मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४६:७सुमारे इ.स.पू. १७०६

    याप्रमाणे याकोबाने त्याचे पुत्र, नातवंडे आणि त्याच्या मुली आणि नातवंडांना—त्याची सर्व संतती इजिप्तमध्ये आणली.

  2. उत्पत्ती ४६:८सुमारे इ.स.पू. १७०६

    इजिप्तला गेलेल्या इस्राएलाच्या पुत्रांची (याकोब आणि त्याचे वंशज) ही नावे आहेत: रऊबेन हा याकोबाचा प्रथम जन्मलेला.

  3. उत्पत्ती ४६:९सुमारे इ.स.पू. १७०६

    रऊबेनाचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  4. उत्पत्ती ४६:१०सुमारे इ.स.पू. १७०६

    शिमओनाचे पुत्र: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.

  5. उत्पत्ती ४६:११सुमारे इ.स.पू. १७०६

    लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

  6. उत्पत्ती ४६:१२सुमारे इ.स.पू. १७०६

    यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.

  7. उत्पत्ती ४६:१३सुमारे इ.स.पू. १७०६

    इस्साखारचे पुत्र: तोला, पुवाह, योब व शिम्रोन.

  8. उत्पत्ती ४६:१४सुमारे इ.स.पू. १७०६

    जबुलूनाचे पुत्र: सेरेद, एलोन व याहलेल हे होते.

  9. उत्पत्ती ४६:१५सुमारे इ.स.पू. १७०६

    म्हणजे याकोब आणि लेआ यांची सर्व संतती मिळून तेहतीस होती. यातच त्यांना पद्दन-अराम येथे झालेली कन्या दीना हिचाही समावेश आहे.

  10. उत्पत्ती ४६:१६सुमारे इ.स.पू. १७०६

    गादाचे पुत्र: सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली.

  11. उत्पत्ती ४६:१७सुमारे इ.स.पू. १७०६

    आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह; त्यांची बहीण सेराह. बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल.

  12. उत्पत्ती ४६:१८सुमारे इ.स.पू. १७०६

    हे सोळाजण लाबानाने लेआला दासी म्हणून दिलेल्या जिल्पेपासून याकोबाला झाले.

  13. उत्पत्ती ४६:१९सुमारे इ.स.पू. १७०६

    याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र: योसेफ व बिन्यामीन.

  14. उत्पत्ती ४६:२०सुमारे इ.स.पू. १७०६

    योसेफाचे पुत्र मनश्शेह व एफ्राईम हे इजिप्तमध्ये ओन नगरचा याजक पोटीफेरा याची कन्या आसनथपासून जन्मले.

  15. उत्पत्ती ४६:२१सुमारे इ.स.पू. १७०६

    बिन्यामीनचे पुत्र: बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम व आर्द हे होते.

  16. उत्पत्ती ४६:२२सुमारे इ.स.पू. १७०६

    हे चौदाजण म्हणजे याकोब व राहेल यांची संतती होती.

  17. उत्पत्ती ४६:२३सुमारे इ.स.पू. १७०६

    दानचा पुत्र: हुशीम.

  18. उत्पत्ती ४६:२४सुमारे इ.स.पू. १७०६

    नफतालीचे पुत्र: याहसेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.

  19. उत्पत्ती ४६:२५सुमारे इ.स.पू. १७०६

    लाबानाने आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिलेली स्त्री बिल्हा हिच्यापासून याकोबाला सात पुत्र झाले.

  20. उत्पत्ती ४६:२६सुमारे इ.स.पू. १७०६

    याप्रमाणे याकोबाच्या पुत्राच्या स्त्रियांच्या व्यतिरिक्त इजिप्तमध्ये गेलेल्या त्याच्या संतानात एकूण सहासष्ट व्यक्ती होत्या.

  21. उत्पत्ती ४६:२७सुमारे इ.स.पू. १७०६

    योसेफाला इजिप्तमध्ये झालेल्या दोन पुत्रांचा यामध्ये समावेश केला तर इजिप्तमध्ये आलेल्या याकोबाच्या कुटुंबाचे एकूण सत्तरजण होते.

  22. उत्पत्ती ४६:२८सुमारे इ.स.पू. १७०६

    याकोबाने गोशेनला जाण्याचा मार्ग विचारण्याकरिता यहूदाहला त्यांच्या पुढे योसेफाकडे पाठविले. मग जेव्हा ते गोशेन प्रांतात पोहोचले,

  23. उत्पत्ती ४६:२९सुमारे इ.स.पू. १७०६

    योसेफाने आपला रथ तयार केला आणि आपला पिता इस्राएल यांना भेटण्याकरिता गोशेन प्रांतात गेला. भेट होताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते बराच वेळ रडले.

  24. उत्पत्ती ४६:३०सुमारे इ.स.पू. १७०६

    मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मला खुशाल मरण येवो, कारण तू जिवंत आहेस हे मी स्वतः पाहिले आहे.”

  25. उत्पत्ती ४६:३१सुमारे इ.स.पू. १७०६

    योसेफ आपल्या भावांना आणि पित्याच्या कुटुंबातील सर्वांना म्हणाला, “मी वर जाऊन फारोहला सांगेन की, ‘माझे भाऊ व माझ्या पित्याचे संपूर्ण कुटुंब कनान देशातून मजकडे आले आहेत.