मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ४७:२३सुमारे इ.स.पू. १७०१

    मग योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोहसाठी तुम्हाला तुमच्या जमिनींसह विकत घेतले आहे. आता हे बियाणे घ्या आणि जमिनीत पेरा.

  2. उत्पत्ती ४७:२४सुमारे इ.स.पू. १७०१

    ज्यावेळी तुम्ही कापणी कराल. त्यावेळी तुमच्या उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोहला द्यावा. राहिलेले चार हिस्से पुढील वर्षाच्या बियाण्यांसाठी आणि तुम्हासाठी, तुमचे कुटुंब व मुलाबाळांच्या खाण्यासाठी ठेवा.”

  3. उत्पत्ती ४७:२५सुमारे इ.स.पू. १७०१

    लोक म्हणाले, “तुम्ही आमचे प्राण वाचविले आहेत, आमच्या धन्याच्या दृष्टीत आम्हाला दया प्राप्त होवो; आम्ही फारोहच्या गुलामगिरीत राहू.”

  4. उत्पत्ती ४७:२६सुमारे इ.स.पू. १७०१

    म्हणून योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी शिवाय इतर सर्व जमिनीतील पिकांचा पाचवा हिस्सा फारोहला देण्यात यावा, असा इजिप्त देशभर कायदा केला. हा कायदा आजवर चालू आहे.

  5. उत्पत्ती ४७:२७सुमारे इ.स.पू. १७०१

    अशा रीतीने इस्राएली इजिप्तच्या गोशेन प्रांतात राहू लागले, आणि त्यांनी तिथे जमीनजुमला संपादन केला व ते फलद्रूप होऊन संख्येने खूप वाढले.

  6. उत्पत्ती ४७:२८सुमारे इ.स.पू. १६८९

    इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती.

  7. उत्पत्ती ४७:२९सुमारे इ.स.पू. १६८९

    इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस,

  8. उत्पत्ती ४७:३०सुमारे इ.स.पू. १६८९

    परंतु जेव्हा मी माझ्या पूर्वजांसोबत झोपी जाईन, मला इजिप्तमधून बाहेर ने आणि त्यांना जिथे पुरले आहे, तिथे मला मूठमाती दे.” त्याने म्हटले, “तुम्ही जसे सांगितले आहे तसेच मी करेन.”

  9. उत्पत्ती ४७:३१सुमारे इ.स.पू. १६८९

    “मला शपथ दे.” त्याने म्हटले, मग योसेफाने त्याला शपथ दिली आणि मग इस्राएलने आपल्या काठीच्या टोकावर टेकून उपासना केली.

  10. उत्पत्ती ४८:१सुमारे इ.स.पू. १६८९

    काही दिवसानंतर योसेफाला कळविण्यात आले, “तुझे वडील आजारी आहेत.” तेव्हा तो मनश्शेह व एफ्राईम या आपल्या दोन पुत्रांना आपल्यासोबत घेऊन निघाला.

  11. उत्पत्ती ४८:२सुमारे इ.स.पू. १६८९

    जेव्हा याकोबाला सांगण्यात आले, “तुझा पुत्र योसेफ तुझ्याकडे आला आहे,” तेव्हा इस्राएल आपली सर्व शक्ती एकवटून उठून बिछान्यावर बसला.

  12. उत्पत्ती ४८:३सुमारे इ.स.पू. १६८९

    याकोब हा योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वराने मला कनान देशात लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला

  13. उत्पत्ती ४८:४सुमारे इ.स.पू. १६८९

    आणि मला म्हणाले, ‘मी तुला फलद्रूप करेन आणि तुझी संख्या वाढवेन. मी तुला लोकांचा समुदाय करेन आणि तुझ्यानंतर हा देश तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन.’

  14. उत्पत्ती ४८:५सुमारे इ.स.पू. १६८९

    “आता मी इजिप्तमध्ये तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला इजिप्तमध्ये झालेले दोन पुत्र माझेच गणले जातील; जसे रऊबेन व शिमओन तसेच एफ्राईम व मनश्शेह हेदेखील माझेच आहे.

  15. उत्पत्ती ४८:६सुमारे इ.स.पू. १६८९

    परंतु यानंतर तुला जी मुलेबाळे होतील ती तुझी होतील. त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल.

  16. उत्पत्ती ४८:७सुमारे इ.स.पू. १६८९

    मी पद्दन-अराम येथून परत येत होतो आणि कनान देशात एफ्राथपासून थोड्याच अंतरावर होतो, तेव्हा राहेलच्या मृत्यूचे दुःख माझ्यावर पडले आणि मी तिला एफ्राथ गावाच्या थोड्या अंतरावर पुरले” (म्हणजे बेथलेहेम).

  17. उत्पत्ती ४८:८सुमारे इ.स.पू. १६८९

    जेव्हा इस्राएलने योसेफाच्या पुत्रांना पाहिले, त्याने विचारले, “ही कोण आहेत?”

  18. उत्पत्ती ४८:९सुमारे इ.स.पू. १६८९

    योसेफाने त्याच्या पित्याला म्हटले, “परमेश्वराने मला इथे दिलेले हे माझे पुत्र आहेत.” इस्राएल त्याला म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण आणि म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

  19. उत्पत्ती ४८:१०सुमारे इ.स.पू. १६८९

    इस्राएलाची दृष्टी म्हातारपणामुळे अशक्त झाली होती, त्यामुळे तो नीट पाहू शकत नव्हता, म्हणून योसेफाने त्यांना त्याच्याजवळ आणले आणि त्याच्या पित्याने त्यांचे चुंबन घेतले व त्यांना कवटाळले.

  20. उत्पत्ती ४८:११सुमारे इ.स.पू. १६८९

    इस्राएल योसेफाला म्हणाला, “मी तुला परत पाहीन असे मला कधीच वाटले नव्हते, पण परमेश्वराने मला तुझे पुत्रही पाहू दिलेत.”

  21. उत्पत्ती ४८:१२सुमारे इ.स.पू. १६८९

    नंतर योसेफाने त्यांना इस्राएलाच्या मांडीवरून बाजूला केले आणि जमिनीपर्यंत लवून मुजरा केला.

  22. उत्पत्ती ४८:१३सुमारे इ.स.पू. १६८९

    मग योसेफाने दोघांना घेतले आणि एफ्राईमला योसेफाच्या उजव्या व इस्राएलाच्या डाव्या हातास आणि मनश्शेहला योसेफाच्या डाव्या आणि इस्राएलाच्या उजव्या हातास असे त्याच्याजवळ नेले.

  23. उत्पत्ती ४८:१४सुमारे इ.स.पू. १६८९

    परंतु इस्राएलने त्याचा उजवा हात पुढे केला आणि तो एफ्राईमच्या डोक्यावर ठेवला, जरी तो धाकटा होता आणि हात ओलांडून त्याने आपला डावा हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवला, जरी मनश्शेह प्रथम जन्मलेला होता.

  24. उत्पत्ती ४८:१५सुमारे इ.स.पू. १६८९

    नंतर त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या परमेश्वरापुढे माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक विश्वासाने चालले, तेच परमेश्वर आजपर्यंत माझ्या जीवनाचे मेंढपाळ राहिले आहे,

  25. उत्पत्ती ४८:१६सुमारे इ.स.पू. १६८९

    ज्या परमेश्वराच्या दूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, ते या मुलांना आशीर्वादित करोत. माझे आणि माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक यांचे नाव या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो, त्यांना पुष्कळ मुलेबाळे व गोत्र लाभोत.”