मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४१:२३सुमारे इ.स.पू. १७१५

    मग त्याच ताटातून सात वाळलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली कणसे निघाली.

  2. उत्पत्ती ४१:२४सुमारे इ.स.पू. १७१५

    या अशक्त कणसांनी ती भरदार कणसे गिळून टाकली. मी हे सर्व माझ्या ज्योतिष्यांना सांगितले, परंतु त्यातील एकालाही स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.”

  3. उत्पत्ती ४१:२५सुमारे इ.स.पू. १७१५

    स्वप्ने ऐकून योसेफ फारोहला म्हणाला, “फारोहला पडलेल्या या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. परमेश्वर काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रगट केले आहे.

  4. उत्पत्ती ४१:२६सुमारे इ.स.पू. १७१५

    या दोन्हीचा अर्थ एकच आहे, सात लठ्ठ गाई म्हणजे सात वर्षांचा काळ आणि सात भरदार कणसे यांचाही अर्थ पुढील सात वर्षांचा काळ; जो अतिशय समृद्धीचा असेल.

  5. उत्पत्ती ४१:२७सुमारे इ.स.पू. १७१५

    त्या सात अशक्त गाई म्हणजे या सात वर्षानंतर येणारी सात वर्षे आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली सात सुकलेली कणसे दुष्काळाची सात वर्षे दर्शवितात.

  6. उत्पत्ती ४१:२८सुमारे इ.स.पू. १७१५

    “मी फारोहला जे सांगितले आहे ते असे असेल: परमेश्वर लवकरच काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रकट केले आहे.

  7. उत्पत्ती ४१:२९सुमारे इ.स.पू. १७१५

    पुढील सात वर्षांचा काळ संपूर्ण इजिप्त देशासाठी अतिशय समृद्धीचा काळ असेल.

  8. उत्पत्ती ४१:३०सुमारे इ.स.पू. १७१५

    पण त्यानंतरच्या सात वर्षांच्या काळात इजिप्त देशामध्ये इतका मोठा दुष्काळ पडेल की, आधीच्या सात वर्षांतील सर्व समृद्धी आणि भरभराट विसरली जाईल. दुष्काळ देशाचा विध्वंस करेल.

  9. उत्पत्ती ४१:३१सुमारे इ.स.पू. १७१५

    तो इतका भयानक असेल की, आधीच्या समृद्धीची वर्षे आठवणार देखील नाहीत.

  10. उत्पत्ती ४१:३२सुमारे इ.स.पू. १७१५

    आता हे स्वप्न फारोहला दोन स्वरुपात पडले, याचा अर्थ असा की परमेश्वराने दुष्काळाची बाब निश्चित केली आहे आणि परमेश्वर त्याप्रमाणे लवकरच घडवून आणतील.

  11. उत्पत्ती ४१:३३सुमारे इ.स.पू. १७१५

    “म्हणून आता फारोहने एक सुज्ञ आणि शहाणा मनुष्य शोधला पाहिजे आणि त्याला इजिप्त देशावर अधिकारी केले पाहिजे.

  12. उत्पत्ती ४१:३४सुमारे इ.स.पू. १७१५

    फारोह राजाने इजिप्त देशावर अधिकार्‍यांची नेमणूक करून सात वर्षांच्या समृद्धीच्या काळात सर्व वरकड धान्याचा पाचवा भाग गोळा करावा.

  13. उत्पत्ती ४१:३५सुमारे इ.स.पू. १७१५

    समृद्धीच्या वर्षात अन्नसामुग्री एकत्र करून सर्व शहरात फारोहच्या अधिकारातील धान्य कोठारात साठविण्याचे व्यवस्थापन करावे.

  14. उत्पत्ती ४१:३६सुमारे इ.स.पू. १७१५

    ही सर्व अन्नसामुग्री राखीव म्हणून संपूर्ण देशाकरिता साठवून ठेवल्यास नंतर दुष्काळाची सात वर्षे इजिप्त देशावर आली म्हणजे खाण्यासाठी पुरेसे अन्नधान्य राहील, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.”

  15. उत्पत्ती ४१:३७सुमारे इ.स.पू. १७१५

    तेव्हा फारोह व त्याच्या अधिकार्‍यांना ही योजना योग्य वाटली.

  16. उत्पत्ती ४१:३८सुमारे इ.स.पू. १७१५

    फारोहने त्यांना विचारले, “परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला या माणसासारखा दुसरा कोणी सापडेल का?”

  17. उत्पत्ती ४१:३९सुमारे इ.स.पू. १७१५

    मग फारोह योसेफाला म्हणाला, “ज्याअर्थी परमेश्वराने तुला या स्वप्नांचा अर्थ प्रगट केला आहे, त्याअर्थी देशामध्ये तुझ्यासारखा चतुर आणि सुज्ञ मनुष्य कोणीच नाही.

  18. उत्पत्ती ४१:४०सुमारे इ.स.पू. १७१५

    म्हणून तू माझ्या महालाचा अधिकारी होशील आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होतील. केवळ सिंहासनासाठीच मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”

  19. उत्पत्ती ४१:४१सुमारे इ.स.पू. १७१५

    मग फारोह योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तुला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे.”

  20. उत्पत्ती ४१:४२सुमारे इ.स.पू. १७१५

    फारोहने आपली स्वतःची राजमुद्रा योसेफाच्या बोटात घातली. त्याला रेशमी तागाची वस्त्रे घातली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली.

  21. उत्पत्ती ४१:४३सुमारे इ.स.पू. १७१५

    फारोहने योसेफाला आपल्या खालोखालच्या पदाचा रथही दिला आणि योसेफ जिकडे जाई तिकडे ललकारी उठे, “गुडघे टेका.” अशाप्रकारे फारोहने योसेफाला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले.

  22. उत्पत्ती ४१:४४सुमारे इ.स.पू. १७१५

    फारोहने योसेफास म्हटले, “मी इजिप्त देशाचा राजा फारोह आहे, पण संपूर्ण इजिप्त देशभर तुझ्या परवानगीशिवाय कोणीही त्याचा हात किंवा पाय उचलणार नाही.”

  23. उत्पत्ती ४१:४५सुमारे इ.स.पू. १७१५

    फारोहने त्याला सापनाथ-पानेह हे नाव दिले, आणि त्याला ओन येथील पोटीफेरा याजकाची कन्या आसनथ ही पत्नी करून दिली. योसेफ संपूर्ण इजिप्त देशभर फिरला.

  24. उत्पत्ती ४१:४६सुमारे इ.स.पू. १७१५

    योसेफाने फारोह राजाच्या सेवेत प्रवेश केला, तेव्हा तो तीस वर्षाचा होता. नंतर राजधानी सोडून तो इजिप्त देशभर प्रवास करू लागला.

  25. उत्पत्ती ४१:४७सुमारे इ.स.पू. १७१५

    पुढील समृद्धीच्या सात वर्षात देशात चहूकडे भरघोस पीक आले.