मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४६:३२सुमारे इ.स.पू. १७०६

    मी त्याला सांगेन, हे मेंढपाळ आहेत; त्यांनी त्यांच्याबरोबर आपली शेरडेमेंढरे, गुरे व त्यांचे सर्वस्व आणले आहे.’

  2. उत्पत्ती ४६:३३सुमारे इ.स.पू. १७०६

    म्हणून फारोह जेव्हा तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुमचा व्यवसाय काय आहे?’

  3. उत्पत्ती ४६:३४सुमारे इ.स.पू. १७०६

    तेव्हा तुम्ही असे उत्तर द्यावे, ‘आमच्या वडीलांप्रमाणे तुझ्या सेवकांनी लहानपणापासून गुरे पाळली आहेत.’ म्हणजे तो तुम्हाला येथेच गोशेन प्रांतात राहू देईल, कारण इजिप्तमध्ये मेंढपाळांना तुच्छ मानले जाते.”

  4. योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.”

  5. त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना निवडले आणि फारोहपुढे उपस्थित केले.

  6. फारोहने त्यांना विचारले, “तुमचा व्यवसाय कोणता आहे?” त्यांनी फारोहला उत्तर दिले, “तुमचे सेवक आमच्या पूर्वजांप्रमाणेच मेंढपाळ आहोत.”

  7. ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.”

  8. फारोह योसेफाला म्हणाला, “तुझे वडील व भाऊ तुझ्याकडे आले आहेत,

  9. आणि संपूर्ण इजिप्त देश तुझ्यासमोर आहे; या देशातील उत्तम भागात तुझ्या पित्याला आणि भावांना राहण्यास दे. त्यांना गोशेन येथे राहू दे. आणि त्यांच्यापैकी कोणी विशेष क्षमता असणारे असतील तर त्यांच्यावर माझ्याही गुरांची जबाबदारी सोपवून दे.”

  10. मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला.

  11. फारोहने त्याला विचारले, “तुमचे किती वय आहे?”

  12. आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, “माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही.”

  13. नंतर याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला आणि त्याच्या उपस्थितीतून निघाला.

  14. याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली.

  15. योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले.

  16. उत्पत्ती ४७:१३सुमारे इ.स.पू. १७०४

    मात्र, दुष्काळ उग्र असल्याने संपूर्ण प्रदेशात अन्न नव्हते; दुष्काळामुळे इजिप्त आणि कनान दोन्ही देश कष्टमय झाले.

  17. उत्पत्ती ४७:१४सुमारे इ.स.पू. १७०४

    योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला.

  18. उत्पत्ती ४७:१५सुमारे इ.स.पू. १७०३

    जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?”

  19. उत्पत्ती ४७:१६सुमारे इ.स.पू. १७०३

    यावर योसेफाने उत्तर दिले, “तुमचे पैसे संपले आहेत, तर मग तुमची गुरे मला द्या आणि त्यांच्या मोबदल्यात मी तुम्हाला अन्नधान्य देतो.”

  20. उत्पत्ती ४७:१७सुमारे इ.स.पू. १७०३

    त्याप्रमाणे अन्नधान्यासाठी लोकांनी आपले सर्व घोडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि गाढवे योसेफाकडे आणली आणि त्याने त्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य दिले.

  21. उत्पत्ती ४७:१८सुमारे इ.स.पू. १७०२

    ते वर्ष संपल्यावर, पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “आम्ही धन्यापासून हे सत्य लपवू शकत नाही की आमचा पैसा संपला आणि आमची गुरे तुमची झाली आहेत आणि आता आमच्याजवळ आमच्या धन्यासाठी फक्त आमची शरीरे व आमच्या जमिनी राहिल्या आहेत.

  22. उत्पत्ती ४७:१९सुमारे इ.स.पू. १७०२

    आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का? आता आम्हाला आमच्या जमिनीसह विकत घ्या म्हणजे आम्ही फारोहचे गुलाम होऊ. अन्नासाठी आम्ही स्वतःचा विक्रय केला तरच आम्ही जगू आणि जमिनीही मोकळ्या राहणार नाहीत.”

  23. उत्पत्ती ४७:२०सुमारे इ.स.पू. १७०२

    याप्रमाणे योसेफाने इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहसाठी विकत घेतली. दुष्काळ महाभयंकर असल्यामुळे सर्व इजिप्त देशातील लोकांनी त्याला आपआपली शेते विकली आणि इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहची झाली,

  24. उत्पत्ती ४७:२१सुमारे इ.स.पू. १७०१

    तसेच योसेफाने इजिप्त देशातील एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतच्या शहरातील सर्व लोकांना गुलाम बनविले.

  25. उत्पत्ती ४७:२२सुमारे इ.स.पू. १७०१

    याजकांच्या जमिनी मात्र योसेफाने विकत घेतल्या नाहीत, कारण फारोहकडून त्यांना निर्धारित अन्नधान्य पुरविले जात असे आणि त्यामुळे त्यांनी जमिनी विकल्या नाही.