मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ३६:३सुमारे इ.स.पू. १७९६

    आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ.

  2. उत्पत्ती ३६:४सुमारे इ.स.पू. १७९६

    एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला.

  3. उत्पत्ती ३६:५सुमारे इ.स.पू. १७९६

    एसावापासून ओहोलीबामाहला यऊश, यालाम व कोरह या नावांचे पुत्र झाले. एसावाला हे सर्व पुत्र कनान देशात झाले.

  4. उत्पत्ती ३६:६सुमारे इ.स.पू. १७४०

    मग एसाव आपल्या स्त्रिया, मुलेबाळे, आपल्या घरची सर्व नोकरमंडळी, आपली गुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळविलेली धनसंपत्ती घेऊन याकोबापासून दूर निघून तिथे वस्ती करून राहिला.

  5. उत्पत्ती ३६:७सुमारे इ.स.पू. १७४०

    कारण त्या दोघांकडे इतकी अधिक धनसंपत्ती होती की त्यांच्या गुरांना पुरतील इतकी कुरणे तिथे नव्हती.

  6. उत्पत्ती ३६:८सुमारे इ.स.पू. १७४०

    म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली.

  7. उत्पत्ती ३६:९सुमारे इ.स.पू. १७४०

    सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी.

  8. उत्पत्ती ३६:१०सुमारे इ.स.पू. १७७४

    एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल.

  9. उत्पत्ती ३६:११सुमारे इ.स.पू. १७३४

    एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते.

  10. उत्पत्ती ३६:१२सुमारे इ.स.पू. १७३४

    एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.

  11. उत्पत्ती ३६:१३सुमारे इ.स.पू. १७३४

    रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.

  12. उत्पत्ती ३६:१४सुमारे इ.स.पू. १७१२

    एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले.

  13. उत्पत्ती ३६:१५सुमारे इ.स.पू. १७१२

    एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,

  14. उत्पत्ती ३६:१६सुमारे इ.स.पू. १७१२

    कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.

  15. उत्पत्ती ३६:१७सुमारे इ.स.पू. १७१२

    एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.

  16. उत्पत्ती ३६:१८सुमारे इ.स.पू. १७१२

    एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून: यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले.

  17. उत्पत्ती ३६:१९सुमारे इ.स.पू. १७१२

    हे एसावाचे (अर्थात् एदोमाचे) पुत्र, जे त्यांच्या कुळाचे पुढारी होते.

  18. उत्पत्ती ३६:२०सुमारे इ.स.पू. १८०६

    एदोम देशातील रहिवासी, सेईर होरी याच्या पुत्रांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह,

  19. उत्पत्ती ३६:२१सुमारे इ.स.पू. १८००

    दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले.

  20. उत्पत्ती ३६:२२सुमारे इ.स.पू. १७५६

    लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती.

  21. उत्पत्ती ३६:२३सुमारे इ.स.पू. १७५६

    शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफो व ओनाम.

  22. उत्पत्ती ३६:२४सुमारे इ.स.पू. १७५६

    सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)

  23. उत्पत्ती ३६:२५सुमारे इ.स.पू. १७५६

    अनाहचा पुत्र: दिशोन असून त्याची कन्या ओहोलीबामाह ही होती.

  24. उत्पत्ती ३६:२६सुमारे इ.स.पू. १७५६

    दिशोनाचे पुत्र: हेमदान, एश्बान, इथरान व करान.

  25. उत्पत्ती ३६:२७सुमारे इ.स.पू. १७५६

    एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व आकान.