- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1900–1700 BC
Jacob, Joseph & Egypt
Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती ३७:३५सुमारे इ.स.पू. १७२८
त्याचे सर्व पुत्र आणि कन्या आले आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो म्हणत असे, “मी पुत्र शोकानेच मरेन आणि अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” अशा रीतीने तो त्याच्यासाठी दुःखाने रडत असे.
- उत्पत्ती ३७:३६सुमारे इ.स.पू. १७२८
दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले.
- उत्पत्ती ३८:१सुमारे इ.स.पू. १७३९
याच सुमारास यहूदाह आपल्या भावांना सोडून अदुल्लाम येथे आला आणि हीरा नावाच्या एका मनुष्याबरोबर राहू लागला.
- उत्पत्ती ३८:२सुमारे इ.स.पू. १७३९
तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला;
- उत्पत्ती ३८:३सुमारे इ.स.पू. १७३८
ती गर्भवती झाली, तिला पुत्र झाला. त्याचे नाव एर ठेवण्यात आले.
- उत्पत्ती ३८:४सुमारे इ.स.पू. १७३७
ती पुन्हा गर्भवती झाली, तिला पुत्र झाला, त्याचे नाव ओनान ठेवण्यात आले.
- उत्पत्ती ३८:५सुमारे इ.स.पू. १७३६
तिने आणखी एका पुत्राला जन्म दिला व त्याचे नाव शेलाह ठेवले, ते कजीब येथे राहत असताना तिने त्याला जन्म दिला.
- उत्पत्ती ३८:६सुमारे इ.स.पू. १७३६
यहूदाहने आपला ज्येष्ठपुत्र एर याचा विवाह तामार नावाच्या एका स्त्रीशी करून दिला.
- उत्पत्ती ३८:७सुमारे इ.स.पू. १७३६
परंतु यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर, याहवेहच्या नजरेत एक दुष्ट मनुष्य होता म्हणून याहवेहने त्याला ठार मारले.
- उत्पत्ती ३८:८सुमारे इ.स.पू. १७२२
तेव्हा यहूदाह ओनान यास म्हणाला, “तू तिचा दीर असल्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तामारेशी विवाह केला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून तिला तुझ्या भावाचे संतान होतील.”
- उत्पत्ती ३८:९सुमारे इ.स.पू. १७२२
ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये.
- उत्पत्ती ३८:१०सुमारे इ.स.पू. १७२२
हे त्याचे कृत्य याहवेहच्या दृष्टीने एक फार मोठे पाप होते; म्हणून याहवेहने त्यालाही मारून टाकले.
- उत्पत्ती ३८:११सुमारे इ.स.पू. १७२२
यहूदाह आपली सून तामारला म्हणाला, “माझा पुत्र शेलाहचे विवाहाचे वय होईपर्यंत तू तुझ्या वडिलांच्या घरात विधवा म्हणून राहा.” यहूदाहला भीती वाटत होती की हा मुलगाही आपल्या भावांप्रमाणे मरेल. मग तामार तिच्या वडिलांच्या घरी गेली.
- उत्पत्ती ३८:१२सुमारे इ.स.पू. १७२२
कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्यांकडे तिम्ना येथे गेला.
- उत्पत्ती ३८:१३सुमारे इ.स.पू. १७२२
“तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले.
- उत्पत्ती ३८:१४सुमारे इ.स.पू. १७२२
तिने आपले वैधव्यदशेत वापरण्याचे कपडे बाजूला ठेवून दिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तिने अंगावर बुरखा घेतला. मग तिम्नाच्या वाटेवर असलेल्या एनाईम गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ती जाऊन बसली. कारण तिने पाहिले की, शेलाह आता मोठा झाला असला तरी तिला त्याची पत्नी म्हणून दिले गेले नाही.
- उत्पत्ती ३८:१५सुमारे इ.स.पू. १७२२
तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे,
- उत्पत्ती ३८:१६सुमारे इ.स.पू. १७२२
म्हणून तो तिच्याजवळ जाऊन थांबला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्याशी रत होण्याची माझी इच्छा आहे.” अर्थात् ती आपली सून आहे, हे त्याला माहीत नव्हते. यावर तिने विचारले, “याबद्दल तुम्ही मला काय द्याल?”
- उत्पत्ती ३८:१७सुमारे इ.स.पू. १७२२
त्याने म्हटले, “मी तुला माझ्या कळपातून एक कोवळी शेळी पाठवून देईन.” तेव्हा तिने विचारले, “ती पाठवेपर्यंत तुम्ही माझ्याकडे कोणते तारण ठेवणार आहात?”
- उत्पत्ती ३८:१८सुमारे इ.स.पू. १७२२
“तुला काय तारण हवे आहे?” त्याने तिला विचारले. तिने उत्तर दिले, “तुमची मुद्रिका, गोफ आणि हातातील काठी.” याप्रमाणे त्याने या वस्तू तिला दिल्या आणि तिने त्याला आपल्याशी रत होऊ दिले, परिणामी ती गर्भवती झाली.
- उत्पत्ती ३८:१९सुमारे इ.स.पू. १७२२
यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले.
- उत्पत्ती ३८:२०सुमारे इ.स.पू. १७२२
यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही.
- उत्पत्ती ३८:२१सुमारे इ.स.पू. १७२२
म्हणून त्याने एनाईम गावातील काही लोकांना विचारले, “गावाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर बसलेली देवदासी कुठे राहते?” “आमच्या गावात तर कोणी देवदासी राहत नाही,” त्यांनी त्याला उत्तर दिले.
- उत्पत्ती ३८:२२सुमारे इ.स.पू. १७२२
तेव्हा तो यहूदाहकडे परत गेला आणि त्याने त्याला सांगितले, “मला ती कुठेच सापडली नाही, तसेच तेथील लोकांनी सांगितले की आमच्या गावात कोणी देवदासी राहत नाही.”
- उत्पत्ती ३८:२३सुमारे इ.स.पू. १७२२
यावर यहूदाह म्हणाला, “मग त्या वस्तू तिच्याकडेच राहू दे. नाहीतर तेथील लोकांसाठी आपण उपहासाचा विषय होऊ. मी तर तुझ्यामार्फत तिच्यासाठी ही कोवळी शेळी पाठविली होती, पण ती तुला आढळली नाही.”