मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ३६:२८सुमारे इ.स.पू. १७५६

    दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.

  2. उत्पत्ती ३६:२९सुमारे इ.स.पू. १७५६

    होरी लोकांमधून प्रमुख झालेल्यांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अना,

  3. उत्पत्ती ३६:३०सुमारे इ.स.पू. १७५६

    दिशोन, एसर व दीशान.

  4. उत्पत्ती ३६:३१सुमारे इ.स.पू. १७५६

    इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते:

  5. उत्पत्ती ३६:३२सुमारे इ.स.पू. १७५६

    बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

  6. उत्पत्ती ३६:३३सुमारे इ.स.पू. १८६९

    बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

  7. उत्पत्ती ३६:३४सुमारे इ.स.पू. १८२७

    योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.

  8. उत्पत्ती ३६:३५सुमारे इ.स.पू. १७८५

    हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

  9. उत्पत्ती ३६:३६सुमारे इ.स.पू. १७४३

    हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.

  10. उत्पत्ती ३६:३७सुमारे इ.स.पू. १७०१

    सामलाह मेल्यावर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातील शौल त्याच्या जागी राजा झाला.

  11. उत्पत्ती ३६:३८सुमारे इ.स.पू. १६५९

    शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.

  12. उत्पत्ती ३६:३९सुमारे इ.स.पू. १६१७

    अकबोराचा पुत्र बआल-हानान हा मेल्यावर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते, आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेद हिची कन्या होती.

  13. उत्पत्ती ३६:४०सुमारे इ.स.पू. १६१७

    एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता: तिम्ना, आल्वा, यतेथ,

  14. उत्पत्ती ३६:४१सुमारे इ.स.पू. १६१७

    ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,

  15. उत्पत्ती ३६:४२सुमारे इ.स.पू. १६१७

    केनाज, तेमान, मिब्सार,

  16. उत्पत्ती ३६:४३सुमारे इ.स.पू. १६१७

    मग्दीएल व ईराम.

  17. उत्पत्ती ३७:१सुमारे इ.स.पू. १७२८

    कनान देशात ज्या ठिकाणी आपला पिता वस्ती करून राहिला होता, त्या ठिकाणी याकोब जाऊन स्थायिक झाला.

  18. उत्पत्ती ३७:२सुमारे इ.स.पू. १७२८

    याकोबाच्या कुटुंबाचा वृतांत असा आहे: योसेफ सतरा वर्षांचा तरुण असताना आपल्या भावांबरोबर, त्याच्या वडिलांच्या पत्नी बिल्हा व जिल्पा यांच्या पुत्रांबरोबर कळप चारीत असे, तेव्हा योसेफाने, त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी वडिलांकडे आणल्या.

  19. उत्पत्ती ३७:३सुमारे इ.स.पू. १७२८

    इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला.

  20. उत्पत्ती ३७:४सुमारे इ.स.पू. १७२८

    जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.

  21. उत्पत्ती ३७:५सुमारे इ.स.पू. १७२८

    एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले.

  22. उत्पत्ती ३७:६सुमारे इ.स.पू. १७२८

    योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “माझे स्वप्न ऐका:

  23. उत्पत्ती ३७:७सुमारे इ.स.पू. १७२८

    आपण शेतात पेंढ्या बांधत होतो, तेवढ्यात माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या सर्वांच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती गोळा होऊन उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला नमन केले.”

  24. उत्पत्ती ३७:८सुमारे इ.स.पू. १७२८

    तेव्हा त्याच्या भावांनी त्याची हेटाळणी करून त्याला म्हटले. “काय! तू आमचा राजा होणार? तू आम्हावर सत्ता चालविणार?” आणि त्याच्या स्वप्नामुळे व त्याने त्याचे कथन केल्यामुळे ते त्याचा अधिक द्वेष करू लागले.

  25. उत्पत्ती ३७:९सुमारे इ.स.पू. १७२८

    पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.”