- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1900–1700 BC
Jacob, Joseph & Egypt
Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती ३३:८सुमारे इ.स.पू. १७३९
एसावाने विचारले, “जी गुरे व कळप मला भेटले त्याचा उद्देश काय आहे?” याकोब म्हणाला, “माझ्या धन्या, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावावे म्हणून.”
- उत्पत्ती ३३:९सुमारे इ.स.पू. १७३९
यावर एसाव म्हणाला, “भाऊ, माझ्याजवळ भरपूर आहे; तुझे आहे ते तुलाच राहू दे.”
- उत्पत्ती ३३:१०सुमारे इ.स.पू. १७३९
“नाही, नाही!” याकोब म्हणाला, “जर तुमची माझ्यावर कृपा झाली असल्यास या भेटींचा तुम्ही स्वीकार करा. कारण तुम्ही आता मला स्वीकारले आहे म्हणून तुमचे मुख बघून परमेश्वराचे मुख बघितल्यासारखे वाटते.
- उत्पत्ती ३३:११सुमारे इ.स.पू. १७३९
माझ्या देणग्यांचा कृपया स्वीकार करा, कारण परमेश्वराने माझ्यावर दया केली आहे आणि त्यांनी मला सर्वकाही भरपूर दिले आहे.” याकोबाने फारच आग्रह केल्यामुळे एसावाने शेवटी त्या भेटींचा स्वीकार केला.
- उत्पत्ती ३३:१२सुमारे इ.स.पू. १७३९
मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आता आपण वाटेस लागून पुढे जाऊ या. मी तुझ्यासोबत चालतो.”
- उत्पत्ती ३३:१३सुमारे इ.स.पू. १७३९
पण याकोब त्यास म्हणाला, “काही मुले फार लहान आहेत हे माझ्या स्वामीला दिसतच आहे आणि दूध पाजणार्या शेळ्या, मेंढ्या व गाई यांचेही मला पाहिले पाहिजे. त्यांना मी दिवसभर असेच हाकीत नेले तर ती जनावरे मरून जातील.
- उत्पत्ती ३३:१४सुमारे इ.स.पू. १७३९
म्हणून मी माझ्या स्वामींना विनंती करतो की, आपण आपल्या सेवकापुढे जावे. आम्ही त्यांच्यामागे त्यांना चालवेल तसे हळूहळू चालत येऊन सेईर येथे तुम्हाला भेटू.”
- उत्पत्ती ३३:१५सुमारे इ.स.पू. १७३९
मग एसाव म्हणाला, “माझी काही माणसे तुमच्याबरोबर ठेवू द्या.” “पण हे का करावे?” याकोब म्हणाला, “माझ्या स्वामींची कृपादृष्टी मजवर असली म्हणजे पुरे.”
- उत्पत्ती ३३:१६सुमारे इ.स.पू. १७३९
तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरला परत जाण्यास निघाला.
- उत्पत्ती ३३:१७सुमारे इ.स.पू. १७३९
दरम्यान याकोब सुक्कोथ येथे गेला. तिथे त्याने स्वतःसाठी तंबू आणि आपल्या गुरांसाठी निवारा बांधला. म्हणूनच त्या ठिकाणाला सुक्कोथ असे नाव पडले.
- उत्पत्ती ३३:१८सुमारे इ.स.पू. १७३९
यानंतर याकोब पद्दन-अरामचा प्रवास पूर्ण करून कनान देशातील शेखेम नावाच्या शहरात सुखरुपपणे पोहोचला आणि शहराच्या बाहेर त्याने आपला तळ दिला.
- उत्पत्ती ३३:१९सुमारे इ.स.पू. १७३९
जिथे त्याने तळ दिला होता तेथील जमिनीचा काही भाग त्याने शेखेमचा पिता हमोर याच्याकडून शंभर चांदीची नाणी देऊन विकत घेतला.
- उत्पत्ती ३३:२०सुमारे इ.स.पू. १७३९
मग तिथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव त्याने एल एलोहे इस्राएल असे ठेवले.
- उत्पत्ती ३४:१सुमारे इ.स.पू. १७३२
एके दिवशी याकोबापासून झालेली लेआची कन्या दीना त्या देशातील मुलींना भेटावयास गेली.
- उत्पत्ती ३४:२सुमारे इ.स.पू. १७३२
तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा पुत्र शेखेम, याने तिला पाहिले, तेव्हा तो तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून त्याने तिला भ्रष्ट केले.
- उत्पत्ती ३४:३सुमारे इ.स.पू. १७३२
याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला.
- उत्पत्ती ३४:४सुमारे इ.स.पू. १७३२
मग शेखेमने आपले वडील हमोर यांना म्हणाला, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.”
- उत्पत्ती ३४:५सुमारे इ.स.पू. १७३२
आपली कन्या दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले आहे हे याकोबाने ऐकले त्यावेळी त्याचे पुत्र रानात गुरांबरोबर होते; म्हणून ते घरी परत येईपर्यंत त्याने त्याबाबत काहीही केले नाही.
- उत्पत्ती ३४:६सुमारे इ.स.पू. १७३२
मग जेव्हा शेखेमचा बाप हमोर याकोबाकडे आपल्या मुलाच्या विवाहासंबंधी बोलणी करावयास आला.
- उत्पत्ती ३४:७सुमारे इ.स.पू. १७३२
तेवढ्यात याकोबाचे पुत्रही रानातून घरी आले. शेखेमने इस्राएलात अशी भयानक गोष्ट करून याकोबाच्या कन्येला भ्रष्ट केल्याचे वृत ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आणि ते संतप्त झाले कारण ही अपमानजनक गोष्ट घडणे अत्यंत घृणास्पद होते.
- उत्पत्ती ३४:८सुमारे इ.स.पू. १७३२
हमोर त्यांना म्हणाला, “माझा मुलगा शेखेम याचे हृदय तुमच्या मुलीकडे आकर्षित झाले आहे, म्हणून तिला त्याची पत्नी म्हणून द्या.
- उत्पत्ती ३४:९सुमारे इ.स.पू. १७३२
आमच्याशी सोयरीक करा; आम्हाला तुमच्या मुली द्या आणि आमच्या मुली तुमच्यासाठी घ्या.
- उत्पत्ती ३४:१०सुमारे इ.स.पू. १७३२
आमच्याबरोबर राहा; हा देश तुमच्यासमोर मोकळा आहे, त्यात राहा आणि व्यापार करा आणि मालमत्ता प्राप्त करा.”
- उत्पत्ती ३४:११सुमारे इ.स.पू. १७३२
मग शेखेम, दीनाचे वडील व भाऊ यांना उद्देशून म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा, तुम्ही जे मागाल ते मी देईन.
- उत्पत्ती ३४:१२सुमारे इ.स.पू. १७३२
तुम्ही वधूबद्दल वाटेल तितका हुंडा आणि भेट मागा, मी ती तुम्हाला देईन, पण ती मुलगी मला पत्नी म्हणून द्या.”