- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1900–1700 BC
Jacob, Joseph & Egypt
Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती ३८:२४सुमारे इ.स.पू. १७२२
सुमारे तीन महिन्यानंतर, “तुझी सून तामार ही वेश्याकर्मामुळे गर्भवती झाली आहे,” अशी बातमी यहूदाहच्या कानावर गेली. यहूदाह म्हणाला, “तिला बाहेर काढा आणि जाळून टाका!”
- उत्पत्ती ३८:२५सुमारे इ.स.पू. १७२२
त्याप्रमाणे ते तिला जाळून टाकण्यासाठी बाहेर घेऊन जात असताना तिने आपल्या सासर्याला निरोप पाठविला, “ही मुद्रिका, हा गोफ आणि ही काठी ज्याची आहे, त्याच्यापासून मला गर्भ राहिलेला आहे. तुम्ही या वस्तू ओळखता काय?”
- उत्पत्ती ३८:२६सुमारे इ.स.पू. १७२२
यहूदाहने त्या वस्तूंना ओळखले आणि म्हटले, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे, कारण माझा पुत्र शेलाह तिला पती म्हणून दिला नाही.” यानंतर त्याने कधीही तिच्याशी शरीरसंबंध ठेवला नाही.
- उत्पत्ती ३८:२७सुमारे इ.स.पू. १७२२
योग्य वेळी तामारेचे दिवस भरले आणि तिला जुळे पुत्र झाले.
- उत्पत्ती ३८:२८सुमारे इ.स.पू. १७२२
त्यांचा जन्म होत असताना, एका मुलाने प्रथम हात बाहेर काढला, त्याच्या मनगटावर सुइणीने शेंदरी रंगाचा दोरा बांधला व ती म्हणाली, “हा प्रथम जन्माला आला.”
- उत्पत्ती ३८:२९सुमारे इ.स.पू. १७२१
परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस ठेवले.
- उत्पत्ती ३८:३०सुमारे इ.स.पू. १७२१
यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह असे ठेवण्यात आले.
- उत्पत्ती ३९:१सुमारे इ.स.पू. १७२८
इकडे योसेफाला इजिप्तमध्ये आणले. फारोह अंमलदार व अंगरक्षकांचा प्रमुख पोटीफराने इश्माएली लोकांपासून योसेफास विकत घेतले.
- उत्पत्ती ३९:२सुमारे इ.स.पू. १७२८
याहवेह योसेफाबरोबर होते, म्हणून तो सफल व्यक्ती बनला आणि तो इजिप्तच्या धन्याच्या घरी राहत असे.
- उत्पत्ती ३९:३सुमारे इ.स.पू. १७२८
पोटीफराने पाहिले की याहवेह योसेफाबरोबर आहेत आणि जे काही तो करतो त्यामध्ये याहवेह त्याला यश देतात,
- उत्पत्ती ३९:४सुमारे इ.स.पू. १७२८
त्यामुळे साहजिकच योसेफ त्याचा आवडता झाला व त्याचा व्यक्तिगत सेवक बनला. लवकरच पोटीफराच्या घराची व्यवस्था व त्याचे सर्व व्यवहार त्याच्या ताब्यात देण्यात आले.
- उत्पत्ती ३९:५सुमारे इ.स.पू. १७२८
जेव्हापासून त्याने योसेफाला त्याच्या घरावर, व त्याचे जे काहीही होते त्या सर्वांवर अधिकारी म्हणून नेमले, तेव्हापासून योसेफामुळे याहवेहने त्या इजिप्तच्या धन्याला आशीर्वादित केले; पोटीफराचे जे काही होते, त्याचे कुटुंब व शेती यावर याहवेहचा आशीर्वाद होता.
- उत्पत्ती ३९:६सुमारे इ.स.पू. १७२८
म्हणून पोटीफराने आपले सर्वकाही योसेफाला सोपवून दिले. आपण काय खावे यापलीकडे त्याने कशाचीच काळजी केली नाही. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता.
- उत्पत्ती ३९:७सुमारे इ.स.पू. १७१९
काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!”
- उत्पत्ती ३९:८सुमारे इ.स.पू. १७१९
योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे.
- उत्पत्ती ३९:९सुमारे इ.स.पू. १७१९
या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.”
- उत्पत्ती ३९:१०सुमारे इ.स.पू. १७१९
ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले.
- उत्पत्ती ३९:११सुमारे इ.स.पू. १७१९
एके दिवशी असे घडून आले की, तो कामानिमित्त घराच्या आत आला असताना, घरात दुसरे कोणतेही सेवक नव्हते;
- उत्पत्ती ३९:१२सुमारे इ.स.पू. १७१९
तिने त्याच्या झग्याला पकडले आणि म्हणाली, “माझ्याबरोबर नीज!” पण त्याने त्याचा झगा तिच्या हातातच सोडला आणि घराबाहेर पळाला.
- उत्पत्ती ३९:१३सुमारे इ.स.पू. १७१९
त्याचा झगा आपल्याच हातात आहे आणि तो पळून गेला आहे हे तिच्या लक्षात आले,
- उत्पत्ती ३९:१४सुमारे इ.स.पू. १७१९
तेव्हा तिने घरातील सेवकांना बोलाविले. ती म्हणाली, “आमच्या घराचा उपमर्द करण्यासाठीच हा इब्री गुलाम घरात आणला आहे! त्याने माझ्यासोबत निजण्याचा प्रयत्न केला, पण मी किंचाळले.
- उत्पत्ती ३९:१५सुमारे इ.स.पू. १७१९
जसे त्याने माझे किंचाळणे ऐकले तसे तो स्वतःचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.”
- उत्पत्ती ३९:१६सुमारे इ.स.पू. १७१९
तिने तिचा धनी घरी येईपर्यंत तो झगा आपल्याजवळच ठेवला.
- उत्पत्ती ३९:१७सुमारे इ.स.पू. १७१९
नंतर तिने त्याला आपली कथा सांगितली: “जो इब्री गुलाम तुम्ही इकडे आणला आहे, त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
- उत्पत्ती ३९:१८सुमारे इ.स.पू. १७१९
पण जसे मी मदतीसाठी किंचाळले, त्याचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.”