मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४४:१९सुमारे इ.स.पू. १७०७

    महाराज, तुमच्या सेवकांना तुम्ही विचारले होते की, तुम्हाला वडील आहेत का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का?

  2. उत्पत्ती ४४:२०सुमारे इ.स.पू. १७०७

    आणि आम्ही आमच्या प्रभूला उत्तर दिले की, ‘आम्हाला वृद्ध वडील आहेत आणि अशा वृद्धापकाळातच त्यांना एक पुत्र झाला. त्याचा भाऊ मरण पावला आहे आणि त्याच्या आईला झालेल्या पुत्रांपैकी तो एकटाच उरलेला आहे आणि त्याचे वडील त्याच्यावर खूप प्रीती करतात.’

  3. उत्पत्ती ४४:२१सुमारे इ.स.पू. १७०७

    “तेव्हा तुम्ही तुमच्या सेवकांना म्हणाले, ‘त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी त्याला पाहू शकेन.’

  4. उत्पत्ती ४४:२२सुमारे इ.स.पू. १७०७

    आणि आम्ही आमच्या महाराजास म्हणालो, ‘तो मुलगा आपल्या वडिलांना सोडू शकत नाही; जर त्याने वडिलांना सोडले तर त्याचे वडील मरतील.’

  5. उत्पत्ती ४४:२३सुमारे इ.स.पू. १७०७

    पण तुम्ही आपल्या सेवकांना सांगितले की, ‘जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासोबत आला नाही तर तुम्ही माझे मुख पाहू शकणार नाही.’

  6. उत्पत्ती ४४:२४सुमारे इ.स.पू. १७०७

    जेव्हा आम्ही परत तुमचा सेवक आमच्या पित्याकडे जाऊन पोहोचलो, आम्ही त्यांना महाराज काय म्हणाले ते सांगितले.

  7. उत्पत्ती ४४:२५सुमारे इ.स.पू. १७०७

    “आमच्या वडिलांनी म्हटले, ‘परत जा आणि थोडे धान्य विकत घेऊन या.’

  8. उत्पत्ती ४४:२६सुमारे इ.स.पू. १७०७

    परंतु आम्ही म्हणालो, ‘आम्ही खाली जाऊ शकत नाही, जर आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असला तरच आम्ही जाणार. आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असल्याशिवाय आम्ही त्या मनुष्याचे मुख पाहू शकणार नाही.’

  9. उत्पत्ती ४४:२७सुमारे इ.स.पू. १७०७

    “मग तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या पत्नीने माझ्या दोन पुत्रांना जन्म दिला.

  10. उत्पत्ती ४४:२८सुमारे इ.स.पू. १७०७

    त्यापैकी एक माझ्यापासून दूर गेला तेव्हा मी म्हणालो, “त्याला एखाद्या श्वापदाने फाडून त्याचे तुकडे केले असावेत,” त्यानंतर मी त्याला पहिले नाही.

  11. उत्पत्ती ४४:२९सुमारे इ.स.पू. १७०७

    जर यालाही तुम्ही माझ्यापासून घेऊन जाल आणि त्याच्यावरही संकट आले तर तुम्ही माझ्या पिकलेल्या केसाला दुःखाने कबरेत लोटण्यास कारणीभूत व्हाल.’

  12. उत्पत्ती ४४:३०सुमारे इ.स.पू. १७०७

    “आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो,

  13. उत्पत्ती ४४:३१सुमारे इ.स.पू. १७०७

    आणि मुलगा आमच्याबरोबर नाही असे जर त्यांनी पाहिले तर ते प्राण सोडतील आणि त्यांच्या पिकलेल्या केसांना दुःखात व कबरेत लोटण्यास आम्ही कारणीभूत होऊ.

  14. उत्पत्ती ४४:३२सुमारे इ.स.पू. १७०७

    तुमच्या सेवकाने आमच्या वडिलांना अभिवचन दिले आहे की, मुलाची मी काळजी घेईन. मी त्यांना सांगितले की, ‘मी जर त्याला परत आणले नाही तर त्याचा दोष माझ्या जीवनात सदैव माझ्या माथ्यावर राहील!’

  15. उत्पत्ती ४४:३३सुमारे इ.स.पू. १७०७

    “म्हणून महाराज, कृपा करा आणि त्या मुलाऐवजी मलाच येथे तुमचा गुलाम म्हणून राहू द्या आणि मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या.

  16. उत्पत्ती ४४:३४सुमारे इ.स.पू. १७०७

    कारण मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी माझ्या वडिलांकडे कसे जाऊ शकतो? माझ्या वडिलांना होणारे दुःख मला पाहवणार नाही.”

  17. उत्पत्ती ४५:१सुमारे इ.स.पू. १७०७

    आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, “सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!” योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले.

  18. उत्पत्ती ४५:२सुमारे इ.स.पू. १७०७

    मग तो इतक्या मोठमोठ्याने रडू लागला की, ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोहच्या घराण्यातील लोकांनीही ते ऐकले.

  19. उत्पत्ती ४५:३सुमारे इ.स.पू. १७०७

    तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे! माझे वडील अद्याप जिवंत आहेत काय?” परंतु त्याचे भाऊ इतके घाबरले होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेना.

  20. उत्पत्ती ४५:४सुमारे इ.स.पू. १७०७

    तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे!

  21. उत्पत्ती ४५:५सुमारे इ.स.पू. १७०७

    तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले.

  22. उत्पत्ती ४५:६सुमारे इ.स.पू. १७०७

    दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही.

  23. उत्पत्ती ४५:७सुमारे इ.स.पू. १७०७

    परंतु पृथ्वीवर जे उरले आहेत, त्या तुम्हाला वाचवण्यासाठी आणि मोठ्या मुक्तिद्वारे तुमचे जीवन सुरक्षित करण्यासाठी परमेश्वराने मला तुमच्या आधी इथे पाठवले आहे.

  24. उत्पत्ती ४५:८सुमारे इ.स.पू. १७०७

    “म्हणजे आता तुम्ही नव्हे तर खुद्द परमेश्वरानेच मला इकडे पाठविले. त्यांनीच मला फारोहचा सल्लागार, त्याच्या घराण्याचा व्यवस्थापक आणि संपूर्ण इजिप्त देशाचा अधिपती केले आहे.

  25. उत्पत्ती ४५:९सुमारे इ.स.पू. १७०७

    आता त्वरा करा आणि माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांना सांगा की, तुमचा पुत्र योसेफ असे म्हणतो: ‘परमेश्वराने मला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे, म्हणून आता क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडे येथे या.