मुख्य मजकुरावर जा

Solomon बद्दल बायबलमधील वचने: Builds for Pharaoh's daughter

8 वचने · 46 पैलू

Builds for Pharaoh's daughter बद्दल वचने

  1. आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला.

  2. या सर्व इमारती, बाहेरच्या बाजूपासून ते दरबारापर्यंत आणि त्यांच्या पायापासून छपराच्या वळचणीपर्यंत, उच्च प्रतीचे दगड घेऊन त्यांना आकारात कापून आतील व बाहेरील बाजूने त्यांना गुळगुळीत बनवून वापरले होते.

  3. उत्तम दर्जाच्या मोठमोठ्या दगडांनी त्यांचा पाया घातला गेला. काही दगड दहा हात तर काही आठ हात लांबीचे होते.

  4. त्याच्या वरच्या बाजूने योग्य आकारात कापलेले उच्च दर्जाचे दगड आणि गंधसरूच्या तुळया होत्या.

  5. मोठ्या अंगणाच्या सभोवती घडलेल्या दगडांच्या तीन रांगा व छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग होती, याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणाला व द्वारमंडपालाही तसेच होते.

  6. फारोहची कन्या दावीदाचे शहर सोडून शलोमोनने तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आली, मग त्याने स्तरीय बांधकाम केले.

  7. शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.”

  8. मी मोठे प्रकल्प हाती घेतले: स्वतःसाठी घरे बांधली आणि द्राक्षमळे लावले.