मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ३४:१३सुमारे इ.स.पू. १७३२

    आपली बहीण दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले म्हणून याकोबाच्या पुत्रांनी शेखेम आणि त्याचा पिता हमोर यांच्याशी मनात कपट धरून बोलणी केली.

  2. उत्पत्ती ३४:१४सुमारे इ.स.पू. १७३२

    ते म्हणाले, “आमची बहीण शेखेमाला देणे आम्हाला जमणार नाही, कारण तुमची सुंता झालेली नाही. अशा बेसुंती मनुष्याबरोबर विवाह केल्यास आमचा अपमान होईल.

  3. उत्पत्ती ३४:१५सुमारे इ.स.पू. १७३२

    आता आपण एक करार करू: जर तुमच्या देशातील प्रत्येक पुरुष आपली सुंता करून घेईल,

  4. उत्पत्ती ३४:१६सुमारे इ.स.पू. १७३२

    तर तुमच्या मुली आम्ही करू व आमच्या मुली तुम्हाला देऊ व आम्ही तुमच्यामध्ये स्थायिक होऊ आणि तुमच्याबरोबर एक लोक होऊ.

  5. उत्पत्ती ३४:१७सुमारे इ.स.पू. १७३२

    जर तुम्ही सुंता करण्यास तयार होणार नाही तर आम्ही तिला आमच्याबरोबर घेऊन आमची वाट धरू.”

  6. उत्पत्ती ३४:१८सुमारे इ.स.पू. १७३२

    त्यांचा प्रस्ताव हमोर आणि त्याचा मुलगा शेखेम यांना चांगला वाटला.

  7. उत्पत्ती ३४:१९सुमारे इ.स.पू. १७३२

    तो तरुण, जो त्याच्या वडिलांच्या घराण्यात सर्वात आदरणीय होता, त्याने जे सांगितले ते करण्यात वेळ घालविला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे खूप मन बसले होते.

  8. उत्पत्ती ३४:२०सुमारे इ.स.पू. १७३२

    म्हणून हमोर आणि शेखेम यांनी त्या शहरातील वेशीकडे जाऊन लोकांपुढे सुंतेची ही सूचना मांडली.

  9. उत्पत्ती ३४:२१सुमारे इ.स.पू. १७३२

    ते म्हणाले, “हे लोक आपले मित्र आहेत. त्यांना आपण आपल्यात राहण्याचे आमंत्रण देऊ आणि व्यापार करण्यास परवानगी देऊ; कारण आपला देश त्यांनाही पुरेल इतका मोठा असून त्यांना येथे सहज राहता येईल आणि त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.

  10. उत्पत्ती ३४:२२सुमारे इ.स.पू. १७३२

    परंतु ते लोक आपल्यात राहून राष्ट्राशी एकरूप होण्यास एकाच अटीवर तयार आहेत. ती अट म्हणजे आपल्यातील प्रत्येक पुरुषाने त्यांच्याप्रमाणेच स्वतःची सुंता करून घेतली पाहिजे.

  11. उत्पत्ती ३४:२३सुमारे इ.स.पू. १७३२

    तेव्हा त्यांची ही अट आपण मान्य करू या, म्हणजे ते आपल्यामध्ये वस्ती करतील. आपण हे केले तर त्यांची शेरडेमेंढरे, गुरे व मालमत्ता ते सर्व आपले होणार नाही का?”

  12. उत्पत्ती ३४:२४सुमारे इ.स.पू. १७३२

    हमोर आणि शेखेम यांच्या या गोष्टीला सर्व पुरुषांनी मान्यता दिली. ते त्या नगराच्या वेशीबाहेर आले आणि त्या सर्वांची सुंता करण्यात आली.

  13. उत्पत्ती ३४:२५सुमारे इ.स.पू. १७३२

    परंतु तीन दिवसानंतर, त्यांच्या जखमांमुळे ते वेदनेत असताना, याकोबाच्या पुत्रांपैकी दीनाचे दोन भाऊ शिमओन व लेवी, यांनी आपल्या हाती तलवारी घेतल्या, ते बेसावध असलेल्या शहरात शिरले आणि त्यांनी तेथील प्रत्येक पुरुषाची कत्तल केली.

  14. उत्पत्ती ३४:२६सुमारे इ.स.पू. १७३२

    हमोर आणि शेखेम यांचीही त्यांनी तलवारीने कत्तल केली. त्यांनी दीनाची शेखेमाच्या घरातून सुटका केली आणि तिला घेऊन ते परत आले.

  15. उत्पत्ती ३४:२७सुमारे इ.स.पू. १७३२

    यानंतर याकोबाचे सर्व पुत्र शहरात गेले आणि त्यांनी ते संपूर्ण शहर लुटले, जिथे त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते.

  16. उत्पत्ती ३४:२८सुमारे इ.स.पू. १७३२

    त्यांनी त्यांचे कळप, गुरे, गाढवे आणि त्यांच्या नगरात व शेतात असलेले सर्वकाही त्यांनी नेले.

  17. उत्पत्ती ३४:२९सुमारे इ.स.पू. १७३२

    तसेच त्यांच्या घरातील सर्व संपत्ती आणि त्यांच्या सर्व स्त्रिया व लेकरे, त्यांना जे काही घरात सापडले ते सर्व त्यांनी लुटले.

  18. उत्पत्ती ३४:३०सुमारे इ.स.पू. १७३२

    तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.”

  19. उत्पत्ती ३४:३१सुमारे इ.स.पू. १७३२

    यावर त्यांनी प्रत्युत्तर केले, “त्याने आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे व्यवहार करावा काय?”

  20. मग परमेश्वराने याकोबाला म्हटले, “ऊठ आणि बेथेलला जाऊन तिथेच स्थायिक हो. तुझा भाऊ एसाव, याच्यापासून तू पळून जात असता, ज्या परमेश्वराने तुला दर्शन दिले होते, तिथे त्याच परमेश्वरासाठी एक वेदी बांध.”

  21. म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला.

  22. चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.”

  23. तेव्हा त्या सर्वांनी आपल्याकडील इतर दैवताच्या मूर्ती व कर्णफुले याकोबाला दिली व त्याने ती शेखेमजवळ असलेल्या एका एला वृक्षाखाली पुरून टाकली.

  24. मग ते पुन्हा पुढे निघाले आणि त्यांच्याभोवती असलेल्या सर्व नगरांवर परमेश्वराचे भय पडले, त्यामुळे त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही.

  25. शेवटी याकोब आणि त्याच्यासोबतचे सर्व लोक कनान देशातील लूज (याला बेथेल असेही नाव होते) येथे येऊन पोहोचले.