मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४०:२१सुमारे इ.स.पू. १७१७

    यावेळी त्याने मुख्य प्यालेबरदारला त्याच्या कामावर पुन्हा नेमले, तो फारोहच्या हाती पुन्हा प्याला देऊ लागला—

  2. उत्पत्ती ४०:२२सुमारे इ.स.पू. १७१७

    परंतु प्रमुख रोटी भाजणार्‍याला योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे सुळावर चढविण्याची शिक्षा दिली.

  3. उत्पत्ती ४०:२३सुमारे इ.स.पू. १७१७

    मुख्य प्यालेबरदाराला योसेफाचे स्मरण राहिले नाही; त्याला तो विसरला.

  4. उत्पत्ती ४१:१सुमारे इ.स.पू. १७१५

    दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एके रात्री फारोहला स्वप्न पडले. तो नाईल नदीच्या काठावर उभा होता.

  5. उत्पत्ती ४१:२सुमारे इ.स.पू. १७१५

    तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या.

  6. उत्पत्ती ४१:३सुमारे इ.स.पू. १७१५

    नंतर नाईलमधून दुसर्‍या सात गाई आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या आणि नदीकाठी असलेल्या गाईंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या.

  7. उत्पत्ती ४१:४सुमारे इ.स.पू. १७१५

    मग त्या सात दुबळ्या गाईंनी त्या धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. यावर फारोहची झोपमोड झाली.

  8. उत्पत्ती ४१:५सुमारे इ.स.पू. १७१५

    यानंतर तो पुन्हा झोपी गेला आणि त्याला पुन्हा दुसरे स्वप्न पडले: एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे त्याने पाहिली.

  9. उत्पत्ती ४१:६सुमारे इ.स.पू. १७१५

    मग आणखी सात कणसे उगवली, पण ही वाळून गेलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली होती.

  10. उत्पत्ती ४१:७सुमारे इ.स.पू. १७१५

    या सात अशक्त कणसांनी टपोर्‍या दाण्यांची ती भरदार कणसे गिळून टाकली. नंतर फारोह जागा झाला आणि हे सर्व स्वप्न होते हे त्याला समजले.

  11. उत्पत्ती ४१:८सुमारे इ.स.पू. १७१५

    दुसर्‍या दिवशी सकाळी, स्वप्नांचा विचार करता फारोह चिंताक्रांत झाला. मग त्याने इजिप्तमधील सर्व ज्योतिष्यांना व ज्ञानी पुरुषांना बोलाविले आणि त्यांना आपले स्वप्न सांगितले. परंतु त्यापैकी एकालाही त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल हे सांगता येईना.

  12. उत्पत्ती ४१:९सुमारे इ.स.पू. १७१५

    मुख्य प्यालेबरदार फारोहला म्हणाला, “आज मला माझ्या चुकीची आठवण होत आहे.

  13. उत्पत्ती ४१:१०सुमारे इ.स.पू. १७१५

    काही काळापूर्वी फारोह माझ्यावर आणि प्रमुख रोटी भाजणार्‍यावर रागावून त्यांनी आम्हाला सुरक्षादलाच्या अधिकार्‍याच्या घरातील बंदिवासात ठेवले होते.

  14. उत्पत्ती ४१:११सुमारे इ.स.पू. १७१५

    त्यावेळी प्रमुख रोटी भाजणार्‍याला आणि मला एकाच रात्री स्वप्ने पडली, दोन्ही स्वप्नांचा अर्थ वेगळा होता.

  15. उत्पत्ती ४१:१२सुमारे इ.स.पू. १७१५

    त्या ठिकाणी एक इब्री तरुण होता; तो सुरक्षादलाच्या अधिकार्‍याचा गुलाम होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली आणि त्याने आम्हाला आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार त्याच्या अर्थ सांगितला.

  16. उत्पत्ती ४१:१३सुमारे इ.स.पू. १७१५

    आणि त्याने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडली: प्यालेबरदाराच्या जागी माझी पुन्हा नेमणूक झाली आणि प्रमुख रोटी भाजणार्‍याला फाशी देण्यात आली.”

  17. उत्पत्ती ४१:१४सुमारे इ.स.पू. १७१५

    तेव्हा फारोहने योसेफाला बोलाविणे पाठविले. योसेफाला लगेच तुरुंगाच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले आणि योसेफ मुंडण करून व कपडे बदलून फारोहपुढे दाखल झाला.

  18. उत्पत्ती ४१:१५सुमारे इ.स.पू. १७१५

    फारोह योसेफास म्हणाला, “मला एक स्वप्न पडले, पण येथे असलेल्या कोणाही मनुष्याला त्याचा अर्थ काय असेल हे सांगता येत नाही. पण मी असे ऐकले आहे की तू स्वप्न ऐकताच, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो.”

  19. उत्पत्ती ४१:१६सुमारे इ.स.पू. १७१५

    योसेफाने उत्तर दिले, “मला स्वतःच्या बुद्धीने स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही, परंतु परमेश्वर फारोहला हितकारक उत्तर देतील.”

  20. उत्पत्ती ४१:१७सुमारे इ.स.पू. १७१५

    तेव्हा फारोहने योसेफाला सांगितले, “मी स्वप्नात नाईल नदीच्या काठावर उभा होतो;

  21. उत्पत्ती ४१:१८सुमारे इ.स.पू. १७१५

    तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या.

  22. उत्पत्ती ४१:१९सुमारे इ.स.पू. १७१५

    नंतर दुसर्‍या सात गाई वर आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या. सर्व इजिप्त देशात अशा अशक्त गाई मी कधीही पाहिल्या नाहीत.

  23. उत्पत्ती ४१:२०सुमारे इ.स.पू. १७१५

    या कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या पहिल्या सात धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले.

  24. उत्पत्ती ४१:२१सुमारे इ.स.पू. १७१५

    असे असूनही त्यांनी त्या सात धष्टपुष्ट गाई कशा खाल्ल्या हे समजू शकले नाही; पण धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकल्यानंतरही त्या अशक्त गाई अशक्तच राहिल्या आणि मग मी जागा झालो.

  25. उत्पत्ती ४१:२२सुमारे इ.स.पू. १७१५

    “मग मला परत स्वप्नात, एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे दिसली.