मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४९:२०सुमारे इ.स.पू. १६८९

    “आशेरला पौष्टिक अन्न मिळेल; आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल.

  2. उत्पत्ती ४९:२१सुमारे इ.स.पू. १६८९

    “नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे, त्याला सुंदर पाडसे होतील.

  3. उत्पत्ती ४९:२२सुमारे इ.स.पू. १६८९

    “योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्‍याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.

  4. उत्पत्ती ४९:२३सुमारे इ.स.पू. १६८९

    कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.

  5. उत्पत्ती ४९:२४सुमारे इ.स.पू. १६८९

    परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.

  6. उत्पत्ती ४९:२५सुमारे इ.स.पू. १६८९

    कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत, कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात, वरून स्वर्गातील आशीर्वाद, खोलातील डोहातून निघणार्‍या झर्‍यातील आशीर्वाद, स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.

  7. उत्पत्ती ४९:२६सुमारे इ.स.पू. १६८९

    तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.

  8. उत्पत्ती ४९:२७सुमारे इ.स.पू. १६८९

    “बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे; तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो, आणि संध्याकाळी लूट वाटतो.”

  9. उत्पत्ती ४९:२८सुमारे इ.स.पू. १६८९

    हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला.

  10. उत्पत्ती ४९:२९सुमारे इ.स.पू. १६८९

    नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या.

  11. उत्पत्ती ४९:३०सुमारे इ.स.पू. १६८९

    कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.

  12. उत्पत्ती ४९:३१सुमारे इ.स.पू. १६८९

    तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली.

  13. उत्पत्ती ४९:३२सुमारे इ.स.पू. १६८९

    ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.”

  14. उत्पत्ती ४९:३३सुमारे इ.स.पू. १६८९

    आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला.

  15. उत्पत्ती ५०:१सुमारे इ.स.पू. १६८९

    योसेफ आपल्या पित्याल्या आलिंगन देऊन खूप रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.

  16. उत्पत्ती ५०:२सुमारे इ.स.पू. १६८९

    नंतर योसेफाने वैद्यास त्याचा पिता इस्राएल याच्या मृतदेहात मसाला भरण्याची आज्ञा दिली. मग वैद्यांनी मृतदेहात सुगंधी द्रव्याचा मसाला भरला.

  17. उत्पत्ती ५०:३सुमारे इ.स.पू. १६८९

    मसाला भरण्याच्या क्रियेला चाळीस दिवस लागले, मृतदेहात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत. इजिप्तच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.

  18. उत्पत्ती ५०:४सुमारे इ.स.पू. १६८९

    शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर योसेफ फारोहच्या राजदरबारी गेला आणि म्हणाला, “जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुम्ही माझ्यावतीने फारोहशी बोलावे” अशी त्याने त्यांना विनंती केली.

  19. उत्पत्ती ५०:५सुमारे इ.स.पू. १६८९

    “माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली आणि म्हणाले, मी मरणार आहे; कनान देशात मी स्वतःसाठी खोदलेल्या थडग्यात मला मूठमाती दे. आता मला वर जाऊन माझ्या वडिलांना मूठमाती देऊ दे. मग मी परत येईन.”

  20. उत्पत्ती ५०:६सुमारे इ.स.पू. १६८९

    फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.”

  21. उत्पत्ती ५०:७सुमारे इ.स.पू. १६८९

    मग योसेफ आपल्या पित्याला पुरण्यास निघाला. फारोहचे सर्व अधिकारी त्याच्याबरोबर होते—त्याचे मान्यवर आणि इजिप्तचे सर्व प्रतिष्ठित—

  22. उत्पत्ती ५०:८सुमारे इ.स.पू. १६८९

    तसेच योसेफाचे पूर्ण कुटुंब म्हणजे त्याचे भाऊ आणि त्यांचे कुटुंब, या सर्वांसह गेला. परंतु त्यांनी त्यांची मुलेबाळे, गुरे, शेरडेमेंढरे गोशेन प्रांतातच मागे ठेवली.

  23. उत्पत्ती ५०:९सुमारे इ.स.पू. १६८९

    अशाप्रकारे योसेफाबरोबर रथ, घोडेस्वार गेले. तो मोठा समुदाय होता.

  24. उत्पत्ती ५०:१०सुमारे इ.स.पू. १६८९

    जेव्हा ते यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर यरीहोजवळ अटाद या ठिकाणी आले; तेव्हा त्यांनी तिथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाच्या वडिलांसाठी त्यांनी सात दिवस तिथे शोक केला.

  25. उत्पत्ती ५०:११सुमारे इ.स.पू. १६८९

    जेव्हा तिथे राहणाऱ्या कनानी लोकांनी अटादच्या खळ्यावर शोक करताना पाहिले, यार्देनजवळच्या त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव ठेवले. कारण ते म्हणाले, “इजिप्तच्या लोकांची ही मोठा शोक करण्याची जागा आहे.”