- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1900–1700 BC
Jacob, Joseph & Egypt
Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती ४३:२८सुमारे इ.स.पू. १७०७
“होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला.
- उत्पत्ती ४३:२९सुमारे इ.स.पू. १७०७
त्याने आपली नजर वर करून आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ, बिन्यामीनाकडे पाहून त्याने विचारले, “हाच का तुमचा धाकटा भाऊ, याच्याचविषयी तुम्ही मला सांगत होता ना?” आणि तो म्हणाला, “माझ्या मुला, परमेश्वर तुजवर कृपा करो.”
- उत्पत्ती ४३:३०सुमारे इ.स.पू. १७०७
नंतर योसेफ घाईघाईने बाहेर जाऊन रडण्यासाठी जागा शोधत होता, कारण आपल्या भावाबद्दलच्या प्रेमाने त्याचा ऊर भरून आला होता, तो आपल्या स्वतःच्या खोलीत जाऊन रडला.
- उत्पत्ती ४३:३१सुमारे इ.स.पू. १७०७
मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि स्वतःवर ताबा ठेवून म्हणाला, “भोजन वाढा.”
- उत्पत्ती ४३:३२सुमारे इ.स.पू. १७०७
योसेफ एकटाच जेवला; आणि त्याच्या भावांना वेगळ्या पंक्तीत बसविले; त्याचप्रमाणे इजिप्त लोकांचीही वेगळीच पंगत होती, कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांना तुच्छ लेखीत आणि त्यांच्या पंक्तीला बसून कधीही भोजन करीत नसत.
- उत्पत्ती ४३:३३सुमारे इ.स.पू. १७०७
प्रत्येकाने कुठे बसावे हे त्याने सांगितले आणि त्यांना ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे बसविले, यावर फार आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले.
- उत्पत्ती ४३:३४सुमारे इ.स.पू. १७०७
योसेफ, जी पक्वान्ने खात होता, तीच पक्वान्ने त्यांनाही वाढण्यात आली. पण बिन्यामीनाला इतर भावांपेक्षा पाचपट अधिक वाढण्यात आले. ते सर्व त्याच्यासोबत भरपूर जेवले व मनमुरादपणे पिऊन तृप्त झाले.
- उत्पत्ती ४४:१सुमारे इ.स.पू. १७०७
आता योसेफाने आपल्या घरकारभार्यास आदेश दिला: “माणसांच्या पोत्यात त्यांना वाहून नेण्याइतके अन्न भरावे आणि प्रत्येक माणसाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांची चांदी ठेवावी.
- उत्पत्ती ४४:२सुमारे इ.स.पू. १७०७
याखेरीज धाकट्याच्या पोत्यामध्ये धान्याच्या पैशाबरोबरच माझा चांदीचा प्यालाही ठेवा.” असे सांगितले आणि घरकारभार्याने योसेफाच्या आदेशाप्रमाणे केले.
- उत्पत्ती ४४:३सुमारे इ.स.पू. १७०७
पहाट होताच त्या माणसांना त्यांच्या गाढवांसोबत मार्गस्थ करण्यात आले.
- उत्पत्ती ४४:४सुमारे इ.स.पू. १७०७
पण ते शहराच्या बाहेर पडतात न पडतात तोच योसेफ त्याच्या कारभार्यास म्हणाला, “त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना थांबवून विचारा, ‘तुम्ही चांगल्याची फेड वाईटाने का केली?
- उत्पत्ती ४४:५सुमारे इ.स.पू. १७०७
हाच तो चांदीचा प्याला नाही का जो माझे स्वामी स्वतः पिण्याकरिता वापरतात आणि ज्याच्यामधून ते शकुनही पाहत असतात? हे तुमचे कृत्य किती वाईट आहे!’ ”
- उत्पत्ती ४४:६सुमारे इ.स.पू. १७०७
त्याप्रमाणे त्याने त्यांना गाठले आणि सांगितल्याप्रमाणे तो त्यांना बोलला.
- उत्पत्ती ४४:७सुमारे इ.स.पू. १७०७
पण ते त्याला म्हणाले, “महाराज असे का बोलतात? तुमच्या सेवकांपासून असे काही करणे दूरच असो!
- उत्पत्ती ४४:८सुमारे इ.स.पू. १७०७
मागीलवेळी आमच्या पोत्यांच्या तोंडाशी असलेला पैसा आम्ही कनानहून परत आणला नाही काय? तर आता तुमच्या धन्याच्या घरून चांदी किंवा सोने चोरण्याची आम्हाला काय गरज होती?
- उत्पत्ती ४४:९सुमारे इ.स.पू. १७०७
आमच्यापैकी कोणाच्याही जवळ जर तो प्याला सापडला तर त्याला मृत्यू येवो; आणि आम्ही सर्वजण तुझ्या धन्याचे गुलाम होऊ.”
- उत्पत्ती ४४:१०सुमारे इ.स.पू. १७०७
त्या मनुष्याने उत्तर दिले, “ठीक आहे, तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे होईल; परंतु ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तोच माझ्या धन्याचा गुलाम होईल; बाकीचे दोषापासून मुक्त होतील.”
- उत्पत्ती ४४:११सुमारे इ.स.पू. १७०७
आपल्या पोती त्यांनी लगबगीने खाली जमिनीवर ठेऊन ती उघडली;
- उत्पत्ती ४४:१२सुमारे इ.स.पू. १७०७
त्या कारभार्याने वडील भावापासून आरंभ करून धाकट्या भावाच्या पोत्यापर्यंत शोध केला; आणि तो प्याला बिन्यामीनच्या पोत्यामध्ये सापडला.
- उत्पत्ती ४४:१३सुमारे इ.स.पू. १७०७
हताश होऊन त्यांनी आपले कपडे फाडले, आपल्या गाढवांवर पोती लादली आणि ते पुन्हा शहरात परतले.
- उत्पत्ती ४४:१४सुमारे इ.स.पू. १७०७
यहूदाह आणि त्याचे भाऊ आले, त्यावेळी योसेफ घरीच होता आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले.
- उत्पत्ती ४४:१५सुमारे इ.स.पू. १७०७
योसेफाने विचारले, “तुम्ही हे काय केले? माझ्यासारखा मनुष्य शकुन पाहून या गोष्टी जाणून घेऊ शकतो हे तुम्हाला माहिती नव्हते का?”
- उत्पत्ती ४४:१६सुमारे इ.स.पू. १७०७
यहूदाहने उत्तर दिले, “आमच्या स्वामीपुढे आम्ही काय बोलावे? आमची निर्दोषता आम्ही कशी सिद्ध करावी? परमेश्वराने तुमच्या दासांचे अपराध उघडे केले आहे. महाराज, आम्ही सर्वजण आणि ज्याच्या पोत्यात प्याला सापडला तो देखील तुमचे गुलाम आहोत.”
- उत्पत्ती ४४:१७सुमारे इ.स.पू. १७०७
योसेफ म्हणाला, “अशी गोष्ट माझ्याकडून कधीही न होवो! ज्या मनुष्याकडे माझा प्याला मिळाला, तोच माझा गुलाम होईल बाकीचे तुम्ही तुमच्या वडिलांकडे शांतीने परत जा.”
- उत्पत्ती ४४:१८सुमारे इ.स.पू. १७०७
तेव्हा यहूदाह पुढे सरसावून म्हणाला, “महाराज, तुमच्या सेवकाला क्षमा करा, मला एक शब्द बोलू द्या, क्षणभर माझे ऐकून घ्या. कृपया, आपल्या सेवकावर रागावू नका, कारण तुम्ही प्रत्यक्ष फारोहसमान आहात.