- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1900–1700 BC
Jacob, Joseph & Egypt
Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती ४८:१७सुमारे इ.स.पू. १६८९
त्याच्या पित्याने आपला उजवा हात एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवलेला पाहून योसेफ नाराज झाला आणि त्याने एफ्राईमच्या डोक्यावरील हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवावा म्हणून त्याने त्याच्या पित्याचा हात उचलला.
- उत्पत्ती ४८:१८सुमारे इ.स.पू. १६८९
योसेफ त्याला म्हणाला, “नाही बाबा, हा प्रथम जन्मलेला आहे; तुमचा उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवा.”
- उत्पत्ती ४८:१९सुमारे इ.स.पू. १६८९
परंतु त्याच्या वडिलांनी ते नाकारले आणि ते म्हणाले, “मला माहीत आहे, माझ्या मुला, मला माहीत आहे. त्याचीही कुळे होतील आणि तो देखील महान होईल, परंतु त्याचा धाकटा भाऊ त्याच्याहीपेक्षा थोर होईल आणि त्याचे लोक राष्ट्रांचे समुदाय बनतील.”
- उत्पत्ती ४८:२०सुमारे इ.स.पू. १६८९
त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत: ‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ” अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले.
- उत्पत्ती ४८:२१सुमारे इ.स.पू. १६८९
नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील.
- उत्पत्ती ४८:२२सुमारे इ.स.पू. १६८९
आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.”
- उत्पत्ती ४९:१सुमारे इ.स.पू. १६८९
नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन.
- उत्पत्ती ४९:२सुमारे इ.स.पू. १६८९
“एकत्र व्हा आणि माझे ऐका, अहो याकोबाच्या पुत्रांनो; तुमचा पिता इस्राएल याचे ऐका.
- उत्पत्ती ४९:३सुमारे इ.स.पू. १६८९
“रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.
- उत्पत्ती ४९:४सुमारे इ.स.पू. १६८९
तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.
- उत्पत्ती ४९:५सुमारे इ.स.पू. १६८९
“शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत, त्यांची तलवार ही अत्याचाराचे साधन आहे.
- उत्पत्ती ४९:६सुमारे इ.स.पू. १६८९
मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये, त्यांच्या मंडळीमध्ये मी सामील होऊ नये, कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांचा वध केला, आणि वाटेल तसे बैलांची धोंडशीर तोडली.
- उत्पत्ती ४९:७सुमारे इ.स.पू. १६८९
त्यांचा क्रोध शापित असो, आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे! मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन, आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन.
- उत्पत्ती ४९:८सुमारे इ.स.पू. १६८९
“हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.
- उत्पत्ती ४९:९सुमारे इ.स.पू. १६८९
यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस. माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो. सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो, सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?
- उत्पत्ती ४९:१०सुमारे इ.स.पू. १६८९
यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, ज्याचे जे आहे तो येईपर्यंत, राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.
- उत्पत्ती ४९:११सुमारे इ.स.पू. १६८९
तो आपले गाढव द्राक्षवेलीला, गाढवीचे शिंगरू उत्कृष्ट द्राक्षवेलीला बांधून ठेवणार आहे; आपला झगा द्राक्षारसात, आपली वस्त्रे द्राक्षाच्या रक्तात धुणार आहे.
- उत्पत्ती ४९:१२सुमारे इ.स.पू. १६८९
त्याचे नेत्र द्राक्षारसापेक्षा गर्द होतील, त्याचे दात दुधापेक्षाही पांढरे होतील.
- उत्पत्ती ४९:१३सुमारे इ.स.पू. १६८९
“जबुलून समुद्रकिनारी राहील आणि तो जहाजांचे बंदर होईल. त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल.
- उत्पत्ती ४९:१४सुमारे इ.स.पू. १६८९
“इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांमध्ये दबून बसला आहे.
- उत्पत्ती ४९:१५सुमारे इ.स.पू. १६८९
त्याची विश्रांतीची जागा किती रम्य आहे आणि तिकडचा प्रदेश किती आल्हाददायक आहे, हे पाहून तो आपल्या खांद्याला भार वाहण्यासाठी वाकवेल आणि मजुरीचा दास होऊन जाईल.
- उत्पत्ती ४९:१६सुमारे इ.स.पू. १६८९
“दान आपल्या लोकांना न्यायदान करेल, इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल.
- उत्पत्ती ४९:१७सुमारे इ.स.पू. १६८९
दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल, तो वाटेवरील विषारी सर्प बनेल, जो घोड्याच्या टापांचा चावा घेईल व घोडेस्वार खाली कोसळेल.
- उत्पत्ती ४९:१८सुमारे इ.स.पू. १६८९
“हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.
- उत्पत्ती ४९:१९सुमारे इ.स.पू. १६८९
“एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल, पण गाद त्यांच्या टाचेवर तडाखा देईल.