पू. १००४
या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे.
- 2 इतिहास ८:९सुमारे इ.स.पू. १००४
परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.
- 2 इतिहास ८:१०सुमारे इ.स.पू. १००४
शलोमोन राजाचे ते मुख्य अधिकारीसुद्धा होते, माणसांवर देखरेख ठेवणारे दोनशे पन्नास अधिकारी होते.
- 2 इतिहास ८:११सुमारे इ.स.पू. १००४
शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.”
- 2 इतिहास ८:१२सुमारे इ.स.पू. १००४
याहवेहची जी वेदी त्याने द्वारमंडपासमोर बांधली होती, तिथे शलोमोनाने याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले,
- 2 इतिहास ८:१३सुमारे इ.स.पू. १००४
शब्बाथ, अमावस्या आणि वर्षातून तीन वेळा सण यासाठी मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे अर्पणे करण्यासाठी रोजच्या गरजेनुसार शलोमोनाने त्यावर याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले—बेखमीर भाकरीचा सण, आठवड्यांचा सण आणि मंडपांचा सण असे ते तीन सण.
- 2 इतिहास ८:१४सुमारे इ.स.पू. १००४
त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली.