मुख्य मजकुरावर जा

Solomon बद्दल बायबलमधील वचने: His prayer for wisdom, and his vision

16 वचने · 46 पैलू

His prayer for wisdom, and his vision बद्दल वचने

  1. गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”

  2. शलोमोनने उत्तर दिले, “आपला सेवक, माझे पिता दावीदाला आपण अपार दया दाखविली होती, कारण ते आपल्याशी विश्वासू होते, व हृदयाने नीतिमान व सरळ होते. आपण त्यांच्यावरील ही अपार दया पुढे चालू ठेवून आज त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक पुत्र दिला.

  3. “तर आता हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, माझे पिता दावीदाच्या जागी आपण मला राजा केले आहे. परंतु मी एक लहान बालक आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडाव्या हे मला कळत नाही.

  4. आपला सेवक तर आपण निवडलेल्या लोकांमध्ये आहे, जे इतके मोठे व अगणित आहेत.

  5. म्हणून आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि बरे आणि वाईटाची पारख करण्यासाठी आपण आपल्या सेवकाला विवेकी हृदय द्यावे. कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकेल?”

  6. शलोमोनाने हे मागितल्याने प्रभू परमेश्वर प्रसन्न झाले.

  7. म्हणून परमेश्वराने त्याला म्हटले, “कारण तू तुझ्यासाठी दीर्घायुष्य किंवा संपत्ती किंवा तुझ्या शत्रूंचा नाश हे न मागता न्याय करण्यासाठी विवेक मागितला आहे,

  8. त्यामुळे तू जे मागितले आहेस ते मी करेन. मी तुला ज्ञानी व विवेकी हृदय देईन, म्हणजे तुझ्यासारखा पूर्वी कधी कोणी नव्हता, ना कधी असेल.

  9. याशिवाय, तू जे मागितले नाहीस ते म्हणजे संपत्ती आणि सन्मान हे देखील मी तुला देईन—आणि तुझ्या आयुष्याच्या दिवसांत राजांमध्ये तुझ्यासमान कोणीही नसेल.

  10. आणि तुझा पिता दावीद करीत असे त्याचप्रमाणे जर तू माझ्या आज्ञेनुसार चालून माझे नियम आणि विधी पाळशील, तर मी तुला दीर्घायुष्य देईन.”

  11. त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”

  12. शलोमोनाने परमेश्वराला उत्तर दिले, “आपला सेवक माझे पिता दावीद याला आपण अपार दया दाखविली आणि त्यांच्या जागी तुम्ही मला राजा म्हणून नेमले.

  13. आता याहवेह परमेश्वरा, माझे पिता दावीदाला दिलेली वचने पूर्ण होऊ द्यावी, जमिनीवरील धूलिकणांप्रमाणे असंख्य लोक असलेल्या राष्ट्राचा तुम्ही मला राजा बनविले.

  14. या लोकांना मार्गदर्शन करण्यास मला सुज्ञता व ज्ञान द्या, कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकणार?”

  15. तेव्हा परमेश्वर शलोमोनाला म्हणाले, “जर हीच तुझ्या मनातील इच्छा आहे व तू धनदौलत, संपत्ती किंवा मान सन्मान मागितला नाहीस. मी तुझ्या शत्रूंना मृत्यू द्यावा अथवा स्वतःसाठी मोठे आयुष्यमान ही मागणी देखील केली नाहीस, तर ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा बनविले त्यांच्यावर नीट शासन करता यावे म्हणून तू सुज्ञता व ज्ञान मागितलेस,

  16. तुला सुज्ञता व ज्ञान देण्यात येईल. याशिवाय मी तुला इतकी धन, संपत्ती आणि सन्मान देईन की, आतापर्यंत कोणत्याही राजाला कधीही प्राप्त झाले नव्हते व कोणालाही होणार नाही.”