मुख्य मजकुरावर जा

Solomon बद्दल बायबलमधील वचने

301 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शलोमोन राजाचे ते मुख्य अधिकारीसुद्धा होते, माणसांवर देखरेख ठेवणारे दोनशे पन्नास अधिकारी होते.

  2. शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.”

  3. याहवेहची जी वेदी त्याने द्वारमंडपासमोर बांधली होती, तिथे शलोमोनाने याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले,

  4. शब्बाथ, अमावस्या आणि वर्षातून तीन वेळा सण यासाठी मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे अर्पणे करण्यासाठी रोजच्या गरजेनुसार शलोमोनाने त्यावर याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले—बेखमीर भाकरीचा सण, आठवड्यांचा सण आणि मंडपांचा सण असे ते तीन सण.

  5. त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली.

  6. राजाने याजकांना किंवा लेवीय यांना दिलेल्या कोणत्याही आज्ञेपासून तसेच भंडाराच्या अंतर्भूत विषयामधील आज्ञेपासून ते विचलित झाले नाहीत.

  7. ज्या दिवसापासून याहवेहच्या मंदिराची पायाभरणी केली गेली, त्या दिवसापासून ते होईपर्यंत शलोमोनचे सर्व कार्य पूर्ण झाले. याहवेहचे मंदिरही पूर्ण झाले.

  8. नंतर शलोमोन एदोम या बंदरावर असलेल्या एजिओन-गेबेर आणि एलोथ येथे गेला.

  9. आणि हीरामाने त्याला आपल्या माणसांबरोबर म्हणजेच त्याच्या अनुभवी खलाश्यांनी चालविलेली जहाजे पाठविली. त्यांनी शलोमोनच्या माणसांबरोबर ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे पन्नास तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.

  10. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनच्या किर्तीविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती यरुशलेमास आली. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली.

  11. शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही त्याच्यासाठी कठीण नव्हते.

  12. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला,

  13. त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे अंगरखे, प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेली होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली.

  14. ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे.

  15. परंतु त्यांनी मला जे सांगितले त्यावर मी येथे येऊन या गोष्टी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत विश्वास केला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले ते अर्धे देखील नाही; त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे.

  16. आपले लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील!

  17. याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला याहवेह तुमचे परमेश्वरासाठी राजा म्हणून आपल्या राजासनावर अधिकार करण्यास ठेवले. कारण तुमच्या परमेश्वराचे इस्राएलवर असलेले प्रेम आणि त्यांना सर्वकाळ पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा, यासाठी त्यांनी तुम्हाला त्यांच्यावर राजा केले, यासाठी की न्याय आणि धार्मिकता टिकवून धरावी.”

  18. नंतर तिने राजाला एकशेवीस तालांत सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये आणली त्यासारखी त्यानंतर परत कधी नव्हती.

  19. (हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली.

  20. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात पायर्‍या बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. यहूदीयामध्ये त्यासारखे कधीही पाहण्यात आले नव्हते.)

  21. शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, तिने त्याच्यासाठी जितके आणले होते, त्यापेक्षा जास्त त्याने तिला दिले. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली.

  22. शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत होते,

  23. व्यापारी आणि सावकार यांच्यापासून येणारा महसूलचा यात समावेश नाही. तसेच अरब देशाचे सर्व राजे आणि शासनाच्या अंतर्गत प्रदेशाचे राज्यपाल शलोमोनासाठी सोने आणि चांदी आणत होते.

  24. शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे फार मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल ठोकलेले सोने लागले होते.

  25. तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीनशे शेकेल सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या.