मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४२:१६सुमारे इ.स.पू. १७०७

    तुमच्यापैकी एकाला भावास आणण्यास पाठवा; तोपर्यंत बाकीच्यांना तुरुंगात ठेवण्यात येईल, म्हणजे तुम्ही सत्य बोललात ते कळून येईल. जर नाही तर फारोहची शपथ तुम्ही हेर आहात!”

  2. उत्पत्ती ४२:१७सुमारे इ.स.पू. १७०७

    आणि त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात ठेवले.

  3. उत्पत्ती ४२:१८सुमारे इ.स.पू. १७०७

    तिसर्‍या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला, “जर जीवित राहवयाचे असेल तर तुम्ही हे करा, कारण मी परमेश्वराचे भय धरणारा आहे.

  4. उत्पत्ती ४२:१९सुमारे इ.स.पू. १७०७

    तुम्ही प्रामाणिक लोक आहात तर तुमच्या एका भावाला तुरुंगात राहू द्या, बाकीच्यांना कुटुंबीयांची उपासमार निवारण्यासाठी धान्य घेऊन जाऊ द्या.

  5. उत्पत्ती ४२:२०सुमारे इ.स.पू. १७०७

    परंतु तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या. अशा रीतीने तुमचे शब्द खरे होतील आणि तुमचा मृत्यू टळेल.” मग त्यांनी तेच केले.

  6. उत्पत्ती ४२:२१सुमारे इ.स.पू. १७०७

    ते एकमेकांना म्हणाले, “आम्ही आमच्या भावाविषयी दोषी आहोत. जेव्हा त्याने आपल्या जिवाची विनवणी केली तेव्हा तो किती व्यथित होता हे आम्ही पाहिले, पण आम्ही ऐकले नाही; त्यामुळेच हे संकट आमच्यावर आले आहे.”

  7. उत्पत्ती ४२:२२सुमारे इ.स.पू. १७०७

    रऊबेन म्हणाला, “त्या मुलाविरुद्ध असे पाप करू नका, हे मी तुम्हाला सांगत नव्हतो का? पण तुम्ही माझे ऐकले नाही! आम्हाला त्याच्या रक्तपाताचा हिशोब द्यावा लागेल.”

  8. उत्पत्ती ४२:२३सुमारे इ.स.पू. १७०७

    योसेफाला आपले बोलणे समजत असेल असे त्यांना वाटले नाही, कारण तो दुभाषी वापरत होता.

  9. उत्पत्ती ४२:२४सुमारे इ.स.पू. १७०७

    तो तिथून बाहेर पडला व रडू लागला, थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने शिमओनाची निवड करून त्याला त्यांच्या डोळ्यांसमक्ष बांधून घेतले.

  10. उत्पत्ती ४२:२५सुमारे इ.स.पू. १७०७

    नंतर योसेफाने आपल्या नोकरांना त्यांची पोती धान्याने भरण्यास सांगितले; पण त्याचवेळी त्याने प्रत्येक भावाने दिलेले पैसे ज्याच्या त्याच्या पोत्यात ठेवून द्यावे अशी सूचना दिली. त्याने आपल्या भावांना प्रवासासाठी अन्नसामुग्री देण्याचा आदेश दिला.

  11. उत्पत्ती ४२:२६सुमारे इ.स.पू. १७०७

    शेवटी त्यांनी धान्याची पोती गाढवांवर लादली आणि ते घरी जाण्यास निघाले.

  12. उत्पत्ती ४२:२७सुमारे इ.स.पू. १७०७

    परंतु ते रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले असताना त्यांच्यापैकी एकाने गाढवांना देण्यासाठी थोडे धान्य काढले. धान्य काढीत असताना आपले पैसे पोत्याच्या तोंडाशी असलेले त्याला दिसले.

  13. उत्पत्ती ४२:२८सुमारे इ.स.पू. १७०७

    तो आपल्या भावांना म्हणाला, “अरे हे काय? माझे पैसे माझ्या पोत्यातच आहेत!” ते सर्वजण भयभीत झाले. भयाने थरथर कापत ते एकमेकास म्हणाले, “परमेश्वराने आपल्याशी हे काय केले?”

  14. उत्पत्ती ४२:२९सुमारे इ.स.पू. १७०७

    कनान देशात ते आपले पिता याकोबाकडे आले आणि इजिप्तमध्ये जे काही घडले त्याची सर्व हकिकत त्यांनी त्याला सांगितली.

  15. उत्पत्ती ४२:३०सुमारे इ.स.पू. १७०७

    ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी अत्यंत कठोरतेने बोलला, त्याने आम्हाला हेर असल्यासारखे वागविले.”

  16. उत्पत्ती ४२:३१सुमारे इ.स.पू. १७०७

    आम्ही त्याला म्हटले, “आम्ही हेर नाहीत; आम्ही प्रामाणिक माणसे आहोत.

  17. उत्पत्ती ४२:३२सुमारे इ.स.पू. १७०७

    आम्ही बारा भाऊ असून एकाच पित्याचे पुत्र आहोत. आमचा एक भाऊ मरण पावला आहे, आणि धाकटा भाऊ कनान देशामध्ये आमच्याच पित्याजवळ राहिला आहे.”

  18. उत्पत्ती ४२:३३सुमारे इ.स.पू. १७०७

    तेव्हा त्या देशाचा अधिपती आम्हाला म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक माणसे आहात की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी मी असे ठरविले आहे: तुमच्यापैकी एका भावाला येथे तुरुंगात ठेवावे; बाकीच्यांनी तुमच्या कुटुंबीयांसाठी धान्य घेऊन घरी जावे.

  19. उत्पत्ती ४२:३४सुमारे इ.स.पू. १७०७

    पण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या; मगच तुम्ही हेर नाहीत, तर प्रामाणिक माणसे आहात हे मला समजेल. तर मी तुमचा भाऊ तुम्हाला परत देईन व तुम्ही या देशात व्यापार करू शकाल.”

  20. उत्पत्ती ४२:३५सुमारे इ.स.पू. १७०७

    त्यांनी त्यांची धान्याची पोती रिकामी केली तो, प्रत्येकाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांनी दिलेले पैसे होते असे त्यांना दिसून आले! भयाने त्यांचा व त्यांच्या वडिलांचाही थरकाप उडाला.

  21. उत्पत्ती ४२:३६सुमारे इ.स.पू. १७०७

    मग याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या मुलांना हिरावून घेतले आहे. योसेफ राहिला नाही, शिमओन गेला; आता तुम्ही बिन्यामीनालाही नेणार; सर्वकाही माझ्या विरुद्धच घडत आहे.”

  22. उत्पत्ती ४२:३७सुमारे इ.स.पू. १७०७

    तेव्हा रऊबेन आपल्या वडिलांस म्हणाला, “मी बिन्यामीनाला तुमच्याकडे परत आणले नाही तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका; बिन्यामीनाला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणेन.”

  23. उत्पत्ती ४२:३८सुमारे इ.स.पू. १७०७

    पण याकोबाने उत्तर दिले, “माझा मुलगा तुमच्याबरोबर तिथे जाणार नाही; त्याचा भाऊ योसेफ मरण पावला आणि आता तो एकटाच राहिला आहे; त्याला काही कमीजास्त झाले तर या म्हातारपणात दुःखाने माझा प्राण जाईल!”

  24. उत्पत्ती ४३:१सुमारे इ.स.पू. १७०७

    परंतु देशात दुष्काळ तीव्र होता.

  25. उत्पत्ती ४३:२सुमारे इ.स.पू. १७०७

    इजिप्तमधून त्यांनी आणलेले धान्य संपले तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये पुनः जाऊन आपल्यासाठी थोडे धान्य विकत आणा.”