मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ३२:१५सुमारे इ.स.पू. १७३९

    तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली.

  2. उत्पत्ती ३२:१६सुमारे इ.स.पू. १७३९

    प्रत्येक जातीच्या जनावरांचे वेगवेगळे कळप करून त्यांना नोकरांकडे सुपूर्द करून सूचना दिली, “माझ्यापुढे चला आणि प्रत्येक कळपामध्ये काही अंतर ठेवा.”

  3. उत्पत्ती ३२:१७सुमारे इ.स.पू. १७३९

    पहिला कळप नेणार्‍या नोकराला त्याने सांगितले: “जेव्हा माझा भाऊ एसाव तुम्हाला भेटेल आणि त्याने विचारले, ‘तुम्ही कोणाचे चाकर आहात, तुम्ही कुठे चालला आहात, ही जनावरे जी तुझ्यापुढे आहे ती कोणाची आहेत?’

  4. उत्पत्ती ३२:१८सुमारे इ.स.पू. १७३९

    त्याला उत्तर द्या, ‘ही जनावरे तुमचा सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला धनी एसावच्या भेटीदाखल पाठविली आहेत. तो स्वतः आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ”

  5. उत्पत्ती ३२:१९सुमारे इ.स.पू. १७३९

    याकोबाने दुसर्‍या, तिसर्‍या आणि इतर कळप हाकणार्‍याला सूचना दिली: “एसाव जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्हीही हाच निरोप दिला पाहिजे.

  6. उत्पत्ती ३२:२०सुमारे इ.स.पू. १७३९

    हे निश्चित बोला, ‘आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’ ” कारण त्याने विचार केला, “मी एसावाला समोरासमोर भेटण्यापूर्वी त्याला भेटी देऊन संतुष्ट करेन; मग तो जेव्हा मला भेटेल, तेव्हा तो माझा स्वीकार करेल.”

  7. उत्पत्ती ३२:२१सुमारे इ.स.पू. १७३९

    म्हणूनच आपल्यापुढे भेटी पाठवली आणि याकोबाने ती रात्र तळावरच घालविली.

  8. उत्पत्ती ३२:२२सुमारे इ.स.पू. १७३९

    परंतु त्या रात्रीच याकोब उठला आणि त्याने त्याच्या दोन्ही पत्नी व उपपत्नी आणि अकरा मुले यांना जागे केले आणि यार्देन नदीच्या किनार्‍याने त्यांना यब्बोक नदीच्या उताराने पार नेले

  9. उत्पत्ती ३२:२३सुमारे इ.स.पू. १७३९

    त्याने त्यांना नदीच्या पलीकडे पाठविल्यावर त्याची सर्व संपत्तीही त्यांच्या पाठोपाठ पलीकडे पाठविली.

  10. उत्पत्ती ३२:२४सुमारे इ.स.पू. १७३९

    तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली.

  11. उत्पत्ती ३२:२५सुमारे इ.स.पू. १७३९

    याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला.

  12. उत्पत्ती ३२:२६सुमारे इ.स.पू. १७३९

    मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.” पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.”

  13. उत्पत्ती ३२:२७सुमारे इ.स.पू. १७३९

    मग त्याने याकोबास विचारले, “तुझे नाव काय आहे?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “याकोब.”

  14. उत्पत्ती ३२:२८सुमारे इ.स.पू. १७३९

    यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”

  15. उत्पत्ती ३२:२९सुमारे इ.स.पू. १७३९

    मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया आपले नाव मला सांगा.” तेव्हा तो म्हणाला, “तू मला माझे नाव का विचारतोस?” मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.

  16. उत्पत्ती ३२:३०सुमारे इ.स.पू. १७३९

    मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल असे ठेवले, कारण तो म्हणाला, “मी परमेश्वराचे मुख पाहिले आणि तरीही मी जिवंत राहिलो.”

  17. उत्पत्ती ३२:३१सुमारे इ.स.पू. १७३९

    जेव्हा याकोब पेनुएल मधून निघाला त्यावेळी सूर्य उगवला होता आणि त्याच्या जांघेचा सांधा उखडल्यामुळे तो लंगडत होता.

  18. उत्पत्ती ३२:३२सुमारे इ.स.पू. १७३९

    याच कारणास्तव इस्राएलचे लोक अजूनही जनावरांच्या जांघेतील धोंडशिरा खात नाहीत, कारण त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायुला स्पर्श केला होता.

  19. उत्पत्ती ३३:१सुमारे इ.स.पू. १७३९

    नंतर दूर अंतरावरून एसाव आपल्या चारशे माणसांबरोबर येत आहे असे याकोबाने पाहिले, तेव्हा त्याने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली.

  20. उत्पत्ती ३३:२सुमारे इ.स.पू. १७३९

    सर्वात पुढे त्याने आपल्या दासी आणि त्यांची मुले; त्यांच्यामागे लेआ व तिची मुले आणि त्यांच्यानंतर राहेल व योसेफ अशा रीतीने त्यांना ठेवले.

  21. उत्पत्ती ३३:३सुमारे इ.स.पू. १७३९

    तो स्वतः सर्वांच्या पुढे चालला आणि आपल्या भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने त्याला भूमीपर्यंत लवून सात वेळा मुजरा केला.

  22. उत्पत्ती ३३:४सुमारे इ.स.पू. १७३९

    एसाव हा याकोबास भेटण्यास धावत आला; त्याने त्याला आलिंगन दिले; त्याला कवेत घेऊन त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले.

  23. उत्पत्ती ३३:५सुमारे इ.स.पू. १७३९

    एसावाने दृष्टी वर करून त्या स्त्रिया व मुलांकडे पाहिले तेव्हा त्याने विचारले, “तुजबरोबर हे लोक कोण आहेत?” याकोब म्हणाला, “परमेश्वराने कृपा करून तुमच्या दासाला दिलेली ही माझी मुले आहेत.”

  24. उत्पत्ती ३३:६सुमारे इ.स.पू. १७३९

    तेव्हा याकोबाच्या दासी आणि त्यांची मुले पुढे आली आणि त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला.

  25. उत्पत्ती ३३:७सुमारे इ.स.पू. १७३९

    त्यानंतर लेआ व तिची मुले आली, शेवटी राहेल आणि योसेफ पुढे आली. त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला.