Skip to content

Solomon बद्दल बायबलमधील वचने

301 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले.

  2. या लोकांना मार्गदर्शन करण्यास मला सुज्ञता व ज्ञान द्या, कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकणार?”

  3. तेव्हा परमेश्वर शलोमोनाला म्हणाले, “जर हीच तुझ्या मनातील इच्छा आहे व तू धनदौलत, संपत्ती किंवा मान सन्मान मागितला नाहीस. मी तुझ्या शत्रूंना मृत्यू द्यावा अथवा स्वतःसाठी मोठे आयुष्यमान ही मागणी देखील केली नाहीस, तर ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा बनविले त्यांच्यावर नीट शासन करता यावे म्हणून तू सुज्ञता व ज्ञान मागितलेस,

  4. तुला सुज्ञता व ज्ञान देण्यात येईल. याशिवाय मी तुला इतकी धन, संपत्ती आणि सन्मान देईन की, आतापर्यंत कोणत्याही राजाला कधीही प्राप्त झाले नव्हते व कोणालाही होणार नाही.”

  5. शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती.

  6. राजाने यरुशलेमात चांदी व सोने धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  7. शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असे.

  8. त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते निर्यात करीत असे.

  9. तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर सात दिवस सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे राहिवासी आले होते.

  10. शलोमोनाने याहवेहचे मंदिर आणि राजमहालाचे काम संपविले आणि याहवेहच्या मंदिरात व आपल्या राजवाड्यात जे काही करावे असे त्याचे मनोरथ होते ते सर्व करण्यात तो यशस्वी झाला.

  11. रात्रीच्या वेळेस याहवेहने शलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी स्वतःकरिता हे ठिकाण यज्ञांसाठी मंदिर म्हणून निवडले आहे.

  12. “जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन,

  13. जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.

  14. आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील.

  15. मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.

  16. “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर, तू आपला पिता दावीदाप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील,

  17. तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीदाशी करार करीत म्हटले होते, ‘इस्राएलवर राज्य करण्यास तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’

  18. “परंतु जर तुम्ही दूर वळले आणि मी तुला दिलेले विधी आणि आज्ञा पाळल्या नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली,

  19. तर मी माझ्या देशातून जो मी त्यांना दिलेला आहे, तिथून मी इस्राएली लोकांना उपटून टाकीन आणि या मंदिराचा, जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. सर्व लोकांमध्ये मी ते थट्टा व निंदेचा विषय करेन.

  20. हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’

  21. तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर ज्यांनी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून त्यांनी त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”

  22. शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि आपला राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.

  23. शलोमोनाने त्याला हीरामकडून मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली.

  24. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे.

  25. परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.