- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1900–1700 BC
Jacob, Joseph & Egypt
Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती ३९:१९सुमारे इ.स.पू. १७१९
“तुमचा गुलाम माझ्याशी असा वागला.” असे म्हणून पत्नीने सांगितलेला वृतांत ऐकताच त्याचा धनी रागाने बेभान झाला.
- उत्पत्ती ३९:२०सुमारे इ.स.पू. १७१९
योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाच्या कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवीत, तिथे त्याने योसेफाला ठेवले, परंतु जेव्हा योसेफ तुरुंगात होता,
- उत्पत्ती ३९:२१सुमारे इ.स.पू. १७१९
याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले.
- उत्पत्ती ३९:२२सुमारे इ.स.पू. १७१९
तुरुंगाच्या अधिकार्याने तुरुंगाचा सर्व कारभार योसेफाच्या हाती दिला आणि सर्व कैदीही योसेफाच्या ताब्यात दिले.
- उत्पत्ती ३९:२३सुमारे इ.स.पू. १७१९
त्यानंतर तुरुंगाच्या अधिकार्याला कसलीच काळजी उरली नाही, कारण याहवेह योसेफाबरोबर होते आणि तो जे काही करत असे त्यामध्ये ते त्याला यश देत.
काही काळानंतर असे झाले की, इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार यांनी त्यांच्या धन्याच्या, म्हणजे इजिप्तच्या राजाविरुद्ध अपराध केला.
फारोह आपला रोटी भाजणारा प्रमुख व प्यालेबरदारचा प्रमुख या दोन्ही सरदारांवर रागावला
आणि त्याने त्या दोघांना सुरक्षादलाचा प्रमुख, याच्या वाड्यात म्हणजे जिथे योसेफ होता, त्याच वाड्यातील तुरुंगात टाकले.
तुरुंगाच्या अधिकार्याने योसेफाला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले आणि त्याने त्यांची देखरेख केली, काही काळ ते तुरुंगात राहिल्यानंतर,
- उत्पत्ती ४०:५सुमारे इ.स.पू. १७१७
एके रात्री दोघांनाही—इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार, ज्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते—स्वप्ने पडली आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशिष्ट अर्थ होता.
- उत्पत्ती ४०:६सुमारे इ.स.पू. १७१७
दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा योसेफ त्यांना भेटला, तेव्हा ते दोघेही खिन्न असल्याचे त्याच्या लक्षात आले.
- उत्पत्ती ४०:७सुमारे इ.स.पू. १७१७
योसेफाने त्याच्यासोबत त्याच्या धन्याच्या वाड्यात तुरुंगात असलेल्या त्या फारोहच्या अधिकार्यांना विचारले, “आज तुम्ही इतके खिन्न का आहात?”
- उत्पत्ती ४०:८सुमारे इ.स.पू. १७१७
त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.”
- उत्पत्ती ४०:९सुमारे इ.स.पू. १७१७
मुख्य प्यालेबरदारने आपले स्वप्न योसेफाला सांगितले. तो म्हणाला, “स्वप्नात मी एक द्राक्षवेल पाहिली.
- उत्पत्ती ४०:१०सुमारे इ.स.पू. १७१७
तिला तीन फांद्या होत्या. त्यांना कळ्या व फुले आली आणि लवकरच त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घोसही लागले.
- उत्पत्ती ४०:११सुमारे इ.स.पू. १७१७
माझ्या हातात फारोहचा प्याला होता, त्यात ती द्राक्षे पिळून मी रस काढला आणि तो प्याला फारोह राजाला प्यावयास दिला.”
- उत्पत्ती ४०:१२सुमारे इ.स.पू. १७१७
तेव्हा योसेफ म्हणाला, “या स्वप्नाचा अर्थ असा: तीन फांद्या म्हणजे तीन दिवस.
- उत्पत्ती ४०:१३सुमारे इ.स.पू. १७१७
या तीन दिवसात फारोह तुला तुरुंगातून सोडून देईल आणि तू स्वतः परत राजाच्या हाती प्याला देशील, जसा तू आधी प्यालेबरदार म्हणून देत होता.
- उत्पत्ती ४०:१४सुमारे इ.स.पू. १७१७
पण जेव्हा तुझ्याबरोबर सर्वकाही ठीक होईल, तेव्हा माझी आठवण ठेव आणि माझ्यावर कृपा दाखव, फारोहजवळ माझा उल्लेख कर आणि मला या तुरुंगातून बाहेर काढ.
- उत्पत्ती ४०:१५सुमारे इ.स.पू. १७१७
कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.”
- उत्पत्ती ४०:१६सुमारे इ.स.पू. १७१७
त्याच्या स्वप्नाचे उत्तर चांगले निघाले आहे हे पाहून, रोटी भाजणारा प्रमुख योसेफाला म्हणाला, “मला देखील एक स्वप्न पडले आहे: मला माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या दिसल्या.
- उत्पत्ती ४०:१७सुमारे इ.स.पू. १७१७
सर्वात वरच्या टोपलीमध्ये फारोहसाठी भटारखान्यातील सर्वप्रकारचे उत्कृष्ट प्रतीचे खाद्यपदार्थ होते; परंतु पक्षी येऊन माझ्या डोक्यावरील टोपलीतून ते पदार्थ खाऊ लागले.”
- उत्पत्ती ४०:१८सुमारे इ.स.पू. १७१७
योसेफाने अर्थ सांगताना म्हटले, “या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस होत.
- उत्पत्ती ४०:१९सुमारे इ.स.पू. १७१७
आजपासून तीन दिवसांनी फारोह तुझा शिरच्छेद करेल व तुझा मृतदेह सुळावर ठेवेल आणि पक्षी येऊन तुझे मांस टोचून खातील.”
- उत्पत्ती ४०:२०सुमारे इ.स.पू. १७१७
आता तिसर्या दिवशी फारोहचा वाढदिवस होता आणि त्याने आपल्या सर्व सरदारांसाठी मेजवानी दिली. त्याने आपल्या सरदारांसमोर मुख्य प्यालेबरदार आणि प्रमुख रोटी भाजणारा यांचे मस्तक उंचावले: