मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ३१:४५सुमारे इ.स.पू. १७३९

    तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला;

  2. उत्पत्ती ३१:४६सुमारे इ.स.पू. १७३९

    आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले.

  3. उत्पत्ती ३१:४७सुमारे इ.स.पू. १७३९

    मग त्या राशीला लाबानाच्या भाषेत यगर-सहदूथा आणि याकोबाच्या भाषेत गलेद असे नाव दिले.

  4. उत्पत्ती ३१:४८सुमारे इ.स.पू. १७३९

    लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात.

  5. उत्पत्ती ३१:४९सुमारे इ.स.पू. १७३९

    यावरून तिला मिस्पाह असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.”

  6. उत्पत्ती ३१:५०सुमारे इ.स.पू. १७३९

    तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.”

  7. उत्पत्ती ३१:५१सुमारे इ.स.पू. १७३९

    लाबान आणखी याकोबास म्हणाला, “ही रास आणि हा स्तंभ तुझ्या व माझ्या दरम्यान ठेवला आहे.

  8. उत्पत्ती ३१:५२सुमारे इ.स.पू. १७३९

    हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे.

  9. उत्पत्ती ३१:५३सुमारे इ.स.पू. १७३९

    अब्राहामाचे परमेश्वर आणि नाहोराचे परमेश्वर आणि त्याच्या पित्याचे परमेश्वर, आमच्यामध्ये न्याय करोत.” मग याकोबाने त्याचे वडील इसहाकाला ज्यांचे भय होते त्यांच्या नावाने शपथ घेतली.

  10. उत्पत्ती ३१:५४सुमारे इ.स.पू. १७३९

    नंतर याकोबाने डोंगराच्या माथ्यावर परमेश्वराला एक अर्पण वाहिले. त्याने आपल्या सर्व नातलगांना मेजवानीस बोलाविले आणि त्यांनी भोजन करून ती सर्व रात्र त्या डोंगरावर घालविली.

  11. उत्पत्ती ३१:५५सुमारे इ.स.पू. १७३९

    लाबान दुसर्‍या दिवशी सकाळीच उठला व त्याने आपल्या कन्यांची व नातवंडांची चुंबने घेतली, त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो घरी परत गेला.

  12. उत्पत्ती ३२:१सुमारे इ.स.पू. १७३९

    याकोब आपल्या वाटेने जात असता परमेश्वराचा दूत त्यास भेटले.

  13. उत्पत्ती ३२:२सुमारे इ.स.पू. १७३९

    जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेवले.

  14. उत्पत्ती ३२:३सुमारे इ.स.पू. १७३९

    याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले;

  15. उत्पत्ती ३२:४सुमारे इ.स.पू. १७३९

    आणि त्याने दूतांना आज्ञा दिली की, तुम्ही माझा धनी एसाव याला जाऊन सांगा: “तुमचा सेवक याकोब म्हणतो, मी आतापर्यंत आपले मामा लाबान यांच्याकडे राहत होतो.

  16. उत्पत्ती ३२:५सुमारे इ.स.पू. १७३९

    आता मी गुरे, गाढवे, मेंढरे, पुष्कळ स्त्रीपुरुष चाकर यांचा धनी झालो आहे. मी हा निरोप तुमच्याकडे पाठवित आहे कि तुमची कृपादृष्टी माझ्यावर होऊ द्यावी.”

  17. उत्पत्ती ३२:६सुमारे इ.स.पू. १७३९

    निरोप्यांनी परत येऊन याकोबास सांगितले की, “आपला भाऊ एसाव चारशे लोक बरोबर घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे.”

  18. उत्पत्ती ३२:७सुमारे इ.स.पू. १७३९

    हे ऐकताच याकोबाने भीतीने व व्याकूळ होऊन आपले कुटुंबीय, गुरे, शेरडेमेंढरे आणि उंट यांची दोन गटांमध्ये विभागणी केली.

  19. उत्पत्ती ३२:८सुमारे इ.स.पू. १७३९

    त्याने विचार केला, “एसावाने एका गटावर हल्ला केला तर दुसर्‍या गटाला कदाचित निसटून जाता येईल.”

  20. उत्पत्ती ३२:९सुमारे इ.स.पू. १७३९

    मग याकोबाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझे पिता अब्राहाम, आणि माझे पिता इसहाक यांच्या परमेश्वरा, तुम्ही मला माझ्या देशात आणि नातलगात परत येण्यास सांगितले व मला समृद्ध करण्याचे वचन दिले आहे.

  21. उत्पत्ती ३२:१०सुमारे इ.स.पू. १७३९

    तुम्ही मला वचन दिल्याप्रमाणे जी वात्सल्य आणि विश्वसनीयता वारंवार दाखविलीस तिला वास्तविक मी पात्र नाही; मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय दुसरे काहीही नव्हते आणि आता माझे दोन गट झाले आहेत.

  22. उत्पत्ती ३२:११सुमारे इ.स.पू. १७३९

    तुम्ही माझी विनंती ऐकून, माझा भाऊ एसावच्या हातून मला वाचवा, मला त्याची भीती वाटते की तो येऊन मला आणि त्यांच्या आईसह मुलांनाही मारून टाकेल.

  23. उत्पत्ती ३२:१२सुमारे इ.स.पू. १७३९

    परंतु तुम्ही मला समृद्ध करण्याचे आणि माझे वंशज समुद्रातील वाळूप्रमाणे अगणित करण्याचे वचन दिले आहे.”

  24. उत्पत्ती ३२:१३सुमारे इ.स.पू. १७३९

    त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली:

  25. उत्पत्ती ३२:१४सुमारे इ.स.पू. १७३९

    त्यासाठी त्याने दोनशे शेळ्या, वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,